मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

केल्याने होत आहे रे

केल्याने होत आहे रे 

संत रामदासांनी कृतीशीलतेचे महत्त्व वरील श्लोकाद्वारे सांगितले आहे. कोणतीही गोष्ट ठरविल्याशिवाय, निश्चित केल्याशिवाय होऊ शकत नाही. "केल्याने होत आहे रे, आघि केलेची पाहिजे" म्हणजे तुम्ही नुसते विचार करीत बसू नका, कार्यप्रवण व्हा; प्रारंभ करा म्हणजे कार्य सिद्धीस जाईल, तडीस जाईल..

परंतु काहीही कृती न करता नुसते झाले पाहिजे असे म्हणत राहिलात तर ती दिवास्वप्ने ठरतील तुमच्या मनातील कार्यप्रवणतेचे रसायन सतत उकळत पहिले पाहिजे, तुम्हाला मोठे व्हायचे आहे. यशस्वी व्हायचे आहे हा विचार मनात येणे व त्यासाठी प्रयत्नांची सुरुवात करणे, सतत पाठपुरावा करणे, सराव करणे, पहिल्या चुका टाळणे, पुन्हा त्या होणार नाहीत असा कटाक्ष ठेवणे याने यशाकडे तुमची वाटचाल सुरू होईल. या प्रयत्नातून तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल. यश दृष्टिपथात आले, मिळायला लागले, मिळाले की अपार आनंद होईल परंतु याचे बीज असे असे घडावे हा विचार तुमच्या मनात येण्याने व तसे घडावे म्हणून प्रयत्न करण्यानेच होईल

यशस्वी होण्यासाठी, सिद्धीसाठी प्रार्थना हवी पण ती प्रार्थना यशस्वी होण्यासाठी तिला प्रयत्नांची जोड हवी. प्रसिद्ध कलावंत, गायक, नट, चित्रकार, वादक, क्रीडापटू है एकाएकी मोठे झालेले नसतात, त्यामागे असते त्यांनी केलेली अपार साधना, केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट !!

सुंदर वस्तू, चांगली गोष्ट एका दिवसात तयार होत नाही. ताजमहाल या अद्वितीय इमारतीचे बांधकाम २२ वर्षे सुरू होते, वेरूळचे कैलास लेणे अनेक वर्षे खोदले जात होते. या सर्वांमागे असते ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा !! निर्मिती मागील प्रेरणा, ऊर्मी, निर्मिती करण्याची इच्छा हा ऊर्जास्रोत महत्त्वाचा आहे. कुठलीही महत्त्वाकाक्षा उराशी बाळगून तिच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे यशाला गवसणी घालण्यासारखे आहे. नंत रामदासांनी "केल्याने होत आहेरे, आधि केलेची पाहिजे" या दिलेल्या बीजमंत्राचे अनुसरण करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२

स्तुती आणि दोष

 *स्तुती आणि दोष* 


 आपले दोष नेहमी ऐका, पण स्तुती मात्र ऐकू नका


आपल्या वागण्या-बोलण्यातील दोष कोणी दाखवल्यास आपल्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांचे स्वागत करावे, पण कदाचित आपल्याला गर्व होईल म्हणून आपली स्तुती कोणी करीत असल्यास ती ऐकू नका.


मानवी स्वभावच असा आहे की त्याला आपले कोणी दोष दाखवल्यास वाईट वाटते व दाखवणाराचा राग येतो, पण हे योग्य नाही. आपले दोष दाखवणारा आपला हितचिंतक समजावा. आपले दोष आपल्याला जाणवत नाहीत, पण ते इतरांना जाणवतात. ते त्यांनी सांगितल्यास त्याप्रमाणे आपल्यात सुधारणा घडवून आणता येते. आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हे फार चांगले असते.


पण आपली स्तुती आपल्या तोंडावर कोणी करीत असेल तर ती न ऐकणेच चांगले कारण तो आपली स्तुती का करीत आहे याचे खरे कारण कळत नाही. काही वेळेला आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादी व्यक्ती आपली खोटी स्तुती आपल्याला ऐकवत असतो. दुसरे कारण अशी स्तुती ऐकायला माणसाला आवडते. स्तुतीला तो भाळतो आणि गविष्ठ होऊ लागतो. हे कटाक्षाने टाळावे. स्तुतीसाठी कामे करूच नयेत. म्हणूनच म्हणतात की, 'आपले दोष ऐका, स्तुती मात्र ऐकू नका.'


लेख आवडला तर नक्की शेअर करा 🙏🙏🙏🙏_

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

चिंतन आणि बदल....

 गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.


त्या अवस्थेत त्याच्या  शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !


जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.

एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !


150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !


याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !


150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !


दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे

एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.


 आवडल्यास नक्की शेअर करा...🙏🙏🙏🙏🙏

लोकप्रिय पोस्ट