मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

समाधान मिळेल का कुठे....

 *समाधानाची व्याख्या*

बंद पडलेली कार रस्त्यावर लावून, 

मी बस मधे चढलो तर खरं. 

पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. 

बसायला जागा नव्हती. 

तेवढ्यात एक सीट रिकामी झाली.

पुढचा एक जण  सहज 

तेथे बसू शकत होता ....

पण त्याने ती सीट मला दिली.  


पूढच्या stopवर पुन्हा तेच घडले. 

पुन्हा  आपली सीट 

त्याने दुसऱ्याला दिली. 

आमच्या पूर्ण बस प्रवासात 

हा प्रकार चारदा  घडला.

बर हा माणूस,

अगदी सामान्य दिसत होता, 

म्हणजे कुठे तरी मजदूरी करून

घरी परत जात असावा,

आता शेवटच्या stopवर 

आम्ही सर्वच उतरलो. 


तेंव्हा उत्सुकता 

म्हणून मी त्याच्याशी  बोललो.  

विचारले 

*प्रत्त्येक वेळी तुम्ही  तुमची सीट*

*दुसऱ्याला का देत होता??*  


तेंव्हा त्याने दिलेले उत्तर,


*मी शिकलेला  नाही हो.*

*अशिक्षित आहे मी.*

*एके ठिकाणी कमी पैशावर काम करतो, आणि माझ्या जवळ कोणाला द्यायला काहीच नाही.*

*ज्ञान नाही , पैसा नाही.*

 

*तेंव्हा मी, हे असे रोज करतो.*

*हेच मी सहज‌ करू शकतो.*  


*दिवसभर काम केल्यानंतर* 

*अजून थोड्या वेळ उभं राहणं मला जमते*

*मी तुम्हाला माझी जागा दिली,*

*तुम्ही धन्यवाद म्हणालात,*

*त्यातच मला खूप समाधान  मिळाले,*

*मी कोणाच्या  तरी कामी  आलो ना?* 

*कोणाला कायतरी दिल्याच.*

*असं मी रोज करतो*

*माझा नियमच झाला आहे••* 

आणि 

*रोज मी आनंदाने घरी जातो.*


उत्तर ऐकून मी थक्कच झालो. 

त्याचे विचार व समज  बघून!


याला  

*अशिक्षित  म्हणायचे का?*


*काय समजायचे ?*

 

*कोणाकरिता,* 

*काही तरी करायची इच्छा,*

*ती पण स्वतः ची परिस्थिती*

*अशी असताना!*


*मी कशा रीतीने मदत  करू शकतो?*


त्यावर शोधलेला  हा उपाय बघून  

*देव सुध्दा आपल्या या  निर्मीती वर खुष झाला असेल!*

*माझ्या सर्वोत्तम कलाकृती पैकी ही एक कलाकृती, असं दिमाखात सांगत असेल!*

        

त्याने मला खूप गोष्टी शिकवल्या  

*स्वतः ला हुषार शिक्षित समजणारा मी, त्याच्या समोर  खाली मान घालून*

*स्वतः चे   परिक्षण करू लागलो.*


*किती सहज, त्याने त्याच्या समाधानाची व्याख्या सांगितली.* 


*देव त्याला,*

*नक्कीच पावला असणार..*


मदत ही खूप महाग  गोष्ट आहे  

कारण मनाने श्रीमंत असणारे 

खूप कमी लोक असतात .•••••

*सुंदर कपडे ,हातात पर्स , मोबाईल , डोळ्यांवर गॉगल, चार इंग्लिश चे शब्द येणे म्हणजेच  सुशिक्षत  का ?*


*हीच माणसाची खरी ओळख का ?*

 

*मोठं घर ,मोठी कार , म्हणजे मिळालेले समाधान का ??*


*कोण तुम्हाला केंव्हा काय शिकवून जाईल, आणि  तुमची धुंदी उतरवेलं  सांगता येत नाही!*

   *या माणसाच्या संगतीने*

*माझे विचार स्वच्छ झाले.*

   

म्हणतात ना •••

    *" कर्म से  पहचान होती है इंसानों की ।*

      *वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में "।* ✨✨

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.