स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते !!!! This is eductional blog. Blog use for teacher and student . Blog gives Educational information .
लेबल
पृष्ठदृश्ये
मंगळवार, २० जून, २०२३
शिक्षण विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख परीक्षा 36
सोमवार, १९ जून, २०२३
रविवार, १८ जून, २०२३
शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख परीक्षा 30
शिक्षण विस्ताराधिकारी केंद्र प्रमुख परीक्षा 29
बापासाठी एक दिवस
बापासाठी एक दिवस ...
दोस्तहो, एक गंमत असते !
आपला बाप सांगत होता ते बरोबरच होतं, हे आपल्याला जाणवायला लागतं आणि त्याचवेळी आपलं पोर "बाबांना काही कळतच नाही', असं म्हणू लागतं!
प्रत्येक पिढीत हेच चालतं, क्वचित कोणीतरी अपवाद ठरतं.
का कळत नाही हो बापाचं हृदय पोराला?...
बापाची तळमळ समजायला, त्याच्याच भूमिकेत का लागतं शिरायला?...
तो कठोर वाटतो, तो हेकट वाटतो,
हेही वाटतं की तो आपल्यावर फार अन्याय करतो,
उठसूठ बोलत असतो, राग-राग रागावत असतो,
समजून तर कधी घेतंच नाही, नुस्त्या अपेक्षा अपेक्षा नि अपेक्षाच करतो...!
पण काय हो,
तो काही नुस्तं राब-राब राबणारं मशीन असतो?
मागेल तेव्हा उपसून द्यायला, पैशांची नुस्ती खाण असतो?
तुम्हाला मन-मान असतो, तुम्हाला राग-लोभ असतो,
तुम्हाला आशा-आकांक्षा, स्वप्नं असतात
आणि तो काय साधा माणूसही नसतो?...
चुकतो तोही कधी कधी; पण,
आपल्या डोळ्यांदेखत पोराची घडी बसावी, ही मनीषा काही गैर असते?
सरळ सांगून समजत नाही, तर
दाम-दंडाने पोराला वळण लावू पाहणं, ही त्याची चूक ठरते?...
वेळ गेल्यावर पश्चात्ताप करण्यापेक्षा "वाईटपणा' घेणं तो पसंत करतो,
पोरांच्या चिंतेनं झोप उडणं - काळजी लागणं, ही तर जणू तो
"बापपणा'चीच किंमत मोजतो!
पोरांच्या यशाचा सर्वाधिक आनंद त्यालाच होत असतो;
तरीही त्यांच्या दृष्टीने तो हुकूमशहा हिटलर असतो!
का?...
कारण,
बापाला आनंद साजरा करताना, बापाला चैन-मौज करताना,
बापाला भावनावश होताना, आपण कधी पाहिलेलंच नसतं,
झगडणारं रूपच त्याचं आपल्या मनावर बिंबलेलं असतं!
तुम्ही म्हणाल,
हे आयुष्य आमचं आहे, आमच्या मनासारखं आम्ही का नाही जगायचं ?
अहो पण,
संसाराच्या जंजाळात, तो स्वतःसाठी जगणंच विसरून गेलाय,
हे आपण सोयीस्कर दुर्लक्षायचं ?
ज्यानं बापाचा विश्वास सहज कमावला, त्याच्यासारखा तोच भाग्यवान भला,
पण नसेल होत तसं, तर कारण शोधा,
जरा त्याच्या कलानं घ्या, लागलीच तर मदतही मागा,
नसेल पटत त्याचं-तुमचं तर फटकूनही स्वतःला सिद्ध करून दाखवा
मग बघा.....
बघा, आतून कसा मोहरतो...
डोळ्यांत अभिमान भरतो नि आवाज हळवा होतो,
येणा-जाणाऱ्यांपुढे तो तुमचं कौतुकगाणं गात सुटतो...
पोरांच्या उत्कर्षाने स्वतः धन्य होतो, पोरांच्या सुखालाच आपलं सुख मानतो.
दोस्तहो, जऽऽऽरा समजून घ्या, तो तुमचा चांगला मित्रही होऊ शकतो,
बाप नावाचा प्राणी, खरं म्हणजे, माणसांतला एक "फणस'च असतो!
एकाने म्हटले आज फादरस् डे, बापाला काही दिलयं काय? बापासाठी वेगळं काही केलयं काय?
मी म्हटले, तेवढा मोठा नाही झालोय मी,
बापाच्याच कृपेत न्हालोय मी, म्हणून बापासाठी मी काहीच केलं नाही,
मला जे मिळालंय, ते बापानेच दिलंय सर्वकाही !
खरं तर आई-वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणा एका विशिष्ट दिवसाची गरज नसते.
पण, तरीही अशा या दिवसांच्या निमित्ताने काही जणांना आपल्या पालकांविषयीच्या भावना त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळते.
चला तर,
बाबांना खास शुभेच्छा देऊन साजरा करा आजचा काय रोजचाच दिवस !!
Happy Father's Day!!!!!
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
विविध प्रकारच्या वस्तू अथवा प्राणी यांच्या समूहाचा बोध होण्यासाठी त्याला विशिष्ट नाव दिले जाते त्या समुदर्शक शब्द असे म्हणतात. क्रमांक ...
-
सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे 👇👇 कार्यक्रम पत्रिका: आगतम् स्वागतम् सुस्वागतम्..... 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पू...
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…
-
आजच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान ही एक महत्त्वपूर्ण बाब झाली आहे. नॉलेज ऑफ पावर या ब्लॉगद्वारे दररोज स्पर्धा परीक्षा टेस्ट सामान्य ज्...
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास प्रश्न. 🙏🙏 Loading…