न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे. ते भारताचे 53 वे सरन्यायाधीश बनले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते आज त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देण्यात आली.
न्यायमूर्ती सूर्यकांत हे मध्यवर्गीय कुटुंबातील असून त्यांनी छोट्या शहरातील वकिलीला सुरूवात केली. त्यांची आजवरची करकीर्द उल्लेखनिय राहिली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजपर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये कलम 370 रद्द करणे, बिहारमधील एसआयआर आणि पेगासस स्पायवेअर सारख्या प्रकरणांचा समावेश आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसारमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९८१ मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच १९८४ मध्ये त्यांनी रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
पुढे त्यांनी वकिलीची सुरुवातही हिसार सारख्या छोट्या शहरातूनच केली. त्यानंतर ९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी जस्टीस सूर्यकांत यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. तर २४ मे २०१९ रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
३० ऑक्टोबर २०२४ रोजी जस्टीस सूर्यकांत यांची भावी सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार आज त्यांनी न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. या पदावर ते सुमारे १५ महिने काम करतील. तसेच ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in