मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

दसरा आणि आपट्याची झाडे

 ✨ *दसरा आला... आता चला आपट्याची झाडे 🍃तोडूया*..!
❄️ परंतु खरंच का आपटा दसऱ्याला तोडल्यानंतर त्याची पाने वाटतात ? आपण खरंच निसर्गप्रेमी आहोत का ? याचा विचार देखील एकदा केला पाहिजे.


दसऱ्याचे सोनं म्हणून आपण आपट्याची पानं सर्रास तोडतो आणि या गावाला वाटत सुटतो.. खरं सोनं असतं तर असं वाटलं असतं ?


परंतु मित्रांनो, आपट्याचे झाडाचे पान देखील सोन्या इतकच महत्त्वाच आहे.


आपट्याला शास्त्रीय भाषेत *bahunia racemosa* म्हणतात. ढीगभर फायदे आहेत या झाडाचे. खडकाळ मुरमाड टेकड्यांवर किंवा माळरानावर जर आपट्याचे झाडाचे रोपण केले तर इथं हे झाड खूप चांगलं वाढतं. माळरानावर येणारा एक आदर्श वृक्ष म्हणून आपटा गणला जातो.


आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत.


अश्‍मंतक याचा अर्थ " *मूतखडा* (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय. धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.


*अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः* *पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही* *दाहतृष्णाप्रमेहजित्‌* ।।


पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा. आपट्याच्या पानाच्या मुळे गुरांच्या दुधात वाढ होते शिवाय आपट्यामुळे निसर्ग संवर्धनाची कार्य देखील खूप चांगले होते.


परंतु आपण करतो काय तर विजयादशमीच्या मुहूर्तावर फक्त कोल्हापूर सारख्या भागात जवळजवळ वीस ते पंचवीस टणांपेक्षा जास्त आपटा तुटला जातो आणि अगदी तीन चे चार तासात ही सर्व पाने जमिनीवर रस्त्यावर पसरलेली असतात...


*म्हणजे त्यांचं महत्त्व संपते*..?


जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला आपटा आपण मातीत मिसळतो...! हे आपलं दुर्दैव आहे...!


आता आपट्याची झाड कालांतराने कमी होत आहेत, त्यामुळे आपट्यावरून आपण कांचन या वृक्षावर आलेलो आहे. काही दिवसानंतर कांचनार जरी संपला तर कदाचित आपण वड, पिंपळ यांची पाने वाटण्यासाठी देखील मागे पुढे पाहणार नाही, अशी आपली गत झालेली आहे...


वास्तविक पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या वृक्षावर लपवली होती, असे इतिहासात उल्लेख आहेत. ते शमीचे झाड कसं आहे हे देखील बऱ्याच लोकांना माहीत नाही. त्याकरिता शमी, कांचन आणि आपटा या तिन्हीचे फोटो इथे देत आहे आणि मला असं वाटतं की इथून पुढे आपट्याची पाने तोडून न वाटता सरळ " *आपट्याचे झाडच*" किंबहुना " *शमीचे देखील झाड*" सोनं म्हणून दिलं तर नक्कीच त्या झाडाचं संगोपन आणि संवर्धन होऊ शकेल.. आणि पर्यायाने आपण निसर्गाच्या बांधणीत हातभार लावू..!


© *उमाकांत चव्हाण*.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.