मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 2 गणित इयत्ता पाचवी

टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

मनोरंजक वस्तुस्थिती

 🙏🙏🙏🙏


नमस्कार, आज 2022  मधील शेवटचा दिवस. सहज विचार करता करता असा विचार मनात आला की ज्या ज्या गोष्टी चांगल्या म्हणून समजल्या जातात त्या गोष्टी आपल्याला का आवडत नाहीत? म्हणजे आपल्या आवडीच्या का नसतात? आणि मग याच विषयावर जरा विचार करायला लागलो की चांगलं काय आणि आवडतं काय? आणि बरीच मनोरंजक वस्तुस्थिती समोर यायला लागली. म्हटलं ही गम्मत आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करावी.


 आपल्याला चांगले का आवडत नाही?          


 आपण लहानाचे मोठे होत असताना अनेक बोधकथा मधून, अनेक देवतांच्या  कथांमधून, अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या कथा मधून, संत महात्म्यांच्या चरित्रातून, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांमधून, घरातील मोठ्या व्यक्तींच्या कृतीतून, आपल्याला नेहमीच चांगले काय वाईट काय ते सांगितले शिकवले जाते. जसे मोठे होतो तशी काय चांगले आणि काय वाईट हे समजण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात येते. पण तरीही आपल्या मनाचा कल चांगले स्वीकारण्याकडे नसतो यालाच कळते पण वळत नाही असे म्हणतात. अगदी सकाळी उठल्यापासून सुरुवात केली तर रात्रभर झोप झाल्यामुळे सकाळी मेंदू ताजा तवाना असतो. त्यामुळे पहाटे उठून काही अभ्यास पाठांतर केले तर ते लगेच लक्षात राहते असे म्हणतात. तसेच पहाटे उठून फिरायला जाणे व्यायाम करणे यालाही चांगली सवय म्हणतात. पण खूप उशिरा उठने ही आपली आवड असते. स्वच्छ तोंड धुवून काही खाणे पिणे चांगले. पण आपल्याला बेड टी हवा असतो. लहान मुलांना सुकामेवा गुळ शेंगदाणे, शेंगदाणे चिक्की असे पदार्थ खाऊ म्हणून देणे चांगले. पण त्यांना चॉकलेट आवडतात ज्यामुळे दात किडतात. मुले रडत असतील तर घरातील माणसानी त्यांच्याबरोबर खेळणे बोलणे हे चांगले असते. आपण त्यांच्या हातात मोबाईल गेम देतो. शाळेतील, कॉलेजमध्ये सर्व तासांना हजर राहणे, योग्य अभ्यास करणे, शिक्षकांचा आदर करणे, चांगले असते. पण नावडत्या तासाला दांडी मारणे, मधूनच पळून जाणे, कॉलेज सोडून सिनेमाला जाणे, ही आपली आवड असते. वाहतुकीचे नियम पाळणे चांगले असते आणि ते तोडणे ही आपली आवड असते. सायकल चालवणे हे व्यायाम, बचत, पर्यावरण संरक्षण, प्रदूषण न करणारे, पार्किंग, नो एंट्री, लायसन इत्यादी कोणता त्रास नसणारे असे वाहन आहे. चार-पाच किलोमीटरचा प्रवास सायकलवर करायला काहीच हरकत नाही. पण आम्ही बारा-तेराव्या वर्षीच मुलांना गाडी देतो. मोकळ्या जागांवर, फुटपाथवर, रस्त्याच्या कडेच्या गटारांवर, शेतातील शेजारच्या बांधावर अतिक्रमण न करणे चांगले असते. पण आम्ही आपले पाडून ठेवतो आणि दुसऱ्याच्या जागेवर आक्रमण करतो. अंगभर चांगले कपडे वापरणे चांगले असते, पण चांगले कपडे फाडून वापरायची फॅशन आवडती असते. सर्व आहार तज्ञ आहारात सर्व डाळी, कडधान्य, भाज्या, शाकाहारी, मांसाहारी पदार्थ योग्य प्रमाणात खाण्याचे संदेश देतात. तसेच मॅगी, पास्ता, पिझ्झा, बर्गर, वडापाव खाऊ नका म्हणून सांगतात. पण हे सगळं आपल्यासाठी फेवर हिट असते. देशी बियाणे, सेंद्रिय खते वापरून मिळणारे शेती उत्पन्न सकस व आरोग्यदायी असते हे शेतकऱ्यांना माहिती असते. तरी संकरित बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके वापरून कमी दर्जाचे जास्त उत्पन्न घेण्याकडे त्यांचा कल असतो. जोर, बैठका, पळणे, पोहणे, सायकल चालविणे, योगासने हे फुकटचे व आयुष्यभर पुरणारे व्यायाम आहेत. पण हजारो रुपये देऊन जिमला जायची आम्हाला आवड असते. जिम बंद केली की शरीर पुन्हा आहे तसेच होते. गुडघेदुखी होऊ नये म्हणून देशी टॉयलेट चांगले असते. पण नवीन घरात सगळीकडे वेस्टर्न टॉयलेट आवर्जून दाखवली जाते. कपडे धुणे, फरशी पुसणे या व्यायामामुळेही पाठ, कंबर, गुडघ्याचे आजार दूर राहतात. पण आता सगळीकडे फुल्ली ऑटोमॅटिक चा जमाना आला आहे. मोबाईल वापरावर नियंत्रण असणे चांगले असते. पण सध्या श्वासापेक्षा महत्त्वाचे स्थान त्याने मिळवले आहे. कोणत्याही प्रकारचे व्यसन चांगले नाही हे व्यसनी लोकांना सुद्धा मान्य आहे. पण मनाची ओढ  तिकडेच जास्त आहे. सामान्य माणसे मोठ्या नेत्यांचे अनुकरण करतात त्यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांचे चारित्र्य सर्वात आधी स्वच्छ असणे चांगले. पण आजची परिस्थिती त्याच्या अगदी उलट आहे. मोठमोठे शास्त्रज्ञ, लेखक, समाजसेवक, देशभक्त, सैनिक असे लोक आज समाजाचे आदर्श असणे चांगले. पण भ्रष्ट राजकारणी,आणि सिने नट नट्या आपले हिरो आहेत. आपल्या परिवाराशी, समाजाशी चांगले वागणे हे खरे जीवन आहे. पैसा हे जीवन जगण्याचे साधन आहे. पण आता पैसा हेच जीवन झाले आहे. घरातील वृद्ध व्यक्तींना योग्य सन्मान देणे चांगले असते. पण सगळीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. प्लॅस्टिकच्या निर्मितीच्या वेळी पुन्हा पुन्हा वापरता येईल असा कागद तयार करणे ही संकल्पना होती. आपण त्याचे युज अँड थ्रो करून टाकले. आज प्लास्टिक ही जागतीक समस्या बनली आहे. विविध विषयांवरील पुस्तके वाचणे ही चांगली सवय आहे. पण आपण सध्या फक्त बघतो आणि ऐकतो. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे त्यागात शांती रनंतरम्. आपण उपभोगात पूर्ण बुडालो आहोत. आणि मनशांती हरवून बसलो आहोत. शेवटी म्हणावेसे वाटते कुठे नेऊन ठेवले आहे आपल्याला आपणच? हेच आपल्याला मिळवायचे होते का?


