मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

विश्वास जपता...आला..

 💙 ❤️ *विश्वास जपता आला पाहिजे*

➖➖➖➖➖

 वडापाव विकणारा राजू ट्रेनच्या मागे पळत होता.

त्याच्या छोट्या हातात वडापाव घट्ट पकडलेला होता.

➖➖➖➖➖


ट्रेन सुटताच त्याने ट्रेनमधल्या एका माणसाला तो वडापाव विकला.

दोघांचीही घाई झाली – एकाला पैसे द्यायचे, दुसऱ्याला पैसे घ्यायचे होते.


राजू अजून ट्रेनच्या मागे पळत हात पुढे करत होता,

तो माणूस दारात उभा राहून खिशातून पैशांचे पॉकेट काढत होता.

गाडीने वेग घेतला,

राजू मागे राहू लागला..


क्षणभर त्या माणसाच्या मनात आले –

"आता पैसे देऊन काय उपयोग… जाऊदे, नको द्यायला!"

मनात थोडी कपटभावना आली.


पण…

पॉकेट परत खिशात ठेवताना

चुकून मोबाईल आणि पॉकेट दोन्हीही खाली पडले!


तो घाईघाईने पकडायला गेला,

पण ट्रेन थोडी वेगाने पुढे गेल्याने शक्य झाले नाही.

पॉकेट व मोबाईल ट्रॅकवर पडून राहिले.


त्या माणसाचा जीव घाबरला –

त्यात प्रवासाचे पैसे, खर्चाचे पैसे,

तिकीट सगळं होतं.

तो माणूस कोपऱ्यात जाऊन बसला,

शरमेने आणि भीतीने डोळ्यात पाणी आले.

शेजारी ठेवलेला वडापावसुद्धा खाण्याची त्याची हिम्मत झाली नाही.


थोडावेळ गेला.

गाडी पुढच्या स्टेशनवर थांबली 

TC डब्यात चढला.

तिकीट तपासणी सुरू झाली.


त्या माणसाचा नंबर आला 

तिकीट पॉकेटमध्ये होते,

आता त्याच्याकडे काहीच नव्हते…


विनातिकीट प्रवाशी म्हणून तो पकडला गेला.

दंड होणार अशी ट्रेनमध्ये चर्चा सुरू झाली.

चार लोकांमध्ये झालेल्या अपमानाने त्याची मान खाली गेली.


गडगंज श्रीमंत असूनही ,

आयुष्यभर समाजात स्वाभिमानाने जगला असुनही आज ट्रेनमध्ये चार लोकांत उभं राहणं त्याला सहन होत नव्हतं.


नाइलाजाने कारवाई करण्याची वेळ आली,

ट्रेन मधल्या प्रवाशी मित्रांच्यात नाचक्की झाली 

अपमानाची आज बारी आली,

हे सगळं त्याच्या मनाविरूद्ध चाललेलं होतं,

आयुष्यभर समाजात निस्वार्थीपणे मदत करत आलोय, खूप जणांना चांगला मार्ग दिलाय आणि आज एका साध्या चुकीची शिक्षा इतकी मोठी असु शकते का..?

याचा विचार त्याच्या मनात येतो.

TC कारवाईसाठी त्याला घेऊन जायला निघतो..

तेव्हढ्यात

एक छोटा मुलगा व्हिडियो कॉल वर बोलत त्यांच्या समोर येऊन उभा राहतो.  सर्वजण थांबतात.


त्या मुलाच्या हातात एक पिशवी असते त्यात पॉकेट व मोबाईल असतो.


मुलगा ते त्या माणसाच्या हातात देतो.

तो माणूस ते उघडतो –

पाकिटात सगळे पैसे आणि तिकीट तसेच्या तसे असतात.


क्षणभर तो नि:शब्द होतो.


त्याला काय चाललय काही समजत नाही.

त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात.

तो मुलाला मिठी मारतो आणि रडतो.

तिथला माहोल गंभीर होतो.

एकजण टाळ्या वाजवू लागतो. 

मुलगा कावराबावरा होतो.

सगळेच टाळ्या वाजवू लागतात.

काहीवेळ फक्त टाळ्यांचा आवाज घुमू लागतो.

त्याच्या हातातल्या फोनवरच्या व्हिडियो कॉलवर राजू ते सगळ बघत असतो.

मुलाला आणि राजूला मनोमन खूप आनंद होतो.


तो माणूस TC ला तिकीट दाखवतो.


TC हसतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो

आणि काहीही न बोलता पुढे निघून जातो.


---


तो माणूस मुलाला विचारतो –

"हे तुझ्याकडे कसे आले?"


मुलगा हसत सांगतो –

"मी मागच्या डब्यात खेळणी विकत होतो.

तुमचे पॉकेट पडलेले माझ्या भावाने पाहिले.

त्याने उचलून पिशवीत घालून माझ्याकडे डब्यात फेकले

आणि मला व्हिडियो कॉल करून तुम्हाला दयायला सांगितले.

त्याचे नाव राजू आहे.

त्यानेच तुम्हाला वडापाव विकला होता."


त्या माणसाला अपराधीपणाने पुन्हा रडू येते.

"माझ्या मनात त्याला फसवण्याची भावना आली होती.

पण राजुने आणि तू प्रामाणिकपणा आणि मनाचा मोठेपणा दाखवून माझी सगळी पैश्याची श्रीमंती आणि समाजातली खोटी प्रतिष्ठा याची किँमत शुन्य आहे हे मला दाखवून दिलं.

खोटेपणाला किंमत शून्य असते हे तुम्ही मला शिकवलं बाळांनो..... मला माफ करा.."


त्याने मुलाच्या हातात पॉकेट मधील सगळे पैसे ठेवले.

पण त्या मुलाने पैसे घेतले नाहीत त्याला नकार दिला.


दादाने फक्त वडापावचे पैसे घ्यायला सांगीतले आहेत असे सांगीतले. आणि तेव्हढेच पैसे घेऊन तो मुलगा हसत-हसत पुढे निघून गेला.

टाळ्यांचा आवाज ट्रेनमध्ये अजूनही स्पष्ट घुमत होता.

आणि त्या पोरांच्या चेहऱ्यावर करोडो रुपये कमावल्याची भावना झळकत होती.


*सारांश*

*आयुष्यात काय मिळवायच आहे..?*

*पैशापेक्षा मोठा "प्रामाणिकपणा" असतो*

*प्रत्येक माणसाला त्याचे मन आणि मूल्यं जपता आली पाहीजेत.*

*विश्वास जपता आला पाहिजे* 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट