मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

बुधवार, २१ डिसेंबर, २०२२

ससा आणि कासवाची शर्यत

 ससा आणि कासवाची शर्यत  

ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पळायला आवडे. कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील आधी कोण शिवतो? अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पळत पुढे निघाला. कासव मात्र सावकाश चालत राहिले थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवेगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सशाने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल. मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते. 

 सशास आता झोप येऊ लागली त्याने विचार केला. आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल पण आपण ताजे तवाने होऊन जोरात पळू व शर्यत जिंकू. सशाने छान पैकी ताणून दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली पहातो तर काय ? कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली; पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील, अशा रितीने कासवाने शर्यत जिंकली.

तात्पर्य /बोध/शिकवण 

सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.


*

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

एकता हीच ताकद....

 *समूह असणे का महत्वाचे आहे .समूह का गरजेचा आहे ...

*समुहातून काय साध्य होते?* खालील गोष्टीसाठी समूहाचे खूप महत्व आहे... 


*1.समुहात आनंद असतो.*

*2.समुहात उत्साह असतो.*

*3.समुहात प्रोत्साहन मिळते.*

*4.समुहात जिव्हाळा असते.*

*5.समुहात सहानुभूती मिळते.*

*6.समुहात काळजी असते.*

*7.समुहात सुसंवाद असतो.*

*8.समुहात सहकार्य मिळते.*

*9.समुहात शक्ती मिळते.*

*10.समुहात दिलासा मिळतो.*

*11.समुहात प्रबोधन होते.*

*12.समुहात आदर मिळते.*

*13.समुहात प्रेम मिळते.*

*14.समुहात कदर होते.* 

*15.समुहात आपुलकी असते.*

*16.समुहात समन्वय असते.*

*17.समुहात सामंजस्य असते.*

*18.समुहात मित्र मिळतात.*

*19.समुहात मार्गदर्शन मिळते.*

*20.समुहात समुपदेशन होते.*

*21.समुहात सामाजीकरण होते.*

*22.समुहात व्यक्तिमत्व विकास होते.*

*23.समुहात मनोबल वाढते.*

*24.समुहात वक्तृत्व विकसित होते.*

*25.समुहात कल्पनाशक्ती,तर्कशक्ती, स्मरणशक्ती,निर्णयशक्ती विकसित होतात.*

*26.समुहात आत्मीयता वाढते.*

*27.समुहात आपलेपणाची भावना असते.*

*28.समुहात भावनांचे,विचारांचे,*

*आचरणाचे आणि कृतीचे समीकरण जुळते.*

*29.समुहात मनांची मशागत होते.*

*30.समुहात अंतःकरण विशाल होते.*

*31.समुहात एकटेपणा दूर होते.*

*32.समुहात निराशा दूर होते.*

*33.समुहात आत्मविश्वास वाढतो.*

*34.समुहात विचार प्रगल्भ होतात.*

*35.समुहात भाषण,संभाषण सुधारते.*

*36.समुहात मानसिक परिवर्तन घडून येते.*

*37.समुहात बौद्धिक विकास होतो.*

*38.समुहात भावनिक विकास होतो.*

*39.समुहात सकारात्मकता वाढते.*

*40.समुहात संवेदनशीलता वाढते.* 

*41.समुहात व्यवहार कौशल्य विकसित होते.*

*42.समुहात संयम शिकता येते.*

*43.समुहात ज्ञानवृद्धी होते.*

*45.समुहात शिस्त लागते.*

*ज्याला समुहाचे महत्व कळते तो समुहात टिकून राहतो.*

धन्यवाद🙏🙏🙏


गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

मोबाईल की मुले



*वेऴ काढून वाचा*

*मोबाईल- एक भयंकर सत्य*


दोन दिवसांपूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कंबरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक अँबुलन्स त्या सेंटरवर आली.


अँबुलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले. कदाचित अक्सिडेंट झालं असावं. नक्की काय झालं होतं ह्याची कल्पना नव्हती. तेवढ्यात पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला अँबुलन्समधून बाहेर काढलं. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राउनपट्टीने कव्हर केले होते. तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत होते. त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात दिसत नव्हती. बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं.  मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की, आमचा पेशंट एकदम सिरिअस आहे, मेंदूचा MRI करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा. एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला. माझ्यासमोरूनच त्या मुलाला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये नेण्यात आले. त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता. डोळे पाण्याने भरले होते. त्या मुलाला आतमध्ये नेलं, त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्याचे सगळे नातेवाईक बाहेर बसले. रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो, तेव्हा त्याचे वडील माझ्या बाजूला, भिंतीला डोकं टेकून, छताकडे बघत शांत बसले होते. शेवटी मी न राहवून त्या मुलाबद्दल त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखं मला वाटलं.


सार्थक आमचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, YOU TUBE वर व्हिडीओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद. मोबाईल हातात दिल्याशिवाय तो जेवतच नाही. काल संध्याकाळी  त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरकडे नेलं. परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे (हॉस्पिटलच नाव मी इथे लिहीत नाही) आणायला सांगितले.  कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. मेंदूचा MRI केल्यावर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे *"मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे."*  हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले.


तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तीनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसात अजिबात मोबाईल दिला नाही. हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की, "जर तू मला मोबाईल देत नसशील तर तू माझ्यासोबत खेळ." हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल.  हे असं का होतं ह्याच उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं.


ह्या अश्या जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात.


१. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत खेळा.


२. मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये.


३. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे हे काटेकोरपणे टाळावे.


४. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात.


५. मुलांना कधीतरी मातीत, उन्हात खेळुद्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळुन, पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधी विसरू नये.


६. त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा.


७. त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्दीबळ, सापशिडी, ल्युडो ह्यासारखे खेळ खेळा.


८. आजूबाजूच्या ४-५ मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे. त्यांना सुदधा आवड निर्माण होते. आपण पण हेच करत करत मोठे झालो हे कधी विसरू नये.


 कदाचित हे सर्व करताना आपल्याला कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. ह्यामधून पालक आणि मुलं ह्यांच नातं अजून घट्ट होते.


शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो, आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो, त्यांना वेळ दिला नाही ह्याचंच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागते. 

🙏🙏 शेअर to all 

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

शिक्षकाची कदर

 *शिक्षकाची कदर.....✒️*


अल्बर्ट फर्नांडिस यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे.


•°`´°• रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळे कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं, "प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही."

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आंत न्यायाधीश म्हणालेत,

•°`´°• *अ टीचर इज इन द कोर्ट ...!*

लगेचच सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंडही रद्द केला गेला.

त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.

•°`´°• *ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?*

•°`´°• *अमेरिकेत* केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविशिष्ट मानलं गेलं आहे. *वैज्ञानिक आणि शिक्षक*.

•°`´°• *फ्रान्सच्या* न्यायालयां मधे केवळ *शिक्षकांनाच* खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.

•°`´°• *जपानमध्ये* सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या *शिक्षकाला* अटक करू शकतात.

•°`´°• *कोरियात* प्रत्येक *शिक्षकाला* ते सगळे अधिकार आहेत जे भारताच्या मंत्र्याला मिळतात तेही केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.

•°`´°• *अमेरिकन* आणि *युरोपीय* देशांमध्ये प्राथमिक *शिक्षकाला* सर्वाधिक वेतन मिळतं, कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.

•°`´°• ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो, तिथं फक्त चोर, आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.


*सर्व शिक्षकांना समर्पित.*

🙏🙏🙏

मूलभूत हक्क आणि कर्तव्य

 मूलभूत हक्क आणि कर्तव्य 

भारतीय संविधानाच्या तिसऱ्या विभागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद आहे. सुरुवातीस भारतीय नागरिकांना सात प्रकारचे मूलभूत हक्क होते. 44 व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क यातून वगळून त्याला फक्त कायदेशीर हक्काचे स्वरूप दिले. राज्यघटनेने दिलेले हे अधिकार नागरिकाला उपभोक्ता येतात परंतु आणीबाणीच्या काळात कलम 20 व 21 खालील हक्क वगळता इतर हक्क स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे.


