blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

ग्रुपचे महत्व

       .... ग्रुप ताजातवाना कसा ठेवावा नक्की वाचा.....


🙄 *(१)* विनोद हा विनोदी आणि खेळाडू वृत्तीने घ्यावा. 

🙄 *(२).* ग्रुप मध्ये कोणी लहान मोठे नसते .

🙄 *(३).* ग्रुप मध्ये कोणी फार महत्वाचा आहे असा समज नसावा . 

🙄 *(४).* प्रत्येकाने चांगल्यात चांगली पोस्ट टाकायचा प्रयत्न करावा 

🙄 *(५)*.सर्वच स्वतःने टाकलेलं नसतं , बहुदा फॉरवर्डिंग असतं , म्हणुन तसा शेरा कुणी मारू नये, काहीवेळा पुन्हा तोच मेसेज असतो , म्हणुन त्याचा उपहास करू नका , त्याचा स्वीकार करा, सर्व ग्रुपवर असंच असतं . 

 

🙄 *(६).* यात कुणाला पैसे मिळत नाहीत, पण हा प्रेमाने आणि स्वतःहून केलेला प्रयत्न असतो.   

🙄 *(७).* आपले आहे तसे सामान्य जीवन जगा , आपण खास आहात, आपल्याशिवाय ग्रुप कंटाळवाणा होईल. 

🙄 *(८).* दुसरं कोणी ग्रुपला आकार देईन अशी अपेक्षा धरू नका, म्हणुन आपणच ग्रुप मध्ये सहभाग वाढविला पाहिजे.   

🙄 *(९).* ग्रुप मेंबरनी आपली सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी हे शिकले पाहजे , नवीन मित्रांना भेटा आणि आपलं सामाजिक सद्भावनेचे कौशल्य वाढवा. 

🙄 *(१०).* मेंबर्सनी दिलेल्या शुभेच्छेला आपला गर्व, उद्धटपणा आणि फुशारकी बाजूला ठेऊन प्रतिसाद द्यावा. 

🙄 *(११).* *ग्रुप च्या बाहेर घडणाऱ्या घडामोडी बाहेरच ठेवाव्यात.*

🙄 *(१२).* ग्रुप हा नेहमी आनंदी रहाण्यासाठी असतो, म्हणुन आपला ग्रुप, ज्या काही पोस्ट आल्या त्यातच मजा आणि आनंदी करू.नुसत्या पोस्ट वाचू नका, तर त्या अधिक आकर्षक आणि उत्साहित करण्यासाठी त्यांना प्रतिसाद द्या. 

🙄 *(१३).* प्रत्येक पोस्ट फार गांभीऱ्याने घेऊ नका, कारण आपण ग्रुपमधील सर्वजण गंम्मत, काही बोध आणि एकमेकांची करमणूक करण्यासाठी आहोत.

*(१४)* राजकारणाच्या व जातीवाचक पोष्ट टाकून वादविवाद करत राहू नका, प्रत्येकांचे विचार वेगळे असतात, प्रतेकाची निष्ठा वेगवेगळ्या व्यक्तीवर असलेने वाद उद्‌भवतात हे टाळण्यासाठी राजकीय व जातीय पोष्ट टाळा 

*एकमेकाची सुख दुःख जाणून घेणे हा ग्रुपचा उद्येश आहे, विनाकारण कोणाची उणी दुणी काढणेसाठी नाही , आणि आपण एकमेकांना आधार आहोत केव्हाही कधीही* एखाद्या पोष्टवर हे माझ्यासाठी आहे असा गैर समज करून घेऊन वादात पडू नका

*लांब गेलेल्या मित्रांशी संवाद साधून सुख दुःखाची देवाणघेवाण करणे हा आहे. गेली काही दिवस आपण एकमेका पासून दूर होतो. आपला संपर्क नव्हता. एकमेकांची आठवण यायची. कोणाशी बोलायला मिळाल की अप्रूप वाटायचं. मग एक दिवस ग्रूप बनला. आनंदाला उधाण आले.डोळे आणि मन भरून आले. संभाषणाच्या अनेक लाटा आल्या..* 


*ग्रूप आपणा सर्वांना एकत्र आणण्या साठी केला आहे ही प्रांजळ भावना विसरू नका. एकमेकांना भावनिक आनंद आणि बळ देण्यासाठी हा ग्रूप आपण केलाय. एखादी गोष्ट जवळ नसेल तर त्याची किंमत कळते. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल , तुमचा जेव्हा मुड असेल , तेव्हा पोस्ट पाठवा , उत्तर द्या , एखादी छान प्रतिक्रिया द्या , पोस्टचे कौतुक करा. एखादा फोन करा , फोन केला म्हणजे तो रिकामा नसून तुम्हाला प्राधान्य आणि महत्व देत आहे , हे लक्षात घ्या.* 

*तेव्हा संवाद साधत राहा. कोणाला दुखवू नका आणि स्वतः रागावू नका. आपली एकी टिकवून ठेवा. मैत्रीचे वातावरण जिवंत ठेवा.*

*पटलं तर पहा...काही अपवाद.*

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.