पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांना राज्य सरकारने दिलेला दोन वर्षांचा वाढीव मुदतीचा काळ संपत असल्याने रिक्त होणाऱया राज्याच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. सदानंद दाते यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे
1990 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर आहेत. राज्यात सदानंद दाते हे सेवाज्येष्ठतेमध्ये वरिष्ठ असून त्यांच्याबरोबर संजय वर्मा आणि रितेश कुमार हे अधिकारीदेखील पोलीस महासंचालकाच्या स्पर्धेत होते. परंतु केंद्र सरकारकडून दाते यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले असून राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते हे जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात पदभार स्वीकारणार आहेत.
दाते हे कडक शिस्तीचे आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. डिसेंबर 2026 रोजी दाते सेवानिवृत्त होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in