26 मे रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना, जन्म आणि मृत्यू खालीलप्रमाणे आहेत:
महत्त्वाच्या घटना:
* 1947: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले होते.
* 1989: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
* 1999: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
* 2014: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
* 2022: गीतांजली श्री - लिखित रेत समाधी या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरीत टॉम्ब ऑफ सेंड (Tomb of Sand) पुस्तकासाठी २०२२ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला.
जन्म:
* 1885: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म.
* 1945: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म.
* 1951: पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर सॅली राइड यांचा जन्म.
मृत्यू:
* 1703: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in