बुलढाणा जिल्हा
टोपण नाव :- महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ.
क्षेत्रफळ :- ९,६८० चौ. कि. मी.
लोकसंख्या : २२,२६,३२८.
तालुके :- १३ - १) चिखली, २) देऊळगाव राजा, ३) बुलढाणा, ४) मलकापूर, ५) मोताळा, ६) नांदूरा, ७) जळगाव - जामोद, ८) संग्रामपूर, ९) खामगाव, १०) शेगाव, ११) मेहकर, १२) सिंदखेड राजा, १३) लोणार.
प्रमुख पिके :- कापूस, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. हवामान :- उष्ण, कोरडे व काही भागात थंड. सरासरी पर्जन्य :- ९० सें.मी.
नद्या :- पैनगंगा, पूर्णा, मन, उतावळी, खडकपूर्णा, बाणगंगा,
बेंबळा, पांडव, केदार.
वनोद्याने :- बुलढाणा, लोणार क्रेटर.
थंड हवेचे ठिकाण :- बुलढाणा.
तीर्थस्थाने :- देऊळगाव राजा (बालाजी मंदिर), शेगाव (संत गजानन महाराजांची समाधी).
ऐतिहासिक स्थाने :- सिंदखेड राजा (जिजामाता यांचे जन्मस्थान). प्रेक्षणीय स्थान :- लोणार सरोवर (जगातील सर्वांत मोठे निसर्गनिर्मित सरोवर)
किल्ला :- सिंदखेड राजा (लखुजी राजे यांची गढी) प्रमुख उद्योग :- हातमाग, कापूस कारखाने, लुगडी व खण, कुंकवाचे कारखाने, कापड, यंत्रमाग, भांडी, साखर, तेल घाणी, कापूर उद्योग (खामगाव ).
धरण प्रकल्प : नळगंगा धरण.
लोहमार्ग :- मुंबई-भुसावळ-हावरा ब्रॉडगेज.
जळंब-खामगाव : ब्रॉडगेज. राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, सुरत- कोलकाता महामार्ग.
संत :- संत गजानन महाराज.
समाजसेविका :- ताराबाई शिंदे.