शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म भरण्यासाठी इयत्ता चौथी पाचवी सातवी आठवी साठी सुरू..
नियमित शुल्कासह (With Regular Fee)
27 ऑक्टोबर 2025 ते 30 नोव्हेंबर 2025
विलंब शुल्कासह (With Late Fee)
01 डिसेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025
अतिविलंब शुल्कासह (With Super Late Fee)
16 डिसेंबर 2025 ते 23 डिसेंबर 2025
अति विशेष विलंब शुल्कासह (With Special Super Late Fee)
24 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025
दि. 31/12/2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वानी गांभीर्याने नोंद घ्यावी...
शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :-
➤ पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.
> प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
> पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परोक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-
१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित /स्वयं अर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.
४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष :-
> शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-
१) पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी
खालील अटीत बसणारा असावा.
1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा,
2. शाळा ग्रामीण भागातील असावी.
3. फक्त मुलगा असावा, (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
4. फक्त मराठी किवा सेमी मराठी माध्यमातोल असावा.
ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा असेल तर yes पर्याय निवडावा..
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