वीज कडाडत असताना काय काळजी घ्याल?
1. मैदानात, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी झाडावर चढू नका
2. विजेचा खाब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादींजवळ उभे राहू नका.
3. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका.
4. दुचाकी वाहन, सायकल ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा
5. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका. 6. दोन व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
7. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.
8. पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा...
9. दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
10. पोहणारे, मच्छीमारी करणारे लोकांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.
11. पक्के घर सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर ताडिरक्षक आहे का ही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या.
www.nidma.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपत्ती तसेच आपत्ती व्यवस्थापनसंदर्भात माहिती जाणून घ्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏 www.great-indian com
आणि www.vijayjob.in