लेबल
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (198)
- दिनविशेष (188)
- TET Test (167)
- महान व्यक्ती (special person) (119)
- चालू घडामोडी current knowledge (101)
- विशेष प्रश्नमंजुषा (92)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (91)
- जनरल नॉलेज (87)
- प्रेरणादायी लेख (76)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट (74)
- परीक्षा exam (59)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (55)
- शासन निर्णय gr (51)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (51)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (31)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- NMMS test (22)
- स्कॉलरशिप imp (22)
- सामान्य ज्ञान टेस्ट (20)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- बोधकथा (14)
- Moral story (9)
- शिक्षक दिन भाषण (4)
महत्वाच्या लिंक IMP
- PAT पायाभूत परीक्षा मार्क भरा 2024
- नवोदय विद्यालय परीक्षा 2025
- आनंददायी अभ्यासक्रम
- Zp Satara सन 2024 -25सुट्टीचे परिपत्रक
- अर्जित रजा अर्ज
- भारत सरकार 2024 केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
- CCRT tranning2024-25
- Flag code /ध्वज संहिता 2006
- बहिस्थ परीक्षा अर्ज 2022
- Teacher transfer portal 2022
- NISHTHA FLN 3.0
- वाचन अभियान 100 दिवस
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- शालार्थ salary slip
- शिक्षक बदली नियमावली 2022
- MDM शालेय पोषण आहार
- स्वाध्याय उपक्रम
- शिकू आनंदे उपक्रम
- स्पर्धा परीक्षा लिंक
- शालेय शिक्षण लिंक IMP
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- महाकरियर पोर्टल
- माझे मूल माझी जबाबदारी
- "हर घर तिरंगा
- COVID 19 लस प्रमाणपत्र
- सुगम दुर्गम शाळा 2021 सातारा zp
- मत्ता व दायित्व विवरण प्रपत्रे
- सेवा हमी कायदा शिक्षण
- शाळा सुगम दुर्गम यादी
- सेतू अभ्यासक्रम
- आनंददायी अभ्यासक्रम 2022
- नवोदय परीक्षा निकाल 2022
- गटविमा प्रस्ताव
- वयानुरूप दाखल करणे
- RIMC EXAM राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परीक्षा
- विद्यांजली योजना 2.0
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा
- महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
- आंतरजिल्हा बदली zp शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य
- Udies code satara सातारा
- माता पालक गट निर्मिती लिंक
- NMMS EXAM 2022-23
- पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिकशिष्यवृत्ती परीक्षा2023
- समूह अपघात विमा 2023
- निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022- 23
- Student portal आधार mismatch
- UDIES प्लस विद्यार्थी माहिती
- स्वाध्याय उपक्रम
- महाराष्ट्राचे राज्यगीत
- शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी यांचे उत्तर सूची 2023
- आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2
- संकलित मूल्यमापन सत्र परीक्षा 2 प्रश्नपत्रिका
- UDIES
- कुटुंब सर्वेक्षण फॉर्म
- राष्ट्रीय दिनदर्शिका
- सूत्रसंचालन गॅदरिंग
- आधार कार्ड /पॅन कार्ड लिंक
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका
- CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023
- जीवन कौशल्ये शिक्षण
- शाळा सिद्धी
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी करणेबाबत.
- सातारा जिल्हा परिषद सन 2023-24 सुट्ट्यांची यादी
- केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
- सेवा पुस्तक तपासणी सूची
- पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानाचा उपयोग
- नवोदय विद्यालय परीक्षा 2023
- इयत्ता पहिलीसाठी प्रवेश वयोमर्यादा 2023-24
- सेतू अभ्यासक्रम 2023
- वेतन वाढ 2023
- प्रशस्त ॲप PRASHAST APP
- चित्रकला स्पर्धा परीक्षा 2023
- PAT पायाभूत चाचणी 2023
- मा. शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा 2023
- परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI
- NMMS result 2023-24
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
- मेडिकल बिल आता शालार्थ सिस्टीम मधून
- मतदान card...search and download
मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
जीवनाचे सार बोधकथा
*_बोधकथा_*
💫💫💫💫
एकदा एक मुलगा आपल्या शाळेची फी भरण्यासाठी दारोदार फिरून काही सामान विकायचा. एका दिवशी त्याचे काहीच सामान विकले गेले नाहीं आणि त्याला खूप भूक लागली होती. त्याने विचार केला की आता ज्या दरवाजावर सामान विकायला जाऊ तेथे काहीतरी खायला मागायचे.
