२८ सप्टेंबर दिनविशेष खालीलप्रमाणे आहेत:
जन्म:
* १९०७: भगतसिंग, भारतीय क्रांतिकारक.
* १९२९: लता मंगेशकर, भारतीय गायिका.
* १८९८: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार.
* १९८२: अभिनव बिंद्रा, ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.
मृत्यू:
* १८९५: लुई पाश्चर, रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ.
* १९५३: एडविन हबल, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ.
* १९५६: विल्यम बोईंग, बोईंग विमान कंपनीचे संस्थापक.
* १९६७: सेनापती बापट, सुविख्यात क्रांतिकारक व थोर तपस्वी.
इतर महत्त्वाच्या घटना:
* १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
* १९९४: एमएस एस्टोनिया क्रूझ हे जहाज बाल्टिक समुद्रात बुडाले.
* २०१५: भारताची पहिली वेधशाळा ऍस्ट्रोसॅटचे इसरोने प्रक्षेपण केले.
* २०१८: सुलावेसी भूकंप २०१८ - या ७.५ रिश्टर भूकंपामुळे निर्माण झालेल्या मोठ्या त्सुनामी दुर्घटने मध्ये किमान ४३४० लोकांचे निधन.
* १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
* १९९९: महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in