ब्लॉग ..आपल्या मनातील विचारांचे लेखन करण्यासाठी मुक्त व्यासपीठ
तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या ज्ञानाचा प्रसार करायचा असेल किंवा आपल्या मनातील विचार भावना जगभर प्रसिद्ध करायच्या असतील तर एकमेव उत्तम मार्ग म्हणजे ब्लॉग ..
ब्लॉग एक अशी गुगलमार्फत सेवा आहे की आपण गुगलवर अकाउंट क्रिएट करून आपल्याला ज्या विषयाचे नॉलेज आहे किंवा आपल्या मनातील विचार भावना आपण जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडू शकतो यासाठी ब्लॉगमध्ये पोस्ट चे लेखन करून ती प्रसिद्ध करू शकतो
जगातील कोणत्याही वाचकांना ती गुगल ट्रान्सलेटर च्या मदतीने आपल्या मातृभाषेत वाचता येते. वाचकांना आपल्या लेखावर ती प्रतिक्रिया देता येते. म्हणजेच आपले लेखन जगभरात कोणीही वाचू शकतं त्याची त्याला मदत होऊ शकते.
आपल्या आवडीच्या विषयांमध्ये आपण लेखन करू शकतो ब्लॉगला त्या पद्धतीचे शीर्ष देऊ शकतो
आकर्षक डिझाईन करून वाचकांना सहज आणि सोप्या पद्धतीत आपले ज्ञान किंवा विषय सहज उपलब्ध करून देण्यासाठी ब्लॉग हे सर्वोत्तम माध्यम आहे
*गुगल मार्फत ही विनामूल्य सेवा असल्यामुळे जीमेल अकाउंट असलेल्या व्यक्ती ब्लॉग चे खाते उघडू शकतात* .
ब्लॉगचे अकाउंट सुरू झाल्यानंतर पोस्ट या टॅब वरती क्लिक करून आपण आपल्या पोस्टचे लेखन करू शकतो लेखन पूर्ण झाल्यावरती पब्लिश केल्यानंतर वाचकांना ती पोस्ट लिंक द्वारे पाठवू शकतो.
Stast त्यामध्ये ती पोस्ट किती जणांनी वाचली आहे हे पाहू शकतो
कमेंट मध्ये त्या पोस्टमध्ये वाचकांनी केलेल्या कमेंट वाचू शकतो
ब्लॉगमध्ये आपण पेज मध्ये सुद्धा लेखन करू शकतो
Layout द्वारे आपण ब्लॉग ची डिझाईन आपल्याला आकर्षक वाटेल अशा पद्धतीने तयार करू शकतो
Theme या टॅब द्वारे आपण आपल्या ब्लॉगसाठी योग्य theme वापरू शकतो theme आपण सुद्धा निर्माण करू शकतो
सेटिंग या टॅब द्वारे ब्लॉग ची सर्व नियंत्रण आपणास करता येते
ब्लॉगचे नाव, विषय, भाषा, गोपनीयता, आपले प्रोफाईल, अशा अनेक प्रकारची माहिती आपणास सेटिंग या टॅब मध्ये उपलब्ध आहे.
मी माझा vkbeducation.com नावाचा ब्लॉग सुरू केला आहे शिक्षणाशी संबंधित माहिती यामध्ये प्रसिद्ध केली जाते शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा टेस्ट, विशेष राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा टेस्ट, शिक्षकांसाठी महत्त्वाचे जीआर, प्रेरणादायी लेख, महापुरुषांची माहिती, सामान्य ज्ञान, बोधकथा,
चालू घडामोडी, स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी टेस्ट, विविध परीक्षांची माहिती अशी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे
मला माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर जगातील विद्यार्थ्यांनाही याची माहिती सहज उपलब्ध होते याचा मला खूप आनंद आहे. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना समाजालाही याचा उपयोग होतो याचे मला समाधान आहे. अनेक वाचकांचे मला फोन येतात सर तुमच्या ब्लॉग छान आहे असं म्हटल्यावर मलाही खूप अजून काम करण्यास प्रेरणा मिळत आहे . माझ्यासारखे अनेक ब्लॉग निर्माण व्हावे यासाठी मी अनेक शिक्षकांना विनामूल्य मार्गदर्शन करत आहे . अँड्रॉइड मोबाईल वरती ब्लॉगचं ॲप प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार आणि ब्लॉग निमित्त हार्दिक शुभेच्छा
विजयकुमार किसन भुजबळ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in