मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

गुरुवार, १३ जून, २०२४

गणेश दामोदर सावरकर



   *गणेश दामोदर सावरकर*

         (मराठी क्रांतिकारक)

       *जन्म : १३ जून १८७९*

(भगूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, भारत)

     *मृत्यू : १६ मार्च १९४५*

                (भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत, मित्रमेळा

धर्म : हिंदू

प्रभाव : शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक

वडील : दामोदर सावरकर

आई : राधाबाई सावरकर

पत्नी : यशोदा उर्फ येसूताई

अपत्ये : नाहीत.

टोपणनाव : बाबाराव

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

    

सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.


दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला.


💁🏻‍♂️ *बालपण*

            बाबारावांचे बालपण भगूर गावात गेले. लहानपणापासून बाबाराव हुशार, अभ्यासू, संघटनकुशल, सततोद्योगी होते. तसेच बुद्धिबळ, आट्यापाट्या, विटी-दांडू, धनुष्य-बाण चालविणे वगैरे विविध खेळातही ते पटाईत होते. लहानपणी बाबांना विविध प्रकारच्या रोगांनी सताविले. त्यात २०-२१ दिवस मुदतीचा ताप (विषमज्वर) हा नित्याचाच असे आणि बाबांना विंचू दंशही खूपदा (सुमारे २०० वेळा) झाला. थोडे मोठे झाल्यावर वडील दामोदरपंतांच्या देखरेखीखाली बाबाराव तलवार आणि बंदूकही उत्तम प्रकारे चालवायला शिकले. वडील, मामा आणि तात्याराव कविता करीत असत पण बाबांना कवितेची आवड नव्हती. वडिलांना आवड असल्याने त्यांनी घरी गाय-बैल, कुत्रा पाळलेले होते. तसेच घरी फुलझाडेही खूप लावली होती. बाबारावांनी वडिलांकडून टापटीप, अभ्यास, सगळ्यांशी मिळून राहणे, हे गुण घेतले. तर आईकडून स्वयंपाक करायला ते शिकले. आईच्या अकाली निधनानंतर बाबाराव काही काळ आपल्या घरी स्वतःच स्वयंपाक करीत असत.


📖🖊️ *शिक्षण / व्यासंग*

              घरच्या परिस्थितीमुळे आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे बाबारावांचे शालेय शिक्षण मॅट्रिकच्या आतच उरकले पण योगविद्या, वैद्यकाचा नाद असल्याने त्या अनुषंगाने त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. ते स्वतः अनेक प्रकारची औषधेही तयार करीत असत. फलज्योतिष्य, शरीर सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, मंत्रशास्त्र, योग, वेदान्त अशा शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ते स्वतः चांगले गात असत तसेच तबला आणि सतार वाजवू शकत असत. त्यांच्या संग्रहात इतिहास, राजकारण, राज्यशासन, भाषा, सैन्यव्यवहार, धर्म, तत्त्वज्ञान, चरित्रे, संघटनशास्त्र, कला, इ. अनेक विषयांची हजारो पुस्तके होती, त्यांचा सखोल अभ्यास बाबारावांनी केला होता.


       ✍️ *लेखन* ✍️

राष्ट्रमीमांसा व हिंदुस्थानचे राष्ट्रस्वरूप, दुर्गातनय या टोपणनावाने काशी येथे लिहिले, १९३४ साली प्रकाशन.

हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे

शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप

वीरा-रत्‍न-मंजुषा

ख्रिस्तपरिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व

धर्म कशाला हवा ?

मोपल्यांचे बंड

वीर बैरागी, मूळ हिंदी भाषेतील पुस्तकावरून भाषांतरित केलेले पुस्तक

पत्रलेखन

१८५७चा स्वतंत्र्यसंग्राम

*प्रकाशन*

नेपाळी आंदोलनाचा उपक्रम

संघटन संजीवनी

भयसूचक घंटा

✍️ *स्फुट लेख*

केसरी (पुणे), लोकमान्य (मुंबई), महाराष्ट्र (नागपूर), सकाळ (मुंबई), आदेश (नागपूर), वंदे भारतम्‌ (मुंबई), मराठा (इंग्रजी, पुणे), श्रद्धानंद (पुणे), प्रजापक्ष (अकोला), विक्रम (सांगली) इ. वृत्तपत्रात बाबारावांनी वेळोवेळी, विविध विषयांवर लेख लिहिले.


