मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

जीवन आनंदाचे गाणे..

 *गंभीर बनू नका*


फार गंभीर बनून जगू नका.हे विश्व करोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले.कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका.

मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका.सर्वांशी प्रेमाणे रहा.धर्म, जात,तत्व , या गोष्टी माणसाने निर्माण केल्या त्यामध्ये अडकून पडू नका.स्वतः चा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका.

इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका.त्यांचे जीवन ते जगले तुम्ही तुमचे जीवन जगा व इतरांना जगू द्या.

आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे

ओळखा उगीच फालतु गोष्टीत नाक खुपसू नका.

हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना ,शुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका.जीवन गंमतीने जगा.जरा मोकळेपणाने हसा.इतरांनाही आनंदी करा.लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका.नसती वांझोटी चिंता करु नका.लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या.

सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला.त्यामध्ये कमीपणा मानू नका.तुम्ही स्वतः ला काहीही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.

कुणाचाही द्वेष करु नका.सूडबुद्धीने वागू नका.आपल्या अवतीभोवतीचे जग बघा.किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग बघा.पाखरांचे थवे बघा.बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटातुम्हाला खुणावत आहेत. जा उंच डोंगरावर किती प्रेमाणे तो डोंगर खांद्यावर खेळवतो.विचारा त्या कोकीळेला ,इतकी सुंदर कशी गातेस?

विविध रंगाची फूले बघा.आयुष्यात विविध रंग

भरा.एकसारखे जीवन जगू नका.नवी ठिकाणे

नवी माणसे यांच्याशी मैत्री करा.प्राण्यांशी संपर्क ठेवा,त्यांचे जगणे बघा.कटकटी कमी करा.अधिक आनंदी जगा.आनंदाने जगण्यासाठी सर्वांना मनमोकळ्या शुभेच्छा! 💐💐🌹🌹🙏🙏🙏 धन्यवाद 

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.