मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

माणसाचं आयुष्य...

 *कितीही वेळा वाचली तरी परत परत वाचायला आवडेल अशी पोस्ट.....✍🏻*  

                                                                       *एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*


*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*


*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.* 


*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.* 


*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....*

*वाघ जोरात झेप घेतो...*

*आणि तितक्यात वीज चमकते...*

*त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...*


*आणि* 


*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...*


*माणसाचं आयुष्य हे असंच असतं...* 


*त्याच्या हातात काहीच नसतं...* 


*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...* 


*कर्ता करविता असतो तो ईश्वर...*


*एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...*


*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...*


*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...*


*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*


*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...* 


*कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...*


*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*


*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...*


*त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*


*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'*

*तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*


*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...*


*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*


*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?*

*कोण सांगेल? कोण सांगेल कोण??*

*कुणीच नाही...* 

*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं...* *आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...*

*ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!*


*मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..*

*राजहंस मरताना सुद्धा गातो....*


*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...*

*आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*


*यालाच जीवन म्हणतात.*


*किती दिवसाचे आयुष्य असते?*

*आजचे अस्तित्व उद्या नसते,*

*मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!*

 *नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....*  

*कोणाचा अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका.....*

*- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*

*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....*

*- कोणी कितीही महान झाला असेल,*

*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......*

*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......*

*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.....🌟*

               

*-स्वामी विवेकानंद*

योगा ऑलिम्पियाड स्पर्धेबाबत.
 NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित योगा ऑलिम्पियाड स्पर्धेबाबत.


संदर्भ : जा.क्र.मा. संचालक, राशैसंप्रथम/कला क्रीडा/योगा ऑलिम्पियाड /२०२४-२५/ दि.१६.०५.२०२४ रोजीचे पत्र


उपरोक्त संदर्भीय विषयानुसार NCERT, नवी दिल्ली यांचेकडील पत्रानुसार दि.२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सन २०१६ पासून राष्ट्रीय योगा ऑलीम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच सन २०२४-२५ मध्ये दि.१८ ते २० जून २०२४ या कालावधीत Regional Institute Of Education, म्हैसूर कर्नाटक येथे राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन आरोग्य, सुसंवाद आणि शांतता ही उद्दिष्टे डोळयासमोर ठेऊ न करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे आयोजन उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ६ वी ते ८ वी आणि माध्यमिक स्तर इयत्ता ९ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आहे. त्यासाठी परिषदेकडून उच्च प्राथमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी तसेच माध्यमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी आणि साथीदार २ शिक्षक (त्यापैकी १ महिला शिक्षिका) यांचे नामांकन करावयाचे आहे. त्यासाठी आपल्या तालुक्यातील शाळांकडून विद्याथ्यांचे योगा प्रात्यक्षिकाचे व्हिडीओ आपल्या गुगल ड्राइव्हवर किंवा इतर सोशल मिडीयावर अपलोड करावेत. (सदर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर View For public करावे व त्याची लिंक व माहिती खालील दिलेल्या लिंकवर दि. २६.०५.२०२४ रोजीपर्यंत पाठवावी. https://forms.gle/7qUWCyMjWWn6wa2J9 खालील लिंक  अधिक माहितीसाठी क्लिक करा 


https://drive.google.com/file/d/1Jz8VvqAApKTuNsDypeGih2aIYR1MFh2v/view?usp=drivesdk

विनोबा भावे

 थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक

 विनोबा भावे 

जन्म. ११ सप्टेंबर १८९५ रायगड जिल्ह्यामधील गागोदे या गावी.

विनायक उर्फ विनोबांना तरूणपणात दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक, हिमालयाच्या सहवासात राहून अध्यात्माची जोपासना करावी आणि दुसरे म्हणजे बंगालमधील सशस्त्र क्रांतीचा विचार. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ त्यांना महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळाला. भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’सारख्या ग्रंथांतून सांगणाऱ्या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले.सत्य आणि अहिंसा या दोन चिरंतन तत्त्वांच्या अंमलबजावणीने ‘सर्वोदय’ होईल ही महात्मा गांधीजींची कृतिशील जीवननिष्ठा विनोबांच्या जीवनाचे शक्तिशाली अधिष्ठान होते. बहुभाषिक विनोबांनी वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता, संत साहित्य, विविध भाष्ये यांचा जसा अभ्यास केला, तसा कुराण, बायबल, धम्मपद, जपुजी (शिखांचा हरिपाठ) इत्यादी धार्मिक ग्रंथांचेही मनःपूर्वक वाचन आणि चिंतन केले होते.


