खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील राहत्या घरी झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ होते.
जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, सर फ्रेड हॉईल यांच्यासोबत “हॉयल-नारळीकर गुरुत्वाकर्षण सिद्धांत” मांडला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण (१९६५) आणि पद्मविभूषण (२००४) या सन्मानांनी गौरविले आहे. त्यांनी ‘आयुका’ (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना केली आणि संचालक म्हणून कार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in