मनःपूर्वक अभिनंदन टीम इंडिया
दुबईच्या रणांगणात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या महाअंतिम मुकाबल्यात भारताने न्यूझीलंडला ४ गडी आणि ६ चेंडू राखून पराभूत केले. याबरोबरच भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्सचा किताब मिळवला. तसेच १२ वर्षांनी ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवले. कर्णधार रोहित (८३ चेंडूंत ७६ धावा) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या रोमहर्षक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ७ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र रोहितने साकारलेल्या झुंजार अर्धशतकाला श्रेयस अय्यर (६२ चेंडूंत ४८ धावा), के. एल. राहुल (३३ चेंडूंत नाबाद ३४) यांची उपयुक्त साथ लाभली. त्यामुळे भारताने ४९ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रवींद्र जडेजाने (६ चेंडूंत नाबाद ९ धावा) विल ओरूर्कच्या गोलंदाजीवर चौकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in