blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

ऐकावे जनाचे करावे मनाचे

 ऐकावे जनाचे करावे मनाचे


धवलपूरचा धोबी त्याचे गाढव विकण्यासाठी बाजाराच्या गावी निघाला बरोबर मुलालाही घेतले. धोबी, मुलगा आणि गाढव तिघेही पायी चालले होते. त्यांना पाहून एक वाटसरू म्हणाला, "गाढव असताना मुलाला का पावी चालवतोस ? त्याला गाढवावर बसव धोब्याने लगेच मुलाला गाढवावर बसवले. थोडे अंतर जातात तोच आणखी एक वाटसरू म्हणाला, "अरे पायी चालतोस तूही बस ना!" झाले. धोबी पण गाढवावर बसला. बिचारे तू का गाढव रखडत रखडत चालू लागले. ते पाहून लोक म्हणाले, "खरे तर यांनी गाढवाला चालवायला नको; पण हेच गाढवावर बसले किती निर्दयी आहेत.' धोबी व मुलगा लगेच गाढवावरून उतरले; पण गाढवाला न चालवता कसे न्यायचे? 

धोब्यास एक युक्ती सुचली त्याने एक बांबू आणला. गाढवाचे पाय बांधले. पायातून बांबू घालून गाढव उलटे टांगून, पुढे तो मधे गाढव व मागे मुलगा असे बांबू खांद्यावर घेऊन चालले. वाटेत नदीवर एक पूल होता. पुलावरून जाताना, गाढवास खाली पाणी दिसले ते धडपडू लागले आणि नदीत पडून मेले.


बोध/  तात्पर्य 


ऐकावे जनाचे करावे मनाचे.

दुर्लक्ष

 छोटी चूक मोठे संकट 


पूर्वीच्या काळी युद्धात घोडेस्वारांना फार महत्त्व होते. पायदळ, घोडदळ ही सैन्याची प्रमुख अंगे होती. त्यामुळे ही दोन्ही दळे सदा सज्ज असत. सेनापती घोड्यावर स्वार होऊन युद्धात भाग घेई. एका सेनापतीची ही कहाणी आहे. त्याचा घोडा खूप उमदा व चपळ होता. घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकले होते; पण त्यातील एका नालाचा एक खिळा पडला होता. तो ताबडतोब ठोकून घेणे आवश्यक होते; पण घोड्याच्या मोतद्दाराने तिकडे दुर्लक्ष केले. अचानक शत्रूने हल्ला केला. सेनापती तातडीने स्वार होऊन निघाला. तुंबळ युद्ध झाले. घोड्याचा एक नाल खिळखिळा होऊन निघाला. घोडा लंगडू लागला. युद्धात घोडा जखमी झाला. 

 घोडा नसल्याने सेनापती मारला गेला. सेनापती मारला गेल्याने, सेनेचा पराभव झाला. एका खिळ्याच्या अभावाने नाल निघाला, नाल नसल्याने घोडा निकामी झाला. घोडा नसल्याने, सेनापती मेला. सेनापती मेल्याने सेना हरली.

बोध  तात्पर्य 

 वेळीच दुरुस्ती न केल्याने मोठे नुकसान होते.

जमिनीची गरज

  माणसाला किती जमिनीची


जरुरी आहे ?

जानोजी नावाचा शेतकरी होता. आपले खूप मोठे शेत असावे असे त्याला वाटे. त्याच्या वाचनात एक जाहिरात आली 'शेतकरी असणाऱ्यास जमीन देणे आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालून जाल, तेवढी जमीन तुमची.' जानोजीला त्याची इच्छा पूर्ण करणारी संधी चालून आली. दिलेल्या पत्त्यावर जानोजी हजर झाला. ठीक सूर्योदयास त्याने चालावयास सुरुवात केली सूर्य डोक्यावर येईपर्यंत जानोजीने बरेच अंतर कापले होते. आता त्यास सूर्यास्तापर्यंत पूर्वीच्या ठिकाणी पोचावयाचे होते. म्हणजे तो घालून झालेली, सर्व जमीन त्याची होणार होती जानोजीने विचार केला, आपण आणखी पुढे जाऊन, मग मागे फिरू म्हणजे आतापेक्षा आणखी जमीन आपल्या मालकीची होईल. तो तसाच पुढे निघाला.  

