श्री. शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सातारा विभाग यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुभाषनगर कोरेगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसोबत *वैचारिक शिवजयंती* साजरी करण्यात आली.
श्री शिवशंभु प्रतिष्ठान यांचे प्रमुख उद्दिष्ट *"आपल्या महाराजांचा इतिहास असणारे गड किल्ले प्लास्टिक मुक्त व स्वच्छ ठेवणे हा विचार सर्वांमध्ये रुजवणे"* हे आहे या अनुषंगाने संस्थेच्या सदस्यांनी याबाबत मार्गदर्शन केले व *"ही शिवजयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करावी"* हा संदेश दिला.
त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गड किल्ल्यांची माहिती पुस्तिका व वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दर्शवला, विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण केल्या, छोट्या व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी महाराजांबद्दल भाषण व पोवाडे सादर केले. त्यांचा सन्मान शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये श्री शिवशंभु प्रतिष्ठान यांचे सातारा विभागातील सदस्य ,शाळेचे मुख्याध्यापक ,संस्थापक ,अध्यक्ष व प्राध्यापक उपस्थित होते.
शिवशंभु प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in