मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

पोलिस भरती महाराष्ट्र राज्य02022

 महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. ही भरती ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती खालील लिंक वरती क्लिक करा  policerecruitment2022.mahait.org

 www.mahapolice.gov.in 


अटी व नियम


उमेदवाराला पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा कालावधी : ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२

कोणताही उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

परीक्षा पद्धती


अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० % गुण मिळवणे अनिवार्य आहे.

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

E पीक पाणी नोंदणी

 


राज्य शासनाने पीक पेरणी बाबतची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारा उपलब्ध करून देण्याबाबतचा ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेल्या आज्ञावलीचा वापर करून 15 ऑगस्ट 2021 पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.

ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.

खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याकडून देय ठरणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल.

खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे.

कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.

Stages and duration of e peek Pahani Inspection

ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल.

15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल.

16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील.

खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.

1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.

एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल.

अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील


ई पीक पाहणी हेल्पलाईन क्र ०२०२५७१२७१२

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

 

       शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

अ.

प्रधानाचे नाव

पद

काम

1

मोरो त्रिंबक पिंगळे

प्रधान  

राज्यकारभार चालविणे

2

रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

अमात्य

राज्याचा जमाखर्च पाहणे

3

हंबीरराव मोहिते

सेनापती

सैन्याचे नेतृत्व् करणे 

4

मोरेश्वर पंडितराव

पंडितराव

धर्माची कामे करणे

5

निराजी रावजी

न्यायाधीश

न्यायदान करणे

6

अण्णाजी दत्तो

सचिव

सरकारी आज्ञापत्रे  पाठविणे

7

दत्ताजी त्रिबक वाकनीस

मंत्री

पत्रव्यवहार सांभाळणे

8

रामचंद्र त्रिंबक डबीर

सुमंत

परराज्याशी सबंध ठेवणे

 

 

 

 

 

 

 

 

 

लोकप्रिय पोस्ट