पहिला दरवाजा वाजवला. तो एका मुलीने उघडला. तिला पाहताच तो घाबरला आणि काही खायला मागायच्या ऐवजी त्याने तिच्याकडे पिण्यासाठी एक ग्लास पाणी मागितले.
त्यांच्या आवाजावरुन त्या मुलीने ओळखले की याला भूक लागली आहे. म्हणून ती त्याच्यासाठी एका ग्लासात पाणी आणि एक मोठा ग्लासभरुन दूध घेऊन आली.
मुलाने भूक लागली असल्याने ते ग्लासभर दूध घटाघटा पिऊन टाकले.
" किती पैसे देवू ?" त्या मुलाने तिला विचारले .
" पैसे कसले ?"त्या मुलीने विचारले. "आईने मला शिकवलेय की जेव्हा ही कोणावर दया केलीस तर त्याचे पैसे घेवून नकोस."
" मग तर मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो."
"जेव्हा त्या मुलाने तिचे घर सोडले त्याला ना केवळ शारीरिक दृष्ट्या शक्ती प्राप्त झाली होती आणि त्याचा देवावरचा आणि माणसावरचा विश्वास अजून वाढला.
काही वर्षे उलटली. ती मुलगी गंभीर स्वरूपी आजारी पडली. लोकल डॉक्टरांनी तिला शहरातील मोठ्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.
निष्णात डॉक्टर होवार्ड केल्लींना रोग्याच्या तपासणीसाठी बोलावले गेले. जसे त्यांनी त्या मुलीच्या वस्तीचे नांव ऐकले त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. एकदम आपल्या खुर्चीतून उठून ते त्या मुलीला दाखल करुन घेतलेल्या कक्षात गेले.
त्यांनी त्या मुलीला पाहिले आणि पाहताच ओळखले आणि त्यांनी ठरवले की या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी आकाशपाताळ एक करीन. त्यांची मेहनत आणि तिला वाचवण्यासाठीची आस यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
डॉक्टरांनी इस्पिटळाच्या ऑफिसमधे जाऊन त्या मुलीच्या आजाराचे बिल चुकते केले आणि बिलाच्या कोपऱ्यात एक वाक्य लिहिले आणि ते बिल त्या मुलीकडे पाठवून दिले.
ती मुलगी बिलाचा लिफाफा पाहून घाबरून गेली. तिला माहित होते की ती आजारातून तर वाचली पण बिलाची रक्कम तर आता तिचा जीव घेईल.
आणि तिने हळूच तो लिफाफा उघडला, रक्कम पाहिली आणि अचानक तिची नजर बिलाच्या कोपऱ्यात पेनाने लिहिलेल्या वाक्यावर गेली.
ज्यावर लिहिले होते, "एक ग्लास दूधाने हे बिल भरले गेले आहे." खाली त्या डॉक्टर होवार्ड केल्ली यांची सही होती. आनंद आणि आश्चर्याने त्या मुलीच्या गालावर अश्रू ओघळले. तिने आपले दोन्ही हात वर करून म्हणाली,
" हे देवा.! तुझे खूप खूप आभार. तुझे प्रेम माणसाच्या हृदयाद्वारे आणि हातांद्वारे न जाणो कुठे- कुठे पर्यंत फैलावले आहे."
जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले कराल आणि चिंताल तर तुमच्या सोबतही तसेच घडेल. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे...
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023
जय हो अदिती खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🌹🌹💐💐🌹🌹💐💐
साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami) तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे.
World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami) तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. आदितीने शनिवारी वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशीपमध्ये (World Archery Championships) कंपाउंड महिला फायनलमध्ये विजय मिळवलाय. आदितीने मॅक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिचा पराभव करत चॅम्पियनशीपवर नाव कोरले. आदितीने जुलै महिन्यात लिमरिकमध्ये युवा चॅम्पियनशिपमध्ये अंडर-18 मध्ये विजय मिळवला. फायनलमध्ये तीने 150 पैकी 149 गुणांची कमाई केली होती.
शिक्षण विस्तार अधिकारी भरती 2023
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे भरावयाच्या आहेत त्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाले आहे
1.यवतमाळ 18 पदे
2.पालघर 10 पदे
3.चंद्रपूर 9 पदे
4.अमरावती 7 पदे
5.नाशिक 7 पदे
6.नंदुरबार 4 पदे
7 .सोलापूर 7 पदे
8.नागपूर 9 पदे
9.बुलढाणा 1 पदे
10.अकोला 1 पदे
11. जालना 1 पदे
12. ठाणे 1पदे
13. सातारा 2 पदे
14. नांदेड 1
15. गडचिरोली 1
16. पुणे 2
(ज्या जिल्हा परिषद जाहिराती पाहिलेल्या आहेत, तेथील शिक्षण विस्तार अधिकारी पदे जाहिरातीत दर्शवली आहेत.)