🚹📒 *बाबाराव सावरकरांचे गाजलेले पुस्तक - ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व*

           ‘येशू ख्रिस्त हे तामिळी हिंदू होते. तसेच ते जन्माने विश्‍वकर्मा ब्राह्मण होते. ख्रिश्‍चन धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे‘, असे विचार स्वातंत्र्यवीर विनायक दामोर सावरकर यांचे बंधू गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर यांनी "ख्रिस्त परिचय‘ नावाच्या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात मांडले होते. हे पुस्तक २६-२-२०१६ रोजी पुन:प्रकाशित करण्यात आले. ‘ओल इंडिया ट्रू ख्रिश्चन काउ या संस्थेने या पुस्तकाविरुद्ध मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पुस्तकाची प्रत्येक प्रत जप्त करण्याची मागणी केली आहे.


येशू यांच्याबद्दल या पुस्तकात दिलेली माहिती -


येशू ख्रिस्त हे तमिळ हिंदू होते.

त्यांचे खरे नाव केशवराव कृष्ण असे होते.

तमिळ ही त्यांची मातृभाषा होती.

येशू हे कृष्णवर्णीय होते. त्यांनी योगविद्येचे प्रशिक्षण घेतले होते.

येशू यांचे कुटुंबीय भारतीय वेशभूषा वापरत होते.

येशू ४९ वर्षांचे असताना त्यांनी देह त्यागण्याचा निर्णय घेतला.

येशू योगावस्थेत गेले आणि त्यांनी समाधी घेतली.

ख्रिस्ती धर्म हा हिंदू धर्मातील एक पंथ होता.

👫🏻 *लग्न*

        आईच्या अकाली निधनानंतर १८९६ साली बाबारावांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी पत्‍नीचे नाव यशोदा ठेवले. तात्यारावांसह अनेकजण त्यांना येसू वहिनी म्हणत. येसूवहिनी तात्यारावांच्या आणि नारायणरावांच्या प्रेरणास्थान होत्या. बाबारावांना दोन मुले झाली पण दोघेही फार काळ राहू शकली नाही.


💥 *क्रांतिकार्य*

            तात्याराव आणि मित्रांनी १८९९ च्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रभक्तसमूह नावाची एक गुप्त संस्था स्थापन केली. सुरुवातीला बाबारावांना या संस्थेबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र नंतर त्यांना माहिती मिळाल्यावर बाबांनी या संस्थेसाठी काम सुरू केले. गुप्त संस्थेत तरुणांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांची मानसिक तयारी पाहण्यासाठी दि. १-जानेवारी-१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची संस्था उघडपणे सुरू करण्यात आली. बाबाराव मित्रमेळा संस्थेचे कार्यवाह होते. मित्रमेळा संस्थेतर्फे गणेश उत्सव, शिवजयंतीसह इतर थोरांच्या जयंत्या साजर्‍या करणे, सार्वजनिक (प्रकट) भाषणांचे आयोजन करणे, कविता, पोवाडे म्हणणे आदी प्रकारे तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम हाती घेण्यात आले. बाबारावांनी संस्थेतील तरुणांना मार्गदर्शन मिळावे म्हणून लोकमान्य टिळकांसह अनेकांना वेळोवेळी नाशिक येथे आमंत्रण दिले.


बाबांच्या प्रयत्‍नांनी राष्ट्रीय चळवळीचे केंद्र म्हणून नाशिक ओळखले जाऊ लागले. १९०४ साली मित्रमेळाची गुप्त संस्था म्हणून अभिनव भारत संस्था स्थापन करण्यातही बाबांचा पुढाकार होता. अभिनव भारत ही जहालवाद्यांची संस्था होती. त्यातील लोकांचा पूर्ण स्वातंत्र्य हाच ध्यास होता आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांनाच त्यात प्रवेश दिला जात असे. या दोन संस्थांशिवाय बाबारावांच्या पुढाकारानेच १९०३ साली मित्रसमाज नावाची विद्यार्थ्यांची संस्था आणि १९०५ साली आत्मनिष्ठ युवतीसंघ नावाची स्त्रियांची संघटना स्थापन करण्यात आली. या सर्व संस्था आपापल्या कार्यक्षेत्रात स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या होत्या आणि यातील निवडक मंडळींना अभिनव भारतशी जोडले जात असे.


२०-जुलै-१९०५ रोजी वंगभंगची अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर याचा विरोध म्हणून सर्वत्र विदेशीचा बहिष्कार - होळी, स्वदेशीचा पुरस्कार सुरू झाला. बाबाराव नाशिक येथून आणि तात्याराव पुणे येथून ही चळवळ चालवीत. सशस्त्र क्रांतीचा प्रचारही गुप्तपणे सुरू करण्यात आला.


