मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

हेल्पलाइन जरुरी है

 *बस कंडक्टर आणि म्हातारी*

*आणि म्हातारी अमर झाली सत्य घटनेवर आधारित*  नक्की वाचा.....





रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.


तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली.


बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल? 


तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघुन जायचे ना ?'


म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.


इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तिला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर ? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर ?


तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. 


वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.

बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.


म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.


इकडे बस चालक व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे ?' अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय ? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.


इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे ?'

'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी महादू वेंगुर्लेकर.'

'कोणत्या डेपोमध्ये आहे?'

वाहक- 'मालवण.'

आजी - 'मुलेबाळे?'

वाहक- 'आहेत दोन.'


तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.


ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.


ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.

गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.


असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तिने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.

ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, "दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर, कंडक्टर, याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही"

सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर ? त्याला सर्व म्हातारी का देतेय ? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.

दोन तीन दिवसात म्हातारी वारली. 


सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला.


साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.

त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.


वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.

महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या. 


मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.


बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, 'येथे शेजारी हायस्कुल भरते का?'


सरपंचाने, 'हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.' असे सांगितले.

वाहक म्हणाला,'का?गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'


सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'


वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, "हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकुन शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका"

टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. "दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवु"


वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. 


झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.


एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडु नका.


*माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा पोस्ट परत परत एक मेकांना पाठवत राहू.*

*पोस्ट आवडली तर पुढं पाठवा* 


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

चला बोलूया आयुष्यावर

 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्या*


*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू* 

*डोक्यात राग भरल्यावर* 

*फुटणार कसं हसू ?*


*अहंकार बाळगू नका* 

*भेटा बसा डोला* 

*मेल्यावर रडण्यापेक्षा*

*जिवंतपणी बोला* 


*नातं आपलं कोणतं आहे*

*महत्वाचे नाही*

*प्रश्न आहे कधीतरी*

*गोड बोलतो का नाही ?*


*चुका शोधत बसाल तर*

*सुख मिळणार नाही* 

*चूक काय बरोबर काय*

*कधीच कळणार नाही* 


*काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 1 ll*


*चल निघ चालता हो*

*इथे थांबू नको*

*हात जोडून विनंती आहे*

*अशी भाषा नको*


*दारात पाय नको ठेऊ* 

*तोंड नाही पहाणार* 

*खरं सांगा असं वागून* 

*कोण सुखी होणार ?*


*तू तिकडे आम्ही इकडे*

*म्हणणं सोपं असतं*

*पोखरलेलं मन कधीच* 

*सुखी होत नसतं*


*सुखाचा अभास म्हणजे* 

*खरं सुख नाही* 

*आपलं माणूस आपलं नसणे*

*दुसरं दुःख नाही* 


*करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 2 ll*


*एकतर्फी प्रेम करून*

*उपयोग आहे का ?*

*समोरच्याला आपली आठवण*

*कधी तरी येते का ?*


*नातं टिकलं पाहिजे असं*

*दोघांनाही वाटावं*

*कधी गायीने कधी वासराने* 

*एकमेकाला चाटावं*


*तुमची काहीच चूक नाही* 

*असं कसं असेल* 

*पारा शांत झाल्यावरच* 

*सत्य काय ते दिसेल* 


*बघा जरा एकांतात*

*डोळे मिटून आत*

*चूक कबूल करतांना*

*जोडताल दोन्ही हात*


*अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*


*दुसऱ्याला दोष देणं*

*खूप सोपं असतं*

*वेळ आल्यावर कळतं की*

*कुणी कुणाचं नसतं*


*भेटत नाहीत बोलत नाहीत*

*गुन्हा तरी काय ?*

*जे वाटतं ते बोलून*

*रड धाय धाय*


*शक्य आहे ताण जाऊन*

*वाटेल हलकं हलकं*

*गुळणी धरून बसू नका*

*व्हा थोडं बोलकं*


*कोण चूक कोण बरोबर*

*हिशोब करून टाका*

*प्रत्येक क्षण जगून घ्या*

*घालवू नका मोका*


*त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*


*आपली मतं दुसऱ्यावर*

*मुळीच लादू नका*

*समोरच्या व्यक्तीचा*

*अंत बघू नका*


*कोणताही विषय असो*

*जास्त नका ताणू*

*मीच शहाणा बाकी मूर्ख*

*असे नका मानू*


*कोण म्हणतं गोड बोलून*

*प्रश्न सुटत नाही*

*अनेकदा समजूतदार*

*माणूस भेटत नाही*


*जिभेवर साखर ठेवा*

*होणार नाही वाद*

*आवडल्यावर मनातून*

*द्या की हो दाद*


*तडतड बोलून उगीच मनं नका नासु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 5 ll*


