(क्रमांक आणि अंतर आधारित गणिते)
अंतर = (मुलांच्या क्रमांकामधील फरक) × दोन मुलांमधील अंतर
जागांची संख्या = अंतिम क्रमांक - प्रारंभिक क्रमांक
१. एका रांगेत 4 मीटर अंतरावर एक मुलगा याप्रमाणे मुले उभी केली. 6 व्या व 16 व्या क्रमांकाच्या मुलांमध्ये अंतर किती?
२. एका रस्त्यावर 3 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे 50 झाडे लावली, तर पहिल्या व शेवटच्या झाडात किती अंतर असेल?
३. 100 मीटर लांबीच्या रस्त्यावर 10 मीटर अंतरावर खांब लावायचे आहेत, तर एकूण किती खांब लागतील?
४. 8 मीटर अंतरावर खांब लावले आहेत. 5 व्या व 13 व्या खांबामध्ये किती अंतर असेल?
५. 9 झाडे 2 मीटरच्या अंतरावर लावली आहेत, तर पहिल्या व शेवटच्या झाडात एकूण अंतर किती?
६. पहिल्या व 8 व्या खांबामध्ये 42 मीटर अंतर असल्यास, दोन खांबांमधील अंतर किती?
७. 7 मीटर अंतरावर खांब लावले आहेत. 10 व्या व 25 व्या खांबामध्ये किती अंतर असेल?
८. 21 खांब 10 मीटरच्या अंतरावर लावले असल्यास, पहिल्या व शेवटच्या खांबामध्ये एकूण किती अंतर असेल?
९. 125 मीटर लांबीच्या रस्त्यावर 5 मीटर अंतरावर झाडे लावण्यासाठी किती झाडे लागतील?
१०. 3 मीटर अंतरावर मुले उभी आहेत. 8 व्या व 19 व्या मुलांमध्ये किती अंतर असेल?
११. 14 खांबांमध्ये 32.5 मीटर अंतर असल्यास, दोन खांबांमधील अंतर किती?
१२. 100 मीटर अंतरावर खांब लावले आहेत. 10 व्या व 25 व्या खांबामध्ये किती अंतर असेल?
१३. 1 किलोमीटर (1000 मीटर) रस्त्यावर 10 मीटर अंतरावर किती खांब लागतील?
१४. 10 मीटर अंतरावर झाडे लावली आहेत. 40 व्या व 52 व्या झाडामध्ये किती अंतर असेल?
१५. 50 खांब 10 मीटरच्या अंतरावर लावले असल्यास, पहिल्या व शेवटच्या खांबामध्ये एकूण किती अंतर असेल?
१६. दोन खांबांमधील अंतर 5 मीटर आहे. 20 व्या खांबापासून 60 मीटर अंतरावर कोणता खांब असेल?
१७. 20 मीटर अंतरावर 40 खांब लावले आहेत. 5 व्या व 17 व्या खांबामध्ये किती अंतर असेल?
१८. 250 मीटर रस्त्यावर 5 मीटर अंतरावर दिवे लावण्यासाठी किती दिवे लागतील?
१९. 20 मीटर अंतरावर 100 मुले उभी आहेत. 30 व्या व 90 व्या मुलांमध्ये किती अंतर असेल?
२०. दोन मुलांमधील अंतर 6 मीटर आहे. 5 व्या मुलापासून 108 मीटर अंतरावर कोणता मुलगा असेल?
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian comआणि www.vijayjob.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in