 

सूर्य मावळतीला आला, तसा तो नाईलाजाने मागे फिरला. त्याने आपला चालण्याचा वेग वाढवला. खरे तर तो आता दमला होता, पण त्याचा नाईलाज होता त्याला आता अधिक अंतर काटावयाचे होते. सूर्यास्तापूर्वी निघण्याच्या ठिकाणी आपण पोचणार नाही. असे त्यास वाटू लागले म्हणून त्याने धावावयास सुरुवात केली. सूर्यास्तास जीवाच्या आकांताने त्याने सुरुवातीचे ठिकाण गाठले पण अतिश्रमाने तोतेथेच कोसळला आणि गतप्राण झाला. गावकऱ्यांनी त्याला पुरण्यासाठी खड्डा खणला आणि म्हणाले, खरे तर याला येवढ्याच जमीनीची जरुरी होती, असे म्हणून त्यास मूठमाती दिली.


बोध  तात्पर्य 

अति लोभ विनाशकारी असतो.

लावी पक्षीण आणि तिची पिल्ले

 लावी पक्षीण आणि तिची पिल्ले

एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता. त्याचे खूप मोठे शेत होते. ज्वारीची कणसे त्याच्या शेतात डोलत होती. लावी पक्षिणीने त्या शेतात आपले घरटे बांधले. तिच्या घरट्यात २ पिल्ले होती. पक्षीण सकाळीच उठून पिलांसाठी चारा आणी दिवसभर बाहेर राहून संध्याकाळी घरट्यात परत येई. पिल्ले दिवसभरात काय झाले ते तिला सांगत.  

एका संध्याकाळी पिलांनी तिला सांगितले की, "शेतकरी म्हणत होता शेतकऱ्यांना कापणीला बोलावतो. आई आपण उद्याच दूर जाऊ, नाही तर त्यांच्या तावडीत सापडू ." आई म्हणाली, नको! दुसऱ्या दिवशी शेतकरी म्हणाला, "गावकरी येत नाहीत, मी सगळ्या नातेवाईकांना बोलावतो." तरी कोणी आले नाही. मग म्हणाला, "माझे शेजारी नक्की येतील. पिल्ले आईला निघण्याची घाई करू लागली. पण पक्षीण काही मनावर घेईना. 

शेतकऱ्याने नंतर घरच्यांना घेऊन येतो म्हटले, पिल्ले घाबरली, पक्षीण म्हणाली, "अजून निघण्याची वेळ झाली नाही." पिल्ले म्हणाली, "आई, तो म्हणत होता आता कोणी येवो न येवो मीच कापणीला सुरुवात करतो पक्षीण पिल्लांना म्हणाली, "आता खरी निघण्याची वेळ झाली आहे. आपण आताच निघू." असे म्हणून पिल्लांना घेऊन ती दूर उडून गेली.


बोध /तात्पर्य 

जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग संपला.