 सहा प्रकारचे मूलभूत हक्क 

1)समानतेचा समतेचा हक्क 

या हक्काद्वारे भारतीय नागरिकांना कायद्यापुढे समानता व संरक्षण, कोणत्याही कारणास्तव भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा समान संधी ,अस्पृश्यता बंदी व विशेष पदव्यांचे संपुष्टीकरण करून सर्व नागरिकांना समान लेखण्यात आले आहे 

2)स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 

भारतीय नागरिकांना सहा स्वातंत्र्य एकोणिसाव्या कलमाने दिलेली आहेत 

.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य .

.शांततेने व विनाश शस्त्र जमण्याचे.

. संघटना स्थापनेचे भारतात.

. मुक्तपणे संचार करण्याची.

. कोठेही वास्तव्य करण्याचे .

कोणताही व्यापार व्यवसाय आजीवका करण्याचे.

 कलम 20 ते 22 नुसार कायद्याचा भंग झाल्याखेरीज शिक्षा न करण्याचा व एकाच अपराधासाठी अधिक वेळा शिक्षा न करण्याचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यरक्षणाचा व ठराविक प्रकरणी अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षणाचा हक्क आहे.


 21 अ

 नुसार सहा ते 14 वयोगटातील मालकांना मोफत शिक्षण.

3. पिळवणुकी विरुद्ध हक्क कलम 23 व 24 वेठबिकार व मानवी अपव्यापारास मनाई असून 14 वर्षाखालील मुलांना कारखाने खाणे व धोक्याच्या ठिकाणी कामास ठेवण्यास बंदी आहे.

4. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28

 प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा व धर्माचा प्रसार करण्याचा हक्क दिला आहे मात्र सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था टिकविण्याच्या दृष्टीने सरकार या अधिकाराचे नियंत्रण करू शकते.

5. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 व 30 अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी,त्यांना स्वतःची भाषा लिपी व संस्कृती जोपासण्याचा व शैक्षणिक संस्था स्थापन करून त्या चालवण्याचा हक्क दिला आहे.

6. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार कलम 32 मूलभूत अधिकारांवर आक्रमण झाल्यास व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते असे अतिक्रमण दूर करण्यासाठी योग्य तो आदेश काढण्याचा अधिकार न्यायालयास आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अधिकारास राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय संबोधले आहे.

 मूलभूत कर्तव्य 

घटनेत 11 प्रकारची मूलभूत कर्तव्य आहेत.

1. राज्यघटना राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर.

2. भारताचे सार्वभौमत्व ऐक्य आणि अखंडता यांचे संरक्षण करावे.

3. देशाचे संरक्षण करावे तसेच गरजेच्या वेळी देशाची सेवा करावी.

4.स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समोर ठेवलेल्या आदर्शांचे पालन करावे.

5.धर्म भाषा आणि प्रांत यासारख्या भेदभावांना दूर करून देशातील नागरिकांमध्ये एकता व बंधुभाव वाढीस लावण्याचे प्रयत्न करावेत.

6. विशेषतः महिलांप्रती असलेल्या वाईट प्रथांचा त्याग करावा. आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अभिमान बाळगावा तसेच त्या संस्कृतीचे रक्षण करावे.

7. प्राणी मात्रांचे रक्षण करावे तसेच वनसंपदा नदी सरोवरे व सर्वत्र नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करावे 8.मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करावा.

9.हिंसेचे समर्थन करू नये सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे.

10. सामूहिक आणि व्यक्तिगत कार्यात सतत विकासाचा दृष्टिकोन ठेवावा.

11. सहा ते चौदा वयो गटातील पाल्यास पालकांनी शिक्षण देणे.

लोकप्रिय पोस्ट