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
1.ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात दिनांक - 5 ऑगस्ट 2023
2.ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम दिनांक - 25 ऑगस्ट 2023
3.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत -5 ऑगस्ट 2023
4.परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या आधी 7 दिवस
विस्तार अधिकारी (शिक्षण - वर्ग 3 श्रेणी 2) पदासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव
● कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि
● ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि
● ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे, असे उमेदवार या पदासाठी पात्र राहतील.
वेतनश्रेणी - ₹ 41800 - 132300
शिक्षण विस्तार अधिकारी 2023 पदाचा नवीन अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व संदर्भ पुस्तके
शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी शिक्षणशास्त्रविषयक तांत्रिक अभ्यासक्रम 80 गुण, मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण व बुद्धिमापन व गणित 30 गुण असे विभाजन आहे.
परीक्षेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी दोन तास वेळ असणार आहे.
विस्तार अधिकारी (शिक्षण) तांत्रिक अभ्यासक्रम (40 प्रश्न 80 गुण)
शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेसाठी शिक्षणशास्त्र हा घटक 80 गुणांना असून या घटकाच्या अभ्यासावरच परीक्षेतील यश अवलंबून आहे. शिक्षण विस्तार अधिकारी नवीन अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर अधिनियमा नुसार महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अदयावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी
2.शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था / संघटन व त्यांचे कार्य
3.UNICEF, NCERT, NUEPA, NCTE CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, DIET
4.प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य ASER, NAS, PISAT
5.प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र
6.नविन शैक्षणिक धोरण- २०२०
7.संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने
8.समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान
9.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान
10.राष्ट्रीय शिक्षा अभियान
11.केंद्र व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्य विदयार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना
12.संगणक व माहिती तंत्रज्ञान- शैक्षणिक क्षेत्रातील संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि टेक्नॉलॉजी, शासनाचे कार्यक्रम मिडीया लॅब, एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र, ई-गव्हर्नर, शालेय सरल प्रणाली U-DES, DBT अल क्लासरुम, डिजीटल स्कूल, दैनंदिन माहिती देवाण घेवाण तंत्र, ई-मेल, व्हॉटस अॅप
13.महाराष्ट्र जिल्हा परिषदा, पंचायत समिती अधिनियम १९६१
14.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६६ व पंचायतराज व्यवस्थापन, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा (उक्त पुस्तकांच्या अनुषंगाने शिक्षण संबंधी तरतुदी)
15.शालेय शिक्षण विभागाची संरचना (प्रशासकीय विभाग व विविध संचालनालय) व त्यांची कार्यपध्दती
संपूर्ण अभ्यासक्रम संदर्भ पुस्तके
1.केंद्रप्रमुख पेपर दुसरा व शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षणशास्त्र तांत्रिक ज्ञान - डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती)
सदर पुस्तकात शिक्षणशास्त्र तांत्रिक अभ्यासक्रम मुद्दे व शिक्षणशास्त्र संकल्पनाची माहिती मुद्देसूद व परीक्षाभिमुख पद्धतीने दिली असल्याने हे पुस्तक अभ्यासणे अत्यावश्यक आहे.
