मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

अनुताई बालकृष्ण वाघ


           

  *अनुताई बालकृष्ण वाघ* (समाजसेविका व शिक्षणतज्ञ ) *जन्म : १७ मार्च १९१०* (मोरगाव, पुणे) *मृत्यू : २७ सप्टेंबर १९९२* (कोसबाड) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.


 *शिक्षण व जीवन*

          अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले. असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या.


🏅 *पुरस्कार आणि सन्मान*

           भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच पद्मश्रीने सन्मानित केले गेले.


✍️ *अनुताईं वाघ यांनी लिहिलेली पुस्तके*

कोसबाडच्या टेकडीवरून (आत्मचरित्र)

दाभोणच्या जंगलातून

शिक्षणविषयक ग्रंथ (अनेक)

सईची सोबत (कथासंग्रह)

सहजशिक्षण

                                                                                                                                  

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in

लोकप्रिय पोस्ट