१९ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १२१६: इंग्लंडचा राजा जॉनच्या मृत्यूनंतर त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी.
* १७८१: यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली.
* १८१३: लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा पराभव.
* १९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.
* १९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.
* १९४४: दुसरे महायुद्ध - अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.
* १९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपूर्द.
* १९९३: पुण्याजवळील महा-रेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.
* १९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.
* २०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
* २००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.
* २०१४: महाराष्ट्र व हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर.
* २०१५: कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत लिबरल पार्टीने नऊ वर्ष सत्तेवर असलेल्या कंझर्वेटिव पार्टीचा पराभव केला.
* २०१५: कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांच्या संशोधनातून पृथ्वीवर ४.१ अब्ज वर्ष पूर्व जीवन अस्तित्वात असल्याचे संकेत.
जन्म:
* १८७५: सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान.
* १८९५: सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १९०२: दिवाकर कृष्ण केळकर, मराठी कथाकार.
* १९१०: सुब्रमण्यन चंद्रशेखर, भारतीय-अमेरिकन खगोल वैज्ञानिक.
* १९२०: पांडुरंगशास्त्री आठवले, स्वाध्याय परिवाराचे संस्थापक.
* १९२५: डॉ. वामन दत्तात्रय वर्तक, वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक.
* १९३६: गीतकार शांताराम नांदगावकर.
* १९५४: प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या.
* १९६१: अभिनेते सनी देओल.
मृत्यू:
* १२१६: इंग्लंडचा राजा जॉन.
* १९८७: गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
* २००६: श्रीविद्या, दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री.
* २०११: कक्कानादन, मल्याळम लेखक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in