 हे सगळं इतक्या प्रकर्षाने जाणवायचे कारण म्हणजे आपली जी पिढी आहे, साधारणपणे 1970 च्या आधी जन्माला आलेली, त्यांनी या सगळ्या चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत. आपले वर्तन असे चांगले होते. हे सगळं आपण जगलो आहोत. तरीही आपण त्या चांगल्याची साथ सोडून दिखाऊ गोष्टींच्या मागे लागलो. त्याचे प्रमुख कारण आहे अति पैसा. आपली पिढी 88/90 च्या सुमारास मिळवती झाली. 91 पासून खुली अर्थव्यवस्था, पाचवा वेतन आयोग लागू झाला. पैसा वाढू लागला. लहानपणी एक दोन तीन पैसे वापरणारे आणि वाचवणारे आपण पैशाच्या झगमगटाने दिपून गेलो. आपणही त्याचबरोबर प्रवाह पतीत होत गेलो. आज जेव्हा पैसा अति झाला त्याचे दुर्मिळपण संपले. तेव्हा त्याची किंमत पण संपली. मग आपल्याला आठवू लागली फळीची बॅट, खडूच्या रेघा मारून भिंतीवर केलेले स्टंप आणि कागदाच्या गोळ्यावर सायकलच्या.    ट्युबच्या गोल रिंगा लावून बनवलेला चेंडू. मग ग्रुप वर मेसेज येऊ लागले, जाने कहा गये वो दिन?  दिन गेले नाहीत आपणच घालवले आहेत. पण चांगले काय ते आपल्याला माहिती आहे. बघा थोडा विचार करा. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विचार करू या वळणावर, जरा विचार करू या वळणावर.            

    धन्यवाद 

🙏🙏 आवडल्यास नक्की शेअर करा


ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.