मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

शाळास्तर 'सखी सावित्री' समिती.. रचना आणि कार्य..

 बालहक्क संरक्षण कायदयानुसार सर्वच बालकांच्या हिताचे/हक्कांचे रक्षण करणे अभिप्रेत आहे. सद्यःस्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. घर, शाळा आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ स्मृती दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे.


शाळास्तर 'सखी सावित्री' समिती :


१) शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष


२) शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य


३) समुपदेशक - सदस्य


४) वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ (महिला प्रतिनिधी) – सदस्य


५) अंगणवाडी सेविका सदस्य


६) पोलीस पाटील सदस्य


७) ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी) सदस्य


८) पालक (महिला प्रतिनिधी)- सदस्य


९) शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी) सदस्य


१०) शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव

शाळास्तर 'सखी सावित्री' समितीची कार्ये :


आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला-मुर्तीची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी/बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे,


स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे,


विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला-मुलीचे व त्यांच्या पालकांचे समपदेशन करणे, सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे.


मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.


मुला-मुलींना करिअरसंबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.


मुला-मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे.


आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखणे, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे.


व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुर्तीच्या शिक्षणासाठी मदत करणे.


विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन हास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.


शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेद‌विरहित व समावेशक उपक्रम राबवणे. विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे, अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत असलेल्या ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या 'CHIRAG' या अॅपची माहिती व चाईल्ड हेल्पलाईन नंबर (१०९८) बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.


११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका आयोजित कराव्यात, सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणेकरून मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.


१२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा. केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.


१३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट