ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी लेबर पक्षाची पुन्हा विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. त्यामुळे अँथनी अल्बानीज यांना सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळणार आहे.
गेल्या २१ वर्षांत ही कामगिरी करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत.
विरोधी पक्षाचे नेते पीटर डटन यांनी शनिवारी मतदारांचा कल स्पष्ट झाल्यावर आपला पराभव मान्य केला. ''आम्ही प्रचार करण्यात कमी पडलो आणि मी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,'' असे ते म्हणाले. तसेच हा लेबर पक्षासाठी ऐतिहासिक प्रसंग असल्याची प्रतिक्रिया त्यांनी मान्य केले आणि अल्बानीज यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in