*चांगल्याची संगत धर*

*नको बाबा बिघडू*

*राम्याचा हात धर*

*सोडून दे दगडू*


*बचतच कामी येते*

*खर्च कमी कर*

*जरी मोठा झालास तरी*

*रहा जमिनीवर*


*विचार करून पाऊल टाका , कुठे नका फसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 6 ll*


*ठीक आहे चूक नाही* 

*तरीही जुळतं घ्या* 

*बॉडी डेड होण्या आधीच* 

*आलिंगन द्या*


*स्मशानभूमीत चांगलं बोलून*

*काय उपयोग आहे* 

*जिवंतपणी कसे वागलात*

*जास्त महत्वाचं आहे*


*माझ्या कवितेत कोणतंही*

*तत्वज्ञान नाही* 

*तुम्ही खुशाल म्हणू शकता*

*कवीला भान नाही*


*ठीक आहे तुमचा आरोप*

*मान्य आहे मला*

*माझं म्हणणं एवढंच आहे*

*वाद नको बोला* 


*काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ...ll 7 ll*.

बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

मेरा भारत महान

भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त....

 आपल्या देशावर मनापासून प्रेम करत असाल तर 🇮🇳🇮🇳 *तिरंगा* 🇮🇳🇮🇳 फडकवण्याबरोबरच खालील गोष्टी आवर्जून  स्वतः पासून करा व इतरांना पण सांगा 

१. इकडेतिकडे पचापचा थुंकणे बंद करा.  धूम्रपान टाळा.

२. वाट्टेल तिथे कचरा टाकणे थांबवा. 

३. वीज आणि पाणी कमीतकमी वापरा. वाया जाणार नाही याची काळजी घ्या. 

४. कचरा कमीतकमी निर्माण होईल असे नियोजन करा. 

५. ट्रॅफिक नियमांचे पालन करा. डावीकडून ओव्हरटेक करु नका.

६. टॅक्स वेळेत आणि पूर्ण भरा. 

७. वर्षात निदान १ तरी झाड लावा व त्याचे संगोपन करा.

८. मतदान प्रत्येकाने आवर्जून करा पण भ्रष्ट नेत्याला मतदान करू नका.

९. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी अपेक्षा न करता , अशा अनेक गोष्टी वैयक्तिक पातळीवर केल्या तरच आपल्या *भारत* देशाचे भविष्य उज्वल होईल.  भारत देश नक्की महान होईल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

म्हणी (proverbs )

म्हणी (proverbs)



A day after the fair.- वरातीमागून घोडे.

Appearances can be deceptive. - दिसते तसे नसते म्हणून जग फसते.

All work and no play makes Jack a dull boy . -कष्टाबरोबर विरंगुळाही आवश्यक आहे.

A friend in need is a friend indeed- संकटाच्या वेळी/गरजेच्या वेळी जो मदत करतो तोच मित्र.

Absence makes the heart grow fonder. -विरह,अभाव किंवा अनुपस्थितीमुळे एखाद्या गोष्टीची गोडी वाढते.

A new broom sweeps clean.-नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाकडून जास्त काम होते.

Actions speak louder than words.-कृती ही शब्दापेक्षा अधिक प्रभावी असते.

All that glitters is not gold. -चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते.

A stitch in time saves nine.-वेळेत काम केल्याने पुढे होणारा त्रास वाचतो.

A rolling stone gathers no mass-. एक ना धड भाराभर चिंध्या.  

All Roads lead to Rome. -सर्व रस्ते रोमकडे जातात.

Bad news travels fast.-वाईट बातम्या झपाट्याने पसरतात.

Beauty is in the eye of the beholder.- सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

Better late than never.- चांगली गोष्ट करायला कधीच उशीर झालेला नसतो.

Barking dogs seldom bite.- बोलेल तो करेल काय,गरजेल तो वर्षेल काय?

Charity begins at home - सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी.

Cut your coat according to your cloth.- अंथरूण पाहून हातपाय पसरावे.

Don't cross a bridge until you come to it. - अडचण यायच्या आधीच तिची काळजी करू नका.

Don't put all your eggs in one basket.- एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका.

Don't put the cart before the horse.- कार्यकारणभावाचे भान ठेवा.

Don't make a mountain out of a mole hill.-राईचा पहाड करू नका.

