२१ एप्रिल दिनविशेष जन्म-मृत्यू खालीलप्रमाणे:
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
* १८४७: बाळाजी प्रभाकर मोडक - कालनिर्णयचे जनक यांचा जन्म.
* १८६४: मॅक्स वेबर - जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म.
* १८८७: मानबेंद्रनाथ रॉय - भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक, क्रांतिकारक यांचा जन्म.
* १९०९: ज. द. गोंधळेकर - मराठी चित्रकार यांचा जन्म.
* १९२६: एलिझाबेथ (दुसरी) - इंग्लंडची राणी यांचा जन्म.
* १९५०: शिवाजी साटम - भारतीय अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू:
* ७४८: गेन्शो - जपानी सम्राज्ञी यांचे निधन.
* १०१३: पोप अलेक्झांडर दुसरा यांचे निधन.
* १५०९: सातवा हेन्री - इंग्लंडचा राजा यांचे निधन.
* १९१०: सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन - अमेरिकन लेखक यांचे निधन.
* १९१८: मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन - जर्मन लढाऊ वैमानिक यांचे निधन.
* १९३८: मुहम्मद इकबाल - भारतीय कवी यांचे निधन.
* १९६४: भारतीदासन - द्रविड चळवळीला चालना देणारा तमिळ कवी यांचे निधन.
* १९९६: अब्दुल हफीज कारदार - पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि लेखक यांचे निधन.
* २००५: फिनोझ खान - भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू यांचे निधन.
* २००६: जॉनी चेकेट्स - न्यूझीलंडचे वैमानिक, दुसऱ्या महायुद्धातील फ्लाइंग एस यांचे निधन.
* २०१३: शकुंतला देवी - भारतीय गणितज्ञ यांचे निधन.
महत्त्वाच्या घटना:
* १९८९: चीनमध्ये बीजिंग येथील तियानमेन चौकात विद्यार्थ्यांचे लोकशाहीच्या मागणीसाठी आंदोलन.
* १९९६: भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर लोकसभा सदस्यांना लाच दिल्याचा आरोप.
* २००४: इस्रायलने पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल अझीझ रांतिसी याला हेलिकॉप्टरने केलेल्या रॉकेट हल्ल्यात ठार केले.
* २०१९: श्रीलंकेतील कोलंबो शहरातील चर्च आणि हॉटेलांमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in