दुर्बळ, वंचित, उपेक्षित आणि पीडित यांच्यासंबंधी अपार करूणा हे संत-महात्म्यांचे अंगभूत वैशिष्ट्य होय. आचार्य विनोबांची जगप्रसिद्ध ‘भूदान चळवळ’ म्हणजे तर त्यांच्या करूणेचा एक आगळा-वेगळा अविष्कार होय! जमीनदारी पद्धत ही ग्रामीण समाजातील दारिद्र्याचे मूळ. त्यामधून तेलंगणामध्ये जमीनदारांचे खून पडू लागले. ‘कसेल त्याची जमीन’ कायदा करूनही हा विषमतेचा प्रश्न सुटत नव्हता. म्हणून विनोबांनी महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही दोन हत्यारे हाती घेऊन शांतीच्या मार्गाने या प्रश्नाचे उत्तर शोधले, ते म्हणजे त्यांची ‘भूदान चळवळ’! एक उघडा, शरीराने कृश वाटणारा आणि साठीकडे वाटचाल करणारा म्हातारा हजारो मैल पायी तुडवत खेड्याखेड्यातून ऊन, पावसाची पर्वा न करता जमिनीचे दान मागत हिंडतो आहे आणि लाखो एकर जमीन मिळवून त्याचे भूमीहीन शेतमजुरांना, शेतकऱ्यांना वाटप करतो ही जगाच्या इतिहासातील अपूर्व आणि अलौकिक घटना होती! १८ एप्रिल १९५१ रोजी सुरू झालेल्या या भूदान चळवळीने पहिल्या दोन महिन्यांत १२ हजार एकर जमीन ‘दान’ म्हणून मिळवली होती.


श्रम आणि सर्वांगिण प्रतिष्ठा यांची तथाकथित बुद्धिवाद्यांनी केलेली फारकत हेच दुष्ट जातीय विषमतेचे मूळ आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर वर्गभेदही नष्ट होतील असाही विचार ते मांडीत असत. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘गीता रहस्य’मध्ये जो कर्मयोग मांडला, तो त्यांना मान्य नव्हता. त्यांनी गीतेमध्ये शांती आणि अहिंसेचा शोध घेतला. गीता ही मानवी सद्विाचार आणि असद्भावना यांच्यातील संघर्ष चित्रित करणारा अद्वितीय ग्रंथ आहे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या ‘गीताई’ आणि ‘गीता प्रवचने’ या ग्रंथाच्या सुमारे पाऊण कोटी हून अधिक प्रती आजवर वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला आहे. विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.

नदी खाडी जिल्हा माहिती

 कोणत्या नदीवर कोणती खाडी ,जिल्हा कोणता आहे याची माहिती ....
दातीवार तानसा वैतरणा = पालघर


वसई उल्हास = पालघर


ठाणे - उल्हास ठाणे


मनोरी - दहिसर = मुंबई


मालाड / मोर्वे - अशिवरा=मुंबई उपनगर


■ माहीम - मिठी-मुंबई उपनगर


पनवेल- पाताळगंगा = रायगड


धरमतर अंबा-रायगड


■ राजपुरी - काळ = रायगड


बाणकोट सावित्री = रायगड/रत्नागिरी


केळशी भरजा = रत्नागिरी


दाभोळ - विशिस्टी = रत्नागिरी


जयगड शास्त्री = रत्नागिरी


भाट्ये - काजळी = रत्नागिरी


पूर्णगड - मुचकुंदी = रत्नागिरी


जैतापूर - काजवी = रत्नागिरी


 विजयदुर्ग - शुक-रत्नागिरी/सिंधुदुर्ग


देवगड - देवगड-सिंधुदुर्ग


आचरा आचरा  सिंधुदुर्ग

भारतातील काही शहरे – जुनी नावे आणि नवीन नावे

 भारतातील काही शहरे – जुनी - नावे : व नवी नावे


१. बॉम्बे मुंबई (महाराष्ट्र)


२. मद्रास चेन्नई (तमिळनाडू)


३. कलकत्ता कोलकाता (पश्चिम बंगाल)


४. पूना पुणे (महाराष्ट्र)


५. त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम (केरळ)


६. बरोडा वडोदरा (गुजरात)


७. बंगलोर बंगळूर (कर्नाटक)


८. बनारस वाराणसी (उत्तर प्रदेश)


९. कालिकत - कोळिकोड (केरळ)


१०. शोलापूर - सोलापूर (महाराष्ट्र)


११. पंजिम पणजी (गोवा)


१२. कोचीन - कोची (केरळ)