Don't count your chickens till they are hatched .- काम पूर्ण होईपर्यंत ते पूर्ण झाले आहे असे म्हणू नका.

Every dog has his day.- प्रत्येकाच्या आयुष्यात चांगला काळ येतो.

Every cloud has a silver lining. - वाइटातून चांगले निघते.

Forbidden fruit is sweetest.-चोरून केलेले कृत्य जास्त गोड वाटते.

Fine feathers make fine birds.शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.

Fools rush in where angels fear to tread.-मूर्ख लोक विचार न करता कृती करतात.

First come first served.-हाजीर तो वजीर.

Health is wealth.- आरोग्य हीच खरी संपत्ती.

Honesty is the best policy- सत्यमेव जयते.

It never rains but it pours.-संकटे आली,की मोठ्या प्रमाणात येतात.

It's no use crying over spilt – milk.-पश्चातबुद्धी कामाची नाही.

Look before you leap.- प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे.

Man proposes,God disposes.- मनुष्य ठरवतो एक, होते दुसरे.

Money makes the mare go.- दाम करी काम.

More haste less speed.-घाई केल्यामुळे काम लवकर पूर्ण होत नाहीच,पण चुका निस्तराव्या लागल्याने विलंब लागतो.

Make hay while the Sun shines.-योग्य वेळी काम पार पाडा,वाहत्या गंगेत हात धुऊन घ्या.

Might is right.-बळी तो कान पिळी.

Nothing succeeds like success.-एकदा यश मिळाले,की यश मिळतच जाते.

Necessity is the mother of invention.-गरज ही शोधाची जननी असते.

No gain without pain.- कष्टाशिवाय फळ नाही.

One man's meat is another man's poison.-एकाला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडणार नाही.

Out of sight , out of mind.-वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो.

One good turn deserves another.-दुसऱ्याच्या सत्कार्याचे कौतुक करू नका,त्याचे अनुसरण करा.

Prevention is better than cure.-खबरदारी ही उपायापेक्षा चांगली.

Rome was not built in a day. कोणतीही गोष्ट यथावकाशच पूर्ण होते.

Say a little and say it well.-थोडे बोला आणि ते चांगले बोला.

Slow and steady wins the race .- शांत,स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो.

Still water runs deep.-खोल पाणी संथपणे वाहते.

Strike while the iron is hot.-परिस्थिती अनुकूल असताना काम करावे.

Simple living and high thinking.-साधी राहणी,उच्च विचारसरणी.

To add fule to the fire.-आगीत तेल ओतणे.

The wearer knows where the shoe pinches.- ज्याचे जळते त्याला कळते.

To give onself airs.- तोरा मिरवणे,दिमाख करणे.

The hand that rocks the cradle rules the world .-जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी.

The doctor after death- बैल गेला नि झोपा केला.

Tit for Tat / Eye for an eye.( and a tooth for a tooth ) - जशात तसे.

The child is father of man.- बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

It's never too late to mend. - चूक सुधारायला कधीच उशीर झालेला नसतो.

That's the way the cookie crumbles.- हीच जगाची रीत आहे.

The early bird catches the worm. - वेळच्या वेळी काम करणाऱ्याला लाभ होतो.

There is a time and place for everything.- प्रत्येक गोष्ट करताना काळ व वेळ पाहणे गरजेचे आहे.

Union is strength.- एकी हेच बळ.

 You can't eat the cake and have it.- काही मिळविण्यासाठी त्याग करायला लागतो.

Where there's a will there's a way.- इच्छा तेथे मार्ग.

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ 2022

 

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ 2022   


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, अगर विकास माहिती व तंत्रज्ञान, गाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बाधकाम (सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपती व्यवस्थापन मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप केले विभाग

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार .

 

   मंगलप्रभात लोढा – पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास

    राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास

    अतुल सावे – सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण

    गिरीश महाजन – ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण

  विजयकुमार गावित – आदिवासी विकास

   रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा

   चंद्रकांत पाटील – उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

    सुरेश खाडे – कामगार

    सुधीर मुनगंटीवार – वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय


  उदय सामंत – उद्योग

   दीपक केसरकर – शालेय शिक्षण आणि मराठी भाषा

   शंभूराजे देसाई – उत्पादन शुल्क

   दादा भुसे – बंदरे आणि खनीकर्म

   गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा आणि स्वच्छता

संदीपान भुमरे – रोहयो योजना, फळोत्पादन

    अब्दुल सत्तार – कृषी

   तानाजी सावंत – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

   यवतमाळ- संजय राठोड – अन्न आणि औषध प्रशासन

लोकप्रिय पोस्ट