लेबल
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (198)
- दिनविशेष (188)
- TET Test (167)
- महान व्यक्ती (special person) (119)
- चालू घडामोडी current knowledge (102)
- विशेष प्रश्नमंजुषा (92)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (91)
- जनरल नॉलेज (87)
- प्रेरणादायी लेख (76)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट लहान गट (74)
- परीक्षा exam (61)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (55)
- शासन निर्णय gr (51)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (51)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (31)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- NMMS test (22)
- स्कॉलरशिप imp (22)
- स्कॉलरशिप परीक्षा (21)
- सामान्य ज्ञान टेस्ट (20)
- बोधकथा (14)
- Moral story (9)
- शिक्षक दिन भाषण (4)
महत्वाच्या लिंक IMP
- PAT पायाभूत परीक्षा मार्क भरा 2024
- नवोदय विद्यालय परीक्षा 2025
- आनंददायी अभ्यासक्रम
- Zp Satara सन 2024 -25सुट्टीचे परिपत्रक
- अर्जित रजा अर्ज
- भारत सरकार 2024 केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची खातेवाटपाची संपूर्ण यादी
- CCRT tranning2024-25
- Flag code /ध्वज संहिता 2006
- बहिस्थ परीक्षा अर्ज 2022
- Teacher transfer portal 2022
- NISHTHA FLN 3.0
- वाचन अभियान 100 दिवस
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार
- शालार्थ salary slip
- शिक्षक बदली नियमावली 2022
- MDM शालेय पोषण आहार
- स्वाध्याय उपक्रम
- शिकू आनंदे उपक्रम
- स्पर्धा परीक्षा लिंक
- शालेय शिक्षण लिंक IMP
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- महाकरियर पोर्टल
- माझे मूल माझी जबाबदारी
- "हर घर तिरंगा
- COVID 19 लस प्रमाणपत्र
- सुगम दुर्गम शाळा 2021 सातारा zp
- मत्ता व दायित्व विवरण प्रपत्रे
- सेवा हमी कायदा शिक्षण
- शाळा सुगम दुर्गम यादी
- सेतू अभ्यासक्रम
- आनंददायी अभ्यासक्रम 2022
- नवोदय परीक्षा निकाल 2022
- गटविमा प्रस्ताव
- वयानुरूप दाखल करणे
- RIMC EXAM राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून प्रवेश परीक्षा
- विद्यांजली योजना 2.0
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा
- महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ
- आंतरजिल्हा बदली zp शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य
- Udies code satara सातारा
- माता पालक गट निर्मिती लिंक
- NMMS EXAM 2022-23
- पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिकशिष्यवृत्ती परीक्षा2023
- समूह अपघात विमा 2023
- निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण 2022- 23
- Student portal आधार mismatch
- UDIES प्लस विद्यार्थी माहिती
- स्वाध्याय उपक्रम
- महाराष्ट्राचे राज्यगीत
- शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व पाचवी यांचे उत्तर सूची 2023
- आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2
- संकलित मूल्यमापन सत्र परीक्षा 2 प्रश्नपत्रिका
- UDIES
- कुटुंब सर्वेक्षण फॉर्म
- राष्ट्रीय दिनदर्शिका
- सूत्रसंचालन गॅदरिंग
- आधार कार्ड /पॅन कार्ड लिंक
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मार्गदर्शिका
- CCRT नवी दिल्ली प्रशिक्षण 2023
- जीवन कौशल्ये शिक्षण
- शाळा सिद्धी
- वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नावनोंदणी करणेबाबत.
- सातारा जिल्हा परिषद सन 2023-24 सुट्ट्यांची यादी
- केंद्रप्रमुख भरती परीक्षा 2023
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी
- सेवा पुस्तक तपासणी सूची
- पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानाचा उपयोग
- नवोदय विद्यालय परीक्षा 2023
- इयत्ता पहिलीसाठी प्रवेश वयोमर्यादा 2023-24
- सेतू अभ्यासक्रम 2023
- वेतन वाढ 2023
- प्रशस्त ॲप PRASHAST APP
- चित्रकला स्पर्धा परीक्षा 2023
- PAT पायाभूत चाचणी 2023
- मा. शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज
- आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सातारा 2023
- परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI
- NMMS result 2023-24
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा
- मेडिकल बिल आता शालार्थ सिस्टीम मधून
- मतदान card...search and download
शनिवार, ११ मार्च, २०२३
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज
जन्म.१४ मे १६५७ किल्ले पुरंदर येथे.
शेर शिवा का छावा, धर्मवीर, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक बिरुदे देऊनही ज्यांची कीर्ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतील, असे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजे अगदी लहान असतानाच आई सईबाईंचे निधन झाले. पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची महिला त्यांची दूध आई बनली. जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले. जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्यां शी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते. सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्यामुळे शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर त्यांना जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. सोयराबाई आणि दरबारातील मानकर्यां नी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत, असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की, शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील.
१६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र, काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजांविरुद्ध कट केला आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकार्यांाना हत्तीच्या पायी दिले. औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्या्चा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की, त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||, अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती.
छत्रपती संभाजी महाराज दिसायला राजबिंडे होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातही बरेच शत्रू निर्माण झाले होते. राजकारणात मुरब्बी असलेल्या संभाजी महाराजांची कीर्ती केवळ छत्रपती म्हणून नव्हती. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराज हळवे होते. मृदू मनाचे कवीही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या १४ वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. तसेच गागाभट्टांनी समनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नां ची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली. क्रूर अत्याचाराने परिसीमा गाठली, तरी संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्माभिमानी, लढवय्या, शेर का छावा, असामान्य शौर्य गाजवणाऱ्या संभाजी महाराजांची फाल्गुन अमावास्या म्हणजेच, ११ मार्च १६८९ रोजी प्राणज्योत मालवली.