⚖️ *अभियोग*

        सरकारी यंत्रणा बाबारावांच्या पाळतीवर होतीच. त्यातच बाबाराव मुंबईला गेले आणि क्षुल्लक वादात सापडले. त्यावरून चौकशी करून बाबांना दि. २८-फेब्रुवारी-१९०९ रोजी मुंबईत अटक करण्यात आली. नंतर त्यांना नाशिकला नेण्यात आले. सखोल चौकशीअंती बाबांच्या घरी आक्षेपार्ह बर्‍याच गोष्टी आढळल्याने त्यांच्यावर तत्कालीन दंडविधानाच्या कलम १२१ आणि १२४ अ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. दि.०८ जून इ.स. १९०९ रोजी बाबारावांना जन्मठेपेची - काळ्यापाण्याची शिक्षा आणि सर्व मिळकतीच्या जप्तीची शिक्षा तसेच सश्रम कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली. काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगावयाची होती. ही शिक्षा सुनाविल्यावर थोड्याच काळात बाबारावांनी उच्च न्यायालयात फेर निर्णयासाठी याचिका दाखल केली. पण यथावकाश त्याचाही निकाल बाबांच्या विरुद्धच लागला आणि जुनी शिक्षा कायम करण्यात आली.


🌀 *परिणाम*

               बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे लंडन मध्ये असलेल्या भारतीयांना समजले. तात्याराव आणि सहकारी ब्रिटिश सरकारला कशी अद्दल घडवावी यावर विचार करीत होते. तोच एकीकडे मदनलाल धिंग्रा याने वंगभंगसाठी जबाबदार असलेल्या कर्झन वायलीवर दि. ०१ जुलै इ.स. १९०९ रोजी गोळ्या झाडून त्याचा वध केला. तर दुसरीकडे नाशिकमधील अभिनव भारतचे सदस्य गुप्तपणे एकत्र आले आणि अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांनी बाबारावांना शिक्षा होण्यास जबाबदार असलेला मुख्य अधिकारी म्हणून जॅक्सनचा वध दि. २१ डिसेंबर इ.स. १९०९ रोजी केला. याशिवाय देशभर हरेक मार्गाने निषेध झाले.


⛓️ *अंदमान - काळ्या पाण्याची शिक्षा*                                                              काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी इ.स. १९११ साली अंदमानला पाठविण्यात आले. अंदमान येथील शिक्षा अतिशय कठोर स्वरूपाची होती. बाबाराव रोज मरण यातना भोगत. त्यातच तात्यारावांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांचीही रवानगी अंदमानला करण्यात आली. बाबारावांचे धाकटे बंधू नारायणराव यांनी आपल्या दोन्ही वडील बंधूंची सुटका व्हावी म्हणून अनेकांना भेटून, निवेदने देऊन प्रयत्‍न चालविले. अखेर इ.स. १९२१ साली दोन्ही सावरकर बंधूंची अंदमान मधून सुटका झाली पण एकूण शिक्षेचा काळ संपला नसल्याने त्यांना भारतातील विविध ठिकाणच्या तुरुंगात पाठविण्यात आले. बाबारावांची तब्येत साथ देत नाही असे पाहून इ.स. १९२२ साली त्यांची शिक्षा संपल्याचे घाईने कळविण्यात आले.


🪔 *निधन*

           शिक्षा संपल्यानंतर बाबांची प्रकृती साथ देत नसतांनाही त्यांनी आपले पूर्वीचे कार्य नव्या जोमाने सुरू केले. त्यांचे लिखाण, वाचन, प्रकाशनाचे कामही वाढले. अनेक तरुणांना प्रोत्साहन देऊन सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांना पटवून दिले. क्रांतिकार्य अव्याहतपणे सुरू असतांनाच दि. १६-मार्च-१९४५ रोजी बाबाराव सावरकर यांचे निधन झाले.


🏛️ *स्मारक*

               सांगली शहरातील एका इमारतीत बाबाराव सावरकर यांचे एक स्मारक होते. त्या स्मारकात काही दुर्मिळ ग्रंथ, पुस्तके, पत्रव्यवहार, छायाचित्रे अशी संपदा होत्यी. काही अज्ञात व्यक्तींनी हे स्मारक जाळून टाकले. (११ जून २०१४).