सिंह आणि उंदीर

 सिंह आणि उंदीर


एका रानात एक सिंह रहात होता आणि त्याच्या गुहेत एक उंदीर राहत होता. सिंह एकदा झोपला असता, उंदीर उगीच त्याच्या अंगावरून इकडून तिकडे पळत होता. सिंहाने वैतागून संधी मिळताच त्याला पंजाने पकडले. त्याबरोबर तो गयावया करू लागला व म्हणाला, "तू मला मारू नकोस, मी तुझ्या उपयोगी पडेन." सिंह म्हणाला, "तू कसला माझ्या उपयोगी पडणार. जा आता सोडून देतो, पुन्हा मला त्रास दिलास तर याद राख!" काही दिवसांनी सिंह चुकून शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. काही केले तरी त्यास बाहेर येता येईना. इतक्यात तो उंदीर तेथे आला. तो सिंहाला म्हणाला, "तू आवाज न करता पडून रहा. मी जाळे कुरतडतो. उंदराने जाळे कुरतडून सिंह हळूच बाहेर येऊ शकेल, असे मोठे भोक जाळ्यास पाडले. सिंह हळूच बाहेर आला व त्याने उंदराचे आभार मानले, अशा रितीने उंदराने आपले म्हणणे खरे केले.


बोध :- लहान सुद्धा मोठ्यास मदत करू शकतात.

प्रत्येक मनुष्याकडे , प्राण्यांकडे,काहीतरी विशेष गुण असतात.

तहानलेला कावळा

  तहानलेला कावळा 


उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. खूप तहान लागली होती. त्याला एके ठिकाणी पाण्याचा रांजण दिसला. तेथे तो जाऊन पहातो, तर रांजणामध्ये पाणी पार तळाला होते. त्याने वाकून पाहिले, तर त्याची चोच पाण्यापर्यंत पोचेना. बिचारा तहानेने कासावीस झाला होता. काय करावे म्हणजे पाणी वर येईल ? 

त्याला एक युक्ती सुचली. त्याने एक-एक दगड आणून रांजणात टाकावयास सुरुवात केली. थोड्या वेळात पाणी वर आले. त्याची चोच, आता पाण्यापर्यंत पोहोचू लागली. तो पोटभर पाणी प्याला. त्याची तहान भागली. मग तो उडून गेला.


बोध  / तात्पर्य 

गरज ही शोधाची जननी आहे.

माकडाचे काळीज आणि सुसर

 माकडाचे काळीज आणि सुसर


एका सरोवरात एक सुसर राहत होती. सरोवराच्या काठावर एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. सुसरीला पोहताना पाहून, माकडाला सरोवरात फिरावे असे वाटे. सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटे. हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली. माकड सुसरीला म्हणाले,  

"सुसरताई मला सरोवरात फिरवून आणशील का ?.. सुसर म्हणाली, "हो! बस माझ्या पाठीवर." टुणकन उडी मारून माकड सुसरीच्या पाठीवर बसले. सुसर माकडास घेऊन फिरावयास निघाली. सुसरीच्या मनात विचार आला, हे माकड रोज गोड-गोड फळे खाते, तर ह्याचे काळीज किती गोड असेल! सुसरीने माकडास विचारले, "तू मला तुझे काळीज देशील का ?" माकड सावध झाले आणि म्हणाले,  

"मला आधी का नाही विचारलेस, मी तर काळीज झाडावरच ठेऊन आलो. चल, मला किनाऱ्यावर सोड म्हणजे तुला काळीज काढून देतो." सुसर त्याला घेऊन किनाऱ्यापाशी आली. माकडाने टुणकन उडी मारली आणि झाडावर चढून बसले. • सुसर बिचारी काळीज मिळण्याची वाट पहात राहिली.


बोध /शिकवण/तात्पर्य

मैत्री करताना दक्ष असावे.

मैत्री करताना सावध रहावे.

ससा आणि कासवाची शर्यत

 ससा आणि कासवाची शर्यत  

ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पळायला आवडे. कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील आधी कोण शिवतो? अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पळत पुढे निघाला. कासव मात्र सावकाश चालत राहिले थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवेगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सशाने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल. मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते. 

 सशास आता झोप येऊ लागली त्याने विचार केला. आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल पण आपण ताजे तवाने होऊन जोरात पळू व शर्यत जिंकू. सशाने छान पैकी ताणून दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली पहातो तर काय ? कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली; पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील, अशा रितीने कासवाने शर्यत जिंकली.

तात्पर्य /बोध/शिकवण 

सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.


*

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.