शालेय पोषण आहार .MDM Back Dated Entry
*MDM Back Dated Entry*
_सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे माहे फेब्रुवारी 2023 करीता प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा शाळा लॉगिनवर दि. 14.03.2023 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सर्व शाळांनी याची नोंद घेऊन आपली काही दिवसांची डाटा एन्ट्री प्रलंबित राहीली असल्यास, सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी._ खालील लिंक वरती क्लीक करा आणि माहिती भरा..
https://education.maharashtra.gov.in/mdm
🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖
मंगळवार, ७ मार्च, २०२३
भंडारा जिल्हा
. भंडारा जिल्हा
टोपण नाव :- तलावांचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- ३,८९० चौ. कि. मी.
लोकसंख्या :- ११,३५,८३५डोंगराळ भागात गोडांची वस्ती आहे.
तालुके १) भंडारा, २) पवनी, ३) तुमसर, ४) मोहाडी,
५) साकोली, ६) लाखांदूर, ७) सालेकसा.
हवामान :- उष्ण व कोरडे (काही डोंगराळ प्रदेशात थंड.) सरासरी पर्जन्य :- १४० सें.मी.
नद्या :- वैनगंगा, चुलबंद, बावनथडी, सूर, मरू.
तलाव :- चांदपूर तलाव. जिल्हात अनेक तलाव असल्यामुळे
तलावाचा जिल्हा असे म्हणतात.
पिके :- तांदूळ, बाजरी, कडधान्ये इ.
किल्ला :- अंबागड.
धार्मिक स्थाने :- भंडारा (बहिरंगेश्वराचे मंदिर), गायमुख, पवनी (मुरलीधर मंदिर, बौद्धकालीन स्तूप), सालेकसा (गठमातेचेमंदिर), पवनी, माडगी (नृसिंह मंदिर).
ऐतिहासिक स्थाने :- पवनी, अंबागड. प्रेक्षणीय स्थळे :- भंडारा (खांब तलाव), पवनी (बौद्धकालीनस्तूप), कोरंबी.
खनिजे :- मँगनिज, सोने, लोखंड, शिसे, बॉक्साइट, क्रोमाईट.
औद्योगिक उत्पादन :- तुमसर हि राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा जिल्ह्यात आहे. तांदूळ सडण्याचे कारखाने, लाकूड उद्योग, कापसाच्या गिरण्या, पितळी भांडी.
लोहमार्ग :- मुंबई - भुसावळ - हावडा ब्रॉडगेज
चंद्रपूर - गोंदिया - जबलपूर : नॅरोगेज,
तुमसर रोड पिरोडी : ब्रॉडगेज.
चंद्रपूर - नागभीड नागपूर : ब्रॉडगेज. राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६. सुरत - कोलकाता,
रविवार, ५ मार्च, २०२३
गोंदिया जिल्हा
गोंदिया जिल्हा
क्षेत्रफळ :- ५,४३१ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- १२,००,१५१.
तालुके :- ८ - १) गोंदिया, २) गोरेगाव, ३) तिरोडा, ४) अर्जुन मोरगाव, ५) देवरी, ६) सडक अर्जुनी, ७) आमगाव,८) सालेकसा
हवामान :- उष्ण व कोरडे. काही प्रदेशांत थंड. सरासरी पर्जन्यमान :- १४० सें.मी.
नद्या :- • वैनगंगा, वाघ, गढ़वी, चुलबंद.
पिके : तांदूळ, गहू, मका, वाटाणा, मिरची, गळिताची धान्ये इ.
अभयारण्ये :- १) नवेगाव बांध अभयारण्य. २) नागझिरा अभयारण्ये (नीळकंठ, बुलबुल, मैना, पोपट,
रानकोंबडी, तितर, भारद्वाज, मोर, खाजा, कबूतर, खंड्या,
सुतारपक्षी).
तलाव :- खालबंदा तलाव, बोदलकासा तलाव, चोरखमारा
तलाव, नवेगाव तलाव.
धार्मिक स्थाने :- सालेकसा, गोंदिया.
प्रेक्षणीय स्थान :- नवेगाव बांध अभयारण्य, नागझिरा अभयारण्य.
ऐतिहासिक स्थान : प्रतापगड. खनिजे :- मँगेनीज, लोहखनिज इ.
धरण प्रकल्प :- • इटीया डोह प्रकल्प.
औद्योगिक उत्पादन :- लाकूड उद्योग, भातसडीच्या गिरण्या इ. लोहमार्ग :- मुंबई-भुसावळ-हावडा : ब्रॉडगेज.
चंद्रपूर-गोंदिया-जबलपूर : नॅरोगेज.
तुमसार रोड-पिरोडी : ब्रॉडगेज.
चंद्रपूर - नागभीड-नागपूर : नॅरोगेज.
राष्ट्रीय महामार्ग :- रा. म. क्र. ६ - धुळे-कोलकाता महामार्ग.
जुलै १९९७ मध्ये गोंदिया जिल्हा भंडारापासून
वेगळा करण्यात आला.
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे 👇👇 कार्यक्रम पत्रिका: आगतम् स्वागतम् सुस्वागतम्..... 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पू...
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...
-
परीक्षेला येणारे हमखास प्रश्न. 🙏🙏 Loading…
