अन्ना राजम जॉर्ज
(१७ जुलै १९२७)
(१७ सप्टेंबर २०१८)
नदी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणं हे काही सहजसोपं सदी काम नाही. पण ती परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन भारतातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला तो अन्ना राजम जॉर्ज यांनी!
मुंबईतल्या न्हावाशेवा इथल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या पहिल्यावहिल्या संगणकीय बंदराच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित अधिकारी अशीही त्यांची खास ओळख. त्यांचा जन्म केरळमधल्या एर्नाकुलम जिल्ह्यातला. चेन्नई विद्यापीठातून पदव्युतर पदवी प्राप्त केल्यानंतर प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निश्चय त्यांनी केला
सनदी सेवेचं क्षेत्र महिलांसाठी नाही. त्यामुळे लग्नानंतर तुम्हाला नागरी सेवेत ठेवता येणार नाही' असं त्यांना आणि पहिल्याच प्रयत्नात वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी १९५१ मध्ये त्या आयएएस झाल्या. नुसतंच सांगण्यात आलं नाही, तर त्यांच्या नियुक्तिपत्रातही तसा उल्लेख करण्यात आला. पण त्या मागे हटल्या नाहीत. सर्व प्रकारच्या शारीरिक व बौद्धिक चाचण्यांना सामोरं जायची तयारी त्यांनी दर्शवली. घोडेस्वारी, रायफल आणि पिस्तूल शूटिंगचं कौशल्य आत्मसात केलं. परंतु, निवड समितीने विदेश सेवेत किंवा केंद्रीय सेवेत रूजू व्हा, असं सांगितलं. मात्र, ते न जुमानता त्यांनी प्रशासकीय सेवेतच राहण्याचा स्वतःचा निश्चय कायम ठेवला. त्यांनी नियमाला आव्हान दिलं, त्या लढल्या आणि जिंकल्याही! सनदी सेवेत रूजू झाल्यानंतर दोन पंतप्रधान आणि सात मुख्यमंत्र्यांबरोबर अन्ना राजम जॉर्ज यांनी काम केलं. तसंच १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठीचं प्रभारीपणही नितांत जबाबदारीने निभावलं.
सौजन्य कस्तुरी पुढारी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in