स्पर्धेचे युगात जगत असताना माणूस माझच कौतुक कसं होईल, मीच श्रेष्ठ कसा आहे
मलाच कसं बक्षीस मिळेल , दुसऱ्याचं कधी ऐकून न घेणं, माझ्या तेच श्रेष्ठ या भावनेने वागत आहे. आपल्या कलागुणांना वाव देत असतो. मात्र बऱ्याच व्यक्ती या कलागुणांचा अधिकचा देखावा करत आहेत . त्यामुळे दिखाव करण्याची खूप परिणाम मानवी जीवनावर होत आहेत.
दिखावा करणे म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा, प्रत्यक्ष गुणवत्तेपेक्षा किंवा खऱ्या परिस्थितीपेक्षा जास्त मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न होय. हा मानवी स्वभावातील एक कमकुवतपणा असून तो अनेकदा व्यक्तीला चुकीच्या मार्गावर नेतो. आजच्या सामाजिक जीवनात, विशेषतः सोशल मीडियाच्या युगात, दिखावा करणे ही एक सर्वसाधारण सवय बनली आहे.
दिखावा करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे खरे रूप, गुण-दोष स्वीकारणे कठीण जाते. त्यामुळे तो इतरांच्या नजरेत ‘मी अधिक श्रेष्ठ आहे’ हे सिद्ध करण्यासाठी बाह्य स्वरूपावर जास्त भर देतो. यामुळे मनुष्य वास्तवापासून दूर जातो. दाखवलेल्या गोष्टी तात्पुरत्या वाटतात आणि काळानुसार त्याचा फुगा फुटतो.
दिखाव्याचे दुष्परिणामही अनेक आहेत. सर्वप्रथम तर अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे कठीण होते. दुसरे म्हणजे, दिखावा टिकवून ठेवण्यासाठी व्यक्ती आर्थिक व मानसिक ताणाखाली येते. तिसरे म्हणजे, समाजात चुकीच्या मूल्यांची निर्मिती होते. स्पर्धा ही गुणवत्तेची नसून दिखाव्याची होते, ज्यामुळे खऱ्या भावनांना व नैतिकतेला धक्का बसतो.
दिखावा करण्यापेक्षा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सत्यता ही जीवनाला अधिक सुंदर बनवतात. साधेपणातही सौंदर्य असते आणि ते मनाला समाधान देते. जे खरे आहे तेच टिकते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आपले व्यक्तिमत्त्व, कौशल्ये आणि जीवनातील मूल्ये यांवर विश्वास ठेवणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
शेवटी, दिखावा करणे हे एक तात्पुरते समाधान आहे, परंतु प्रामाणिकपणा आणि सत्यतेने जगलेले जीवन हेच यशस्वी आणि आनंदी जीवन होते. त्यामुळे दिखावा न करता स्वतःच्या खऱ्या रूपात जगणे हेच सर्वांत योग्य व आरोग्यदायी आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in