*डॅा.कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार - 2025*
शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आयुष्यभर कार्यरत असणाऱ्या देशाच्या माजी शिक्षण सचिव, शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या संस्थापक आणि मुख्य संयोजक डॅा. कुमुद बन्सल यांच्या प्रेरणादायी स्मृती जपाव्यात म्हणून त्यांच्या नावाने *"डाॅ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार"* शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्याकडून 2023 पासून गुणवंत शिक्षकांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. या वर्षीच्या पुरस्काराच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
पुढील व्यक्ती, संस्था या पुरस्कारासाठी शिक्षकाचे नाव सुचवू शकतात. शाळा मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामसेवक/ग्राम विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका/मदतनीस, ग्रामस्थ, शिक्षण विकास मंच समूहातील सदस्य, सहकारी शिक्षक/शिक्षिका, नगरपालिका/महानगर पलिका प्रशासन अधिकारी, शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्ते/शिक्षण प्रेमी. ही यादी केवळ उदाहरणादाखल दिली आहे.
*गुरुवार, दिनांक 02 ऑक्टोंबर 2025 ते शुक्रवार 17 ऑक्टोंबर 2025 पर्यंत* ही नावे कळविता येतील. हे पुरस्कार दिनांक रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित मुंबई येथे होणाऱ्या सोळाव्या राज्यस्तरीय वार्षिक शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात येतील.
ज्या मान्यवरांनी, संस्थानी अशा शिक्षकांचे काम प्रत्यक्ष पाहिले आहे, त्यांच्यासाठी गुणवंत शिक्षकांचे नामांकन करण्यासाठी पुढे गुगल लिंक दिली आहे. पुरस्कारासाठी नामांकन करू इच्छिणाऱ्या मान्यवरांसाठी अथवा संस्थांसाठी *17 ऑक्टोंबर 2025* पर्यंतच हा गुगल फॉर्म खुला राहील याची नोंद घ्यावी. त्यात विचारलेली माहिती भरून पाठवावी. त्यानंतर निवड समिती निवडीची पुढील प्रक्रिया करेल. नामांकन करणाऱ्या व्यक्तींनी स्वत:ला आहे, तेवढीच माहिती (ती कितीही त्रोटक किंवा अपुरी वाटली तरी) द्यावी.*शिक्षकांशी संपर्क साधून माहिती घेऊ नये.*
*नामांकन करण्यासाठी गुगल लिंक:*
*https://forms.gle/67FfugYwU4KAfTzw8*
*पुरस्काराचे स्वरूप-*
*१)* हा पुरस्कार 'डाॅ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार' या नावाने देण्यात येईल.
*२)* एक पुरूष शिक्षक आणि एक महिला शिक्षिका प्रत्येकी एक असे दोन पुरस्कार देण्यात येतील.
*३)* या पुरस्काराची रक्कम २१ हजार रूपये, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे असेल.
डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार -२०२५
या पुरस्कारासाठी नामांकन करू इच्छिणाऱ्या मान्यवरांनी अथवा संस्थांनी घ्यावयाची दक्षता-
*पुरस्काराचे निकष -* - पात्रता व अटी -
*१)* पुरस्कारासाठी शिक्षकांनी स्वतःच स्वतःची शिफारस करू नये. मात्र नामांकन मिळालेल्या शिक्षकांनी ऑनलाईन मुलाखतीला उपस्थित राहावे. शाळेला भेट दिली जाईल तेव्हा मुलाखत देणे, शाळा दाखवणे या बाबी आवश्यक आहेत.
*२)* ज्या शिक्षकांना राज्य, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, अशा शिक्षकांना या पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
*३)* शिक्षकाला किमान १० वर्षे अध्यापनाचा अनुभव असावा.
*४)* कमाल वयोमर्यादा ५५ असावी. त्यापुढील वयोगटातील शिक्षकांचे नावे सुचवू नयेत. त्यांचा विचार केला जाणार नाही.
*५)* इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
*६)* कोणत्याही माध्यमाच्या शिक्षकाचे नामांकन करता येईल.
*७)* प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकाचा पुरस्कारासाठी विचार केला जाणार नाही.
*८)* सर्व प्रकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, उदा. जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा, खाजगी अनुदानित, विनानुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, शासकीय आदिवासी व भटक्या-विमुक्त आश्रमशाळा, दिव्यांगांच्या शाळा यात कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
*९)* निवड करताना संबंधित शिक्षकाची शाळेतील उपस्थिती,अध्ययन-अध्यापनात स्वतःला अद्ययावत ठेवण्याची वृत्ती, उपक्रमातील पुढाकार, त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर होणारा सुपरिणाम, शैक्षणिक कार्यातील सातत्य इत्यादी बाबींचा विचार करण्यात येईल.
*१० )* एक पुरूष शिक्षक, एक महिला शिक्षिका असे दोन राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. मान्यवर अथवा संस्था एकच नामांकन करू शकते याची कृपया नोंद घ्यावी.
*१२)* निवड समितीवर कोणताही दबाव आणू नये. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. याबाबतीत गोपनीयता बाळगण्याची जबाबदारी शिक्षकांची असेल.
*अधिक माहितीसाठी-*
संजना पवार- 8291416216
डॉ. वसंत काळपांडे,
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in