मनःपूर्वक अभिनंदन RCB
अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १९० धावा केल्या. या धावांचा पाठलाग पंजाब किंग्सने २० षटकात ७ बाद १८४ धावा केल्या.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयात कृणाल पांड्याने ४ षटकात १७ धावा खर्च करत २ विकेट्स घेऊन मोलाचा वाटा उचलल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या अंतिम सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेत्या संघातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या पुरस्कार विजेत्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला २० कोटींचे, तर उपविजेत्या पंजाब किंग्स संघाला १२.५० कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे.
आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम खेळाडू मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव ठरला. त्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
तसेच आयपीएल २०२५ स्पर्धेत सर्वाधिक ७५९ धावा करणाऱ्या साई सुदर्शनने ऑरेंज कॅप मिळवली, तर सर्वाधिक २५ विकेट्स घेऊन पर्पल कॅप प्रसिद्ध कृष्णाने पटकावली. या दोघांनाही प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. हे दोघेही आयपीएल २०२५ स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळले.
आयपीएल २०२५ मधील पुरस्कार विजेते आणि बक्षीस रक्कम
अंतिम सामन्यातील पुरस्कार
अंतिम सामन्यातील सामनावीर - कृणाल पांड्या (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - ५ लाख
अंतिम सामन्यातील सुपर स्ट्रायकर - जितेश शर्मा (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १ लाख
अंतिम सामन्यातील सर्वाधिक चौकार - प्रियांश आर्या (पंजाब किंग्स) - १ लाख
अंतिम सामन्यातील सर्वाधिक षटकार - शशांक सिंग (पंजाब किंग्स) - १ लाख
अंतिम सामन्यातील फँटेसी प्लेअर - शशांक सिंग - १ लाख
सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारा गोलंदाज - कृणाल पांड्या (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
आयपीएल २०२५ हंगामाचे पुरस्कार
विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२० कोटी)
उपविजेता - पंजाब किंग्स (१२.५० कोटी)
आयपीएल २०२५ हंगामातील उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सुपर स्ट्रायकर - वैभव सुर्यवंशी (राजस्थान रॉयल्स) - कार
आयपीएल २०२५ हंगामातील फँटेसी प्लेअर - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील व्हॅल्युएबल प्लेअर (मालिकावीर) - सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सर्वाधिक चौकार - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सर्वाधिक षटकार - निकोलस पूरन (लखनौ सुपर जायंट्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सर्वोत्तम झेल - कामिंडू मेंडिस (सनरायझर्स हैदराबाद) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सर्वाधिक डॉट बॉल - मोहम्मद सिराज (गुजरात टायटन्स) - १० लाख
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १० लाख
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - प्रसिद्ध कृष्णा (गुजरात टायटन्स) - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील फेअर प्ले - चेन्नई सुपर किंग्स - १० लाख
आयपीएल २०२५ हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन) - ५० लाख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