'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ साठी अर्ज करण्याचे आवाहन...!
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'च्या पाचव्या वर्षासाठीची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष आणि फेलोशिपच्या निमंत्रक खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या फेलोशिपची घोषणा करण्यात आली.
साहित्य क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी या फेलोशिपच्या माध्यमातून प्रेरीत केले जाणार आहे. निवड समितीच्या वतीने ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर’ साठी एकूण १२ फेलोंची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या फेलोंची घोषणा १ डिसेंबर २०२५ रोजी केली जाईल.
अधिक माहितीसाठी - https://www.sharadpawarfellowship.com/fellowships/literary-fellowship
#sharadpawarfellowship

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in