 

 १३. भेलसा - विदिशा (मध्य प्रदेश)


१४. विजयापट्टण- विशाखापट्टणम् (आंध्र प्रदेश)


१५. बेझवाडा विजयवाडा (आंध्र प्रदेश)


१६. धोंड दौंड (महाराष्ट्र)


१७. कोकोनाडा काकीनाडा (आंध्र प्रदेश)


१८. रामनाड रामनाथपुरम् (तमिळनाडू)


१९. मदुरा मदुरै (तमिळनाडू)


२०. त्रिचनापल्ली - तिरुचिरापल्ली (तमिळनाडू)

जगातील आणि भारतातील प्रसिद्ध ठिकाणांची टोपण नावे

जगातील आणि भारतातील प्रसिद्ध ठिकाणांची टोपण नावे 🟣अमृतसर – सुवर्णमंदिरांचे शहर.


🟣• अमेरिका – सूर्यास्ताचा देश.


🟣• आफ्रिका – काळे खंड.


🟣• आयर्लंड – पाचूंचे बेट.


🟣• इजिप्त – नाईलची देणगी.


🟣• ऑस्ट्रेलिया – कांगारूचा देश.


🟣• काश्मीर – भारताचे नंदनवन.


🟣• कॅनडा – बर्फाची भूमी.


🟣• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.


🟣• कॅनडा – लिलींचा देश.


🟣• कोची – अरबी समुद्राची राणी.


🟣• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.


🟣• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.


🟣• जपान – उगवत्या सुर्याचा देश.


🟣• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.


🟣• जयपूर – गुलाबी शहर.


🟣• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.


🟣• झांझिबार – लवंगांचे बेट.


🟣• तिबेट – जगाचे छप्पर.🟣• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.


🟣• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.


🟣• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.


🟣• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.


🟣• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश


🟣• पामीरचे पठार – जगाचे आढे.


🟣• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी 


🟣• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.


🟣• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.


🟣• बंगळूर – भारताचे उद्यान.


🟣• बहरिन – मोत्यांचे बेट.


🟣• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.


🟣• बेलग्रेड – श्वेत शहर.


🟣• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.


🟣• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.


🟣• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.


🟣• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी


🟣• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.


🟣• शिकागो – उद्यानांचे शहर.


🟣• श्रीलंका – पाचूंचे बेट.


🟣• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण 


🟣•  पाचगणी --टेबल लँड 🟣• मिनी काश्मीर-- तापोळा महाबळेश्वर 

🟣• भारतीय महान व्यक्तींची समाधी स्थळे किंवा ठिकाणे

 महत्वाचे समाधी स्थळ :-


महात्मा गांधी - राजघाट


डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी


 पंडित नेहरू - शांतीवन


लाल बहादूर शास्त्री - विजयघाट


■ इंदिरा गांधी - शक्तिस्थळ


■ चौधरी चरण सिंह - किसानघाट


■ मोरारजी देसाई - अभयघाट


■ ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ


डॉ राजेंद्र प्रसाद महाप्रयानघाट
यशवंतराव चव्हाण - प्रीतिसंगम


जगजीवन राम --समतास्थळ


के. आर. नारायणन - उदयभुमी


शंकर दयाळ शर्मा - कर्मभूमी


गुलजारी लाल नंदा - नारायणघाट


 राजीव गांधी - वीरभूमी

प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष


◾️1901: नोबेल पारितोषिक


◾️1917: पुलित्झर पुरस्कार


◾️1929: ऑस्कर पुरस्कार


◾️1952: कलिंग पुरस्कार


◾️1954: भारतरत्न


◾️1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार


◾️1955: साहित्य अकादमी पुरस्कार


◾️1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार


◾️1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार


◾️1961: ज्ञानपीठ पुरस्कार


◾️1961: अर्जुन पुरस्कार


◾️1969: द्रोणाचार्य पुरस्कार


◾️1969: पद्मभूषण पुरस्कार


◾️1985: दादासाहेब फाळके पुरस्कार


◾️1991: सरस्वती सन्मान


◾️1992: व्यास सन्मान


◾️1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार


◾️1995: गांधी शांतता पुरस्कार

इंग्रज अधिकारी व कामगिरी

ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय यांची नेमणूक केली त्या काळात त्यांनी केलेली महत्त्वपूर्ण कामे खालील प्रमाणे


  रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था


 वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट


 लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


  लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


 लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त


 लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


 चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


 लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी 

 लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण 


 लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय 


 सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


 लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


 लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 


 लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.