मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अगरवाल (Rajesh Aggarwal IAS) यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena) हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
1 डिसेंबरपासून राजेश अगरवाल हे मुख्य सचिव (Chief Secretary of Maharashtra) असतील. राजेश अगरवाल हे 1989 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे या आधी केंद्र सरकारच्या दिव्यांग खात्याच्या सचिवपदाची जबाबदारी होती.
या आधी 30 जून 2025 रोजी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची कारकीर्द आता 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर मुख्य सचिवपदाचा पदभार हा राजेश अगरवाल यांच्याकडे हस्तांतरित केला जाणार आहे.
राजेश अग्रवाल यांना प्रशासनात दीर्घ अनुभव असून त्यांचे काम तितकेच प्रभावी ठरले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, वित्तीय सुधारणा आणि सामाजिक कल्याण योजनांमध्ये अग्रवाल यांनी केलेली कामगिरी त्यांना देशातील प्रगतिशील प्रशासकांपैकी एक बनवते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in