मनःपूर्वक अभिनंदन
भारतीय सिनेमा जगतातील सर्वात प्रतिष्ठित आणि मोठा सन्मान असलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा ७१वा सोहळा मंगळवारी राजधानी दिल्ली येथे संपन्न झाला..
सोहळ्याचे अधिष्ठान भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
मलयाळी सुपरस्टार मोहनलाल यांना त्यांच्या सिनेमा क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादा साहेब फाल्के पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शाहरुख खान 71st National Film Awards, यांना त्यांच्या तीन दशकांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट 'जवान' मधील अभिनयासाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा गौरव मिळाला. हा पुरस्कार त्यांनी विक्रांत मैसी सोबत सामायिक केला. विक्रांत मैसी यांना त्यांच्या चित्रपट '१२वीं फेल' मधील उल्लेखनीय अभिनयासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ज्यामुळे त्यांचा करिअरनाही मोठा टप्पा गाठला आहे.याच सोहळ्यात बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. त्यांना 'मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे' या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीत सुमारे २९ वर्षांचा प्रवास असलेल्या राणी मुखर्जीसाठी हा त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ठरला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