जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आज २९ जून २०२५ रोजी दिली.
WHO म्हणजेच 'जागतिक आरोग्य संघटना' आणि ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी देशाच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. 'जागतिक आरोग्य संघटना' म्हणजेच WHO ने भारताला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले आहे.
ट्रॅकोमा म्हणजे काय?
ट्रॅकोमा हा डोळ्यांचा एक जिवाणूजन्य संसर्ग आहे ज्यामुळे कायमचे अंधत्व किंवा दृष्टीदोष होऊ शकतो. हा विषाणू क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे पसरतो. हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या अश्रूंद्वारे, त्याच्या संपर्कातून, थंडी, कपडे, अन्न आणि इतर दूषित वस्तूंद्वारे पसरतो. माश्या देखील या विषाणूचा प्रसार करतात असे ज्ञात आहे.
डोळ्यांना कुठे नुकसान पोहचवतो हा आजार
हा विषाणू डोळ्याच्या कॉर्नियल भागाला नुकसान पोहोचवतो. यामुळे ट्रायकिआसिस आणि एन्ट्रोपियन नावाच्या डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात, जर या संसर्गावर लवकर उपचार केले गेले तर दृष्टी कमी होणे टाळता येते.
ट्रॅकोमा ४० देशातील आरोग्य समस्या
ट्रॅकोमा ही सुमारे ४० देशांमध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे सुमारे १.९ दशलक्ष लोकांमध्ये अंधत्व किंवा दृष्टीदोष निर्माण होतो. ट्रॅकोमामुळे होणारे अंधत्व बरे होऊ शकत नाही. परंतु या विषाणूचे उच्चाटन करून हा आजार रोखता येतो.
१९५० आणि ६० च्या दशकात भारतात हा विषाणू निर्मूलनाच्या टप्प्यावर पोहोचला होता. सार्वजनिक आरोग्य आणि सामुदायिक पाठिंब्याच्या मदतीने ट्रॅकोमा निर्मूलन करण्यात आला असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