📚 *बाबाराव सावरकरांसंबंधी पुस्तके*

क्रांतिकारक बाबाराव सावरकर (लेखक दुर्गेश परुळकर)

क्रांतिवीर बाबाराव सावरकर, लेखक द. न. गोखले

त्या तिघी (सावरकर बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी (बाई), यमुना(माई) आणि शांता(ताई) यांच्यावरील कादंबरी (लेखिका डॉ. शुभा साठे)                                                                                                    


         

बुधवार, १२ जून, २०२४

महत्त्वाच्या विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरूवात

 विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरूवात


पहिले वर्तमानपत्र ...द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिक, २९ जानेवारी १७८१)


पहिली टपाल कचेरी...कोलकाता (१७२७)


पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन)....मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल, १८५३)


पहिली रेल्वे (विजेवरील)....मुंबई ते कुर्ला (१९२५)


पहिली भुयारी रेल्वे...मेट्रो रेल्वे, कोलकता 


पहिली दुमजली रेल्वेगाडी...सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)


पहिला मूकपट....राजा हरिश्चंद्र (१९१३, दादासाहेब फाळके निर्मित)


पहिला बोलपट...आलमआरा (१९३१, आर्देशिर इराणी निर्मित)


पहिला मराठी बोलपट....अयोध्येचा राजा (१९३२, प्रभात फिल्म कंपनीच्या-व्ही. शांताराम निर्मित)


पहिले दूरदर्शन केंद्र..दिल्ली (१९५१)


पहिले आकाशवाणी केंद्र..मुंबई (१९२७)


पहिले विद्यापीठ... कोलकता1857


पहिले टेलिफोन एक्सचेंज...  कोलकाता 1881

पहिला उपग्रह....आर्यभट्ट (१९७५)


पहिला अणुस्फोट...पोखरण (१८ मे १९७४, राजस्थान)


पहिले क्षेपणास्त्र ...- पृथ्वी (१९८८)


भारतीय बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू बोट..- विभूती


भारतीय बनावटीची पहिली पाणबुडी..शाल्की


भारताचे पहिले लढाऊ विमान..नॅट


भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा..विजयंता


पहिली अंटार्क्टिका मोहीम..डिसेंबर, १९८१ (मोहीम प्रमुख प्रा. कासीम)

पहिली अणुभट्टी..अप्सरा, तारापूर (१९५६

पहिला आधुनिक पोलाद कारखाना...कुल्टी, प. बंगाल

पहिला तेलशुद्धीकरण कारखाना ..- दिग्बोई (१९०१, आसाम)

भारतातील पहिले नियोजित शहर चंदिगढ (ला कार्बुझिए या फ्रेंच व्यक्तीद्वारा निर्मि


भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य..

आंध्र प्रदेश (१९५३


अंत्योदय योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य..राजस्थान




हवामानविषयक पहिला भारतीय उपग्रह कल्पना १ (१२ सप्टेंबर २००३, श्रीहरीकोटा


पहिले संपूर्ण संगणकीकृत बंदर.न्हावाशेवा


संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे पहिले शहर....दिल्ली (दुसरे कोलकाता)


भारतातील पहिली जनगणना..१८७१-७२


देशातील पहिले बिगर काँग्रेस मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य - केरळ (१९५७)


भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी ...हर्षा चावडा (६ ऑगस्ट, १९८६)


पहिली कापड गिरणी.. मुंबई 1854


पहिली ताग गिरणी... कोलकाता 1855


पहिला सिमेंटचा कारखाना...चेन्नई.1904


पहिले जलविद्युत केंद्र...दार्जिलिंग (१८९८)


पहिले पंचतारांकीत हॉटेल..ताजमहल, मुंबई (१९०३)


पहिले व्यापारी विमानोड्डाण..कराची ते मुंबई (ऑक्टो. १९३२)


पहिले राष्ट्रीय उद्यान..- जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल, १९३५)


पहिले संग्रहालय..इंडियन म्युझियम, कोलकाता (फेब्रु. १८१४)


पहिला सहकारी साखर कारखाना..प्रवरानगर (१९५०, अहमदनगर)


पहिली सहकारी सुतगिरणी..कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर -सहकारी संस्था, इचलकरंजी


पंचायतराज पद्धतीचा स्वीकार करणारे पहिले राज्य..राजस्थान


भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर..कोट्टायम (केरळ)


भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा.. एर्नाकुलम (केरळ)


भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका...आय.एन.एस. दिल्ली


भारतीय नौदलातील पहिली युद्धनौका....विक्रांत

भारताची पहिली आण्विक पाणबुडी ..आय.एन.एस. चक्र


भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक...दक्षिण गंगोत्री (दुसरे मैत्री)


भारतातील विमा उतरविलेला पहिला भारतीय चित्रपट...ताल (१० कोटीचा विमा)


भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ...हैदराबाद, आंध्र प्रदेश (१९८२) 

भारतातील पहिले नियोजित शहर... चंदिगढ (ला कार्बुझिए या फ्रेंच व्यक्तीद्वारा निर्मिती


भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य...आंध्र प्रदेश (१९५३


अंत्योदय योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य..राजस्थान


राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन.....गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा.मुंबई (२८ डिसेंबर, १८८५)


हवामानविषयक पहिला भारतीतीय उपग्रह.... कल्पना १ (१२ सप्टेंबर २००३, श्रीहरीकोटा


पहिले संपूर्ण संगणकीकृत बंदर .....न्हावाशेवा पंडित जवाहरलाल नेहरू


संगणकाद्वारे रेल्वे आरक्षण केले जाणारे पहिले शहर .....दिल्ली (दुसरे कोलकाता)


भारतातील पहिली जनगणना ....1871-72


देशातील पहिले बिगर काँग्रेस मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य - केरळ (१९५७,)


भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी .... हर्षा चावडा (६ ऑगस्ट, १९८६)

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024-25

 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात य योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वीच्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वीच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. सद्यस्थितीत शासन निर्णय दि.०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. 



केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दीगत करणे व आहारात वैविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्याथ्यर्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.


सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील. तीन संरचित आहार पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी / कडधान्यापासून तयार केलेला आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर व नाचणीसत्व यांचा समावेश करुन नविन पाककृती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने खालीलप्रमाणे सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पाककृतींचा तपशील


सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे राहील. 




आहे. सदरप्रमाणानुसार शिजविलेला आहार विद्यार्थी पूर्णतः खात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गरजेप्रमाणे तांदळाची पाककृती तयार केल्यास तांदूळ व डाळी/कडधान्य यांची बचत शक्य आहे.


४) तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी संबंधित जिल्हातील स्थानिक परिस्थिती व विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार गरजेनुरुप पाककृती निश्चित करताना तांदूळ व कडधान्य / डाळ यांचे प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे. संबंधित जिल्ह्यांनी निश्चित केलेल्या तांदूळाच्या प्रमाणानुसार कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ भाजीपाला निश्चित करावा. (उदा. इ.१ ली ते इ.५ वीसाठी तांदळाचे प्र 3 ५० ग्रॅम (५० टक्के) घेतल्यास कडधान्य / डाळ, तेल, मीठ व मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला यांचे प्रमाणदेखील त्याच मर्यादेत (५० टक्के) निश्चित करावेत.)


५) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. सबब, उपरोक्त अनु.क्र.४ नुसार पाककृतीचे प्रमाण निश्चित केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या तांदूळापासून तांदळाची खीर आणि शिल्लक राहणाऱ्या भाजीपाला व मोड आलेली कडधान्य (स्प्राऊट्स) यांची कोशिंबीर या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना दिल्यास विद्यार्थ्यांच्या आहारात वैविध्यता येईल. त्यानुषंगाने याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.


५.१) विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) देण्यात यावेत. सदर मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) तयार करण्याची पाककृती सोबत परिशिष्ट "अ" मधील पाककृती क्र.१५ मध्ये आहे.


५.२) विद्यार्थ्यांना आठवड्यातील चार दिवसांकरीता दररोज तांदळाची खीर व आठवड्यातील एक दिवस नाचणीसत्व या गोड पदार्थांचा लाभ नियमित पाककृतीसोबत देण्यात यावा. नाचणी सत्व तयार करण्याची पाककृती सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये अनु.क्र.१४ येथे नमूद केली आहे.


६) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहेत. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.९) या पदार्थांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात (पाककृती क्र.१) लाभ देण्यात यावा. तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दर मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.


७) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील पृष्ठ २० पैकी ३


शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२२/प्र.क्र.११७/एस.डी.३


दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शिक्षण संचालक (प्राथ) यांनी शाळा स्तरावर वितरीत करावी. सदर निधीमधून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना विहित पदार्थांचा लाभ देण्यात यावा. याबाबतच्या खर्चाचा आढावा शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी घ्यावा. सदर निधीशिवाय अतिरिक्त निधीची गरज असल्यास त्याप्रमाणे निधी शासनामार्फत देण्यात येईल.


८) प्रस्तुत योजनेंतर्गत शाळास्तरावर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया राबविताना सोयाबीन पुलावासाठी आवश्यक असणाऱ्या सोयाबीन वडीचा समावेश शिक्षण संचालक (प्राथ.) यांनी करावा.


९) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.


भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळांना करण्यात येईल.


१०) योजनेंतर्गत पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित केल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे निर्णय घ्यावा.  

Gr डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://drive.google.com/file/d/1HTZ56vEBurIog0i81nd6DvurThKAOFcV/view?usp=drivesdk

लोकप्रिय पोस्ट