2. शिक्षण विस्तार अधिकारी संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.एस.कमल व स्वाती शेटे (के'सागर पब्लिकेशन्स) - संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ
3. शालेय प्रशासन व संघटन - डॉ.अरविंद दुनाखे
4.संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (नववी आवृत्ती)
5.महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग शासननिर्णय व योजना
6. केंद्र शासनाच्या शिक्षण विषयक योजना
7.शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
8.अभ्यासक्रमातील शिक्षण विषयक संस्थांची संकेतस्थळ
मराठी (बारावी) (15 प्रश्न 30 गुण)
सर्वसाधारण शब्दसंग्रह
वाक्यरचना
व्याकरण
म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
उताऱ्यावरील प्रश्न
संदर्भ पुस्तक
के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे
बौद्धिक चाचणी (पदवी) (15 प्रश्न 30 गुण)
सामान्य बुद्धीमापन व आकलन
तर्क आधारित प्रश्न
अंकगणित आधारित प्रश्न
संदर्भ पुस्तक
अनिल अंकलगी/के सागर/पंढरीनाथ राणे
इंग्रजी (बारावी)
General Vocabulary
Sentence Structure
Grammar
Idioms & Phrases- their meaning and use
Comprehension
सामान्य ज्ञान (पदवी) (15 प्रश्न 30 गुण)
भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र भारत जागतीक भूगोल - भौतिक, सामाजिक,
आर्थिक भूगोल भारत आणि महाराष्ट्र राज्य आणि शासन, - राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज,
सार्वजनिक धोरण, हक्कांचे मुद्दे आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास ध्येये,
गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम
सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान
पर्यावरणीय परिस्थीतीतील जैवविविधता हवामान बदल,सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण
भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास
चालू घडामोडी - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्रासह कृषि आणि ग्रामीण विकास
संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा सर्व टेस्ट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या शेअर करा फॉलो करा कमेंट करा
Link
शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३
सुंदरबन कांदळवन
🔭 *मराठी विज्ञान परिषदेचे*🔬
🤔 *कुतूहल* 🤔
🎯 *सुंदरबन कांदळवन*
सुंदरबन हे खारफुटीचे वन गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना या तीन नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात आहे. या तीनही नद्या बंगालच्या उपसागरात जिथे मिळतात तिथे हे नैसर्गिक खारफुटीचे वन तयार झालेले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यादरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे वन आहे.
खारफुटीच्या एका झाडाचे नाव बंगालीमध्ये सुंदरी असे आहे. त्यामुळे या खारफुटीच्या वनाला ‘सुंदरबन’ असे नाव पडले. याचा बराचसा भाग बांगलादेशात आणि काही भाग भारतात येतो. १४० हजार चौरस हेक्टरवर हे कांदळवन पसरले असून १९८७ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून सुंदरबनाला मान्यता दिली आहे. सुंदरबन जैवविविधतेने नटलेले आहे. त्यात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. जलचर, भूचर आणि उभयचर प्राण्यांचे ते माहेरघर आहे. सुंदरबनच्या खाडीतील सुसर हा खारफुटीतील वनात सापडणारा सर्वात मोठा प्राणी आहे. मोठय़ा प्राण्यांप्रमाणेच असंख्य लहान प्राणी या वनात सापडतात. येथे सस्तन, सरीसृप, मासे, कोळंबी, खेकडे, मृदुकाय असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने राहतात! त्याचबरोबर रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे सुंदरबनचे सौंदर्य आणखी खुलते. विविध प्रजातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील येथे आढळतात.
आणि हो! आणखी एक रुबाबदार, देखणा प्राणी रॉयल बेंगॉल टायगर तोही या सुंदरबनात मोठय़ा दिमाखात वावरतो. येथील वाघ केवळ जमिनीवरील भक्ष्यांवर अवलंबून न राहता मासेमारी करूनदेखील आपली उपजीविका करतात. या सुंदरबनातच त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले ‘रॉयल बेंगाल टायगर रिझव्र्ह’ हे राष्ट्रीय उद्यान आहे. जगातील सर्वाधिक वाघ या उद्यानात आढळतात. वाघांचे मुख्य खाद्य म्हणजे चितळ व बाराशिंगा ही हरणे. चितळांची संख्याही बरीच असून त्यांचे खूर थोडेसे वेगळे, दलदलीत व पाण्यामध्ये पोहोण्यासाठी अनुकूल असतात. इतर प्राण्यांमध्ये माकडे, रानडुक्कर, मुंगूस, खोकड, रानमांजर, खवलेमांजर यांचा समावेश आहे. विविध प्रकारचे पाणसाप, अजगर, नाग, नागराज, फुरसे, घोणस, मण्यार, पट्टेरी मण्यार, समुद्री साप यांसारखे अनेक विषारी आणि बिनविषारी साप सुंदरबनात आढळतात. शिवाय, घोरपडी, मगरी, अनेक प्रकारची समुद्री कासवे, तसेच जमिनीवरील काही जातींची कासवेही येथे आढळतात.
*🖊बिपिन भालचंद्र देशमाने*
office@mavipamumbai.org
=============
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान 🔬
*संकलक - नितीन खंडाळे*
- चाळीसगाव
*दै_लोकसत्ता*
*दिनांक-* ४ ऑगस्ट २०२३
==============
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे 👇👇 कार्यक्रम पत्रिका: आगतम् स्वागतम् सुस्वागतम्..... 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पू...
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...
-
परीक्षेला येणारे हमखास प्रश्न. 🙏🙏 Loading…
