वाशिम जिल्हा
क्षेत्रफळ :- ५,१५० चौ. कि. मी. लोकसंख्या :- १०,१९,७२५.
तालुके :- ६- १) वाशिम, २) मालेगाव, ३) रिसोड, ४) मंगरूळपीर, ५) मनोरा, ६) कारंजा. प्रमुख पिके :- कापूस, गहू, ज्वारी, मका, गळिताची पिके.
हवामान : उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ८५ सें.मी.
नद्या :- पैनगंगा, काटेपूर्णा, बेंबळा, अरुणावती, निर्गुणा,
अदान.
लेणी :- शिरपूर लेणी.
तीर्थस्थाने :- पोहरा देवी, वाशिम, लोणी, कारंजा,
मंगरूळपीर,
ऐतिहासिक स्थाने :- वाशिम, कारंजा, शिरपूर. प्रेक्षणीय स्थळे : वाशिम, मालेगाव, कारंजा, शिरपूर,पोहरादेवी.
तलाव :- ऋषी तलाव (कारंजा)
प्रमुख उद्योग :- कापूस कारखाने, हातमाग, सतरंज्या,
घोंगड्या (बाळापूर).
लोहमार्ग :- मुंबई भुसावळ हावरा : ब्रॉडगेज. खांडवा हिंगोली : मीटरगेज.
मूर्तिजापूर यवतमाळ : नॅरोगेज, राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ - धुळे-कोलकाता-महामार्ग
विशेष माहिती १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे :- विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.