24 जुलै दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९११: अमेरिकन पुरातत्त्वशास्त्रज्ञ हिराम बिंघम यांनी पेरूमध्ये माचू पिचू या इंका साम्राज्यातील शहराचा शोध लावला.
* १९६९: अपोलो ११ या अंतराळयानातून नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स हे अंतराळवीर पृथ्वीवर परतले.
* २०१९: बोरिस जॉन्सन युनायटेड किंगडमचे 77 वे पंतप्रधान बनले.
* २०००: विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम ह्या भारताच्या पहिला महिला ग्रँडमास्टर बनल्या.
* १९९७: महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
* १९८७: हुल्डा क्रुक्स यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जपान मधील सर्वोच्च शिखर माउंट फुजीवर चढाई केली. त्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या.
जन्म:
* १९६९: जेनिफर लोपेझ - अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका.
* १९४७: जहीर अब्बास - पाकिस्तानी फलंदाज.
* १९४५: अझीम प्रेमजी - विप्रो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण.
* १९३७: मनोज कुमार - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते - पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार.
* १९२८: केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री.
मृत्यू:
* २०२०: अमला शंकर - भारतीय नृत्यांगना.
* २०१७: हर्षिदा रावल - भारतीय गुजराती पार्श्वगायिका.
* २०१२: रॉबर्ट लिडले - सीटी स्कॅनचे शोधक.
* १९८०: पीटर सेलर्स - इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक.
* १९८०: उत्तम कुमार - बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