मनपूर्वक अभिनंदन 🌹 🌹
दिल्लीच्या रणजी संघाचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथील बीसीसीआयच्या मुख्यालयात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
४५ वर्षीय मिथुन हे बीसीसीआयचे ३७वे अध्यक्ष ठरले. इतिहासात प्रथमच एखादा अनकॅप्ड खेळाडू बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.
रॉजर बिन्नी यांनी वयाची ७० वर्षे पूर्ण केल्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या नव्या धोरणानुसार त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मिथुन यांचेच पारडे अध्यक्षपदासाठी जड मानले जात होते. त्यांनी एकट्यांनीच या पदासाठी अर्ज केला होता. अखेरीस रविवारी झालेल्या बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. मिथुन हे प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेले सलग तिसरे बीसीसीआयचे अध्यक्ष ठरले आहेत. यापूर्वी सौरव गांगुली व रॉजर बिन्नी अनुक्रमे बीसीसीआयचे अध्यक्ष होते
.भारताचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा व डावखुरा वेगवान गोलंदाज रुद्रप्रताप सिंग यांचा राष्ट्रीय निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. मुंबईकर अजित आगरकर हे निवड समितीचे अध्यक्ष असून आता या समितीत ओझा, रुद्रप्रताप, शिवसुंदर दास, अजय रत्रा यांचा समावेश आहे. तमिळनाडूच्या एस. शरथ यांची राष्ट्रीयऐवजी पुन्हा कनिष्ठ विभागाच्या निवड समितीत बदली झाली आहे. निवड समितीत प्रत्येक विभागाचा (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य) एक सदस्य असणे आवश्यक आहे.
अमिता शर्मा महिला समितीच्या अध्यक्ष
भारताच्या ४३ वर्षीय माजी क्रिकेटपटू अमिता शर्मा यांनी महिलांच्या राष्ट्रीय निवड समिती अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे अमिता यांची निवड करण्यात आली. अमिता यांनी २००२ ते २०१४ या काळात ११६ एकदिवसीय, ४१ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. महिलांच्या निवड समितीत सुलक्षणा नाईक, जया शर्मा, क्षमा डे, श्रवंती नायुडू यांचा समावेश आहे. महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर ही नवी समिती आपापली पदे स्वीकारतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in