blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र

 अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र


प्रिय गुरुजी,


सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळीच सत्यनिष्ठ,

हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हेदेखील शिकवा

जगात प्रत्येक बदमाषागणिक

असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही.

स्वार्थी राजकारणी असतात जगात

असतात टपलेली वैरी

तसे जपणारे मित्रही

मला माहित आहे,


सगळ्या गोष्टी लवकर नाही शिकवता येत....


तरीही जमलं तर त्याच्या मनात ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम

आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्विकारावी ते त्याला शिकवा

आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर रहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला.


गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं. त्यांना नमवणं सर्वात सोप असतं !

जमेल तेवढं दाखवित चला त्याला भाराचं अद्भुत वैभव,

मात्र त्याबरोबरच,


मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा

सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला


पाहू दे त्याला


पक्ष्यांची अस्मानभरारी....


आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डुलणारी चिमुकली फुलं.


शाळेत त्याला हा धडा मिळू दे

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर.. फसवून मिळविलेल्या यशापेक्षा परळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर विश्वास ठेवायला हवा त्यानं बेतर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा


स्थानं भल्यांशी भलाईनं वा आणि टग्यांना अद्दल घडवावी.


माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी.


पुढे हेही सांगा त्याला ऐकावं जनांचं, अगदी सर्वांचं...


पण गाळून घ्यावं सत्याच्या चाळणीतून, आणि फोलपट टाकून


जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा


निक सत्य तेवढं स्वीकारावं. हसत रहावं उरातलं दुःख दाबून. आणि म्हणावं त्याला, आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.


त्याला शिकवा

तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला अन चाटुगिरीपासून सावध रहायला. त्याला हे पुरेपुर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून..... हृदयाचा आणि आत्म्याच्या! कानाडोळा करायला शिकवा त्याला, जे सत्य आणि न्याय्य वाटते


पण कधीही विक्रय करू नये


धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर


आणि उसवा त्याच्या मनावर


त्याच्यासाठी पाय रोवून लडत रहा. त्याला ममतेनं वागवा पण


लाडावून ठेवू नका.


आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.


त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य,


अन् धरला पाहिजे धीर त्यानं


जर गाजवायच असेल शौर्य


आणखीही एक सांगत रहा त्याला


आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावरच तरच जडेल उदात्त श्रद्धा मानवजातीवर माफ करा गुरुजी! मी फार बोलतो आहे.


खूप काही मागतो आहे... पण पहा.... जमेल तेवढं अवश्य कराच.


माझा मुलगा भलताच गोड छोकरा आहे हो तो....


(रुपातर वसंत बापट)

टी.एन.शेषन आणि ई.श्रीधरन

 

 

टी एन शेषन 
 

ई श्रीधरन



 




*एक जण भारतीय "लोकशाहीला" शिस्त लावणारा तडफदार माजी "निवडणूक आयुक्त" "टी.एन.शेषन" तर दुसरा कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो रेल्वे,सारख्या चमत्काराचा निर्माता "मेट्रोमॅन" "ई.श्रीधरन"* हे दोघंही आपआपल्या क्षेत्रात,टॉपचे अधिकारी तर होतेच,पण आप-आपल्या कामामुळे अख्ख्या देशाची व्यवस्था त्यांनी सुधारून दाखवली.

पण गंमत,म्हणजे हे दोघेही अधिकारी तुम्हाला खरं वाटणार नाही अगदी  प्राथमिक शाळेत असल्यापासून एकाच वर्गात शिकत होते आणि पहिल्या नंबरा साठी त्यांच्यात त्या वेळी तुफान स्पर्धा चालायची.

 *"ई.श्रीधरन"* यांनी एका मुलाखतीमध्ये त्याकाळातल्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

 *"दोघेही मुळचे केरळचे"*. १९४२ साली तिथल्या पलक्कड या गावातल्या सर्वात फेमस असलेल्या बेसल एव्हान्जीकल या मिशनरी हायस्कूलमध्ये *"श्रीधरन"* यांनी इंग्रजी दुसरी या वर्गात प्रवेश घैतला,  *"शेषन"* आधी पासून त्याच शाळेत होते.वर्गात *"शेषन"* यांचा पहिला नंबर यायचा.

 *"श्रीधरन"* यांनी आल्या आल्या त्या वर्षी *"शेषन"* यांना मागे टाकले,आणि

तिथूनच या दोघांची स्पर्धा सुरु झाली.*"शेषन"* है उंचीला कमी असल्यामुळे, वर्गात नेहमी पहिल्या बेंचवर बसायचे तर *"श्रीधरन"* उंच असल्यामुळे शेवटच्या बेंचवर. *"शेषन"* हे अतिशय अभ्यासू,कायम पुस्तकात डोकं खुपसून असायचे.या उलट *"श्रीधरन"* फुटबॉल आणि इतर खेळ खेळायचे.इंग्रजी मध्ये मात्र *"टी.एन.शेषन"* यांच्या तोडीस तोड असा, एकही विद्यार्थी अख्ख्या शाळेत कोणीही नव्हता.

 बोर्डाच्या परीक्षेत *"शेषन"* यांनी *"श्रीधरन"* यांना एका मार्काने मागे टाकलं. *१९४७ सालच्या SSIC* *बोर्ड परीक्षेत "शेषन" ४५२ मार्क मिळवून "पहिले" आले.तर "श्रीधरन" यांना "४५१ मार्क मिळाले" होते  आणि त्यांचा दुसरा क्रमांक आला होता.*.

 मार्कांसाठी कितीही जरी स्पर्धा चढाओढ असली तरीही *"शेषन आणि श्रीधरन" ही जोडी तर   तुटली नाहीच,उलट ते आणखीनच चांगले दोस्त  झाले आणि त्यांच्या मैत्रीत खूपच वाढ झाली.*

पुढे इंटरमेजीएटसाठी देखील व्हिक्टोरिया कॉलेजला दोघांनीही एकत्र अँडमिशन  घेतलं.दोघांनी एकत्रच बसून झपाटून अभ्यास केला.

 आख्खा मद्रास प्रांतामध्ये इंजिनियरिंगला प्रवेश मिळेल एवढे मार्क मिळवणारे ते फक्त दोघेच विद्यार्थी होते.                     पण *"टी.एन.शेषन"* यांना मात्र आपल्या भावाप्रमाणे *"आयएएस अधिकारी"* बनायचं होत यामुळे त्यांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेतला नाही तर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये  फिजिक्स विभागात प्रवेश घेतला. *"श्रीधरन"* यांनी मात्र आंध्रमधल्या काकीनाडाच्या इंजिनियरिंग कॉलेजमधून सिव्हील इंजिनियरिंग पूर्ण केलं.

पुढे १९५४ साली युपीएससी परीक्षा पास होऊन *"शेषन" यांनी "आयएएस" बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. याच काळात "श्रीधरन"* यांनी इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेसची एक्झाम देवून ते पास झाले आणि रेल्वेमध्ये  भरती झाले. 

 *"योगायोग" असा की हे दोघेही परत "ट्रेनिंगच्या" निमित्ताने इंडियन फोरेस्ट कॉलेज डेहराडून येथे एकत्र आले.*.                               ते जवळ जवळ दोन-एक  महिने *"शेषन आणि श्रीधरन"* एकमेकांच्या सोबत राहिले.त्या नंतर मात्र दोघांचे रस्ते कामानिमित्त कायम स्वरुपी वेगळे झाले.*"शेषन"* यांनी प्रशासकीय कारकिर्दीत एकामागून एक यश मिळवत त्यांनी *भारताचे "मुख्य कॅबीनेट सचिव" बनण्यापर्यंत मजल मारली, हे भारतातील सर्वोच्च पद, त्यांना मिळाले.*         १९८९ साली रिटायर झाल्यावर त्यांना निवडणूक आयुक्तपदावर नेमण्यात आलं,हे विशेष.

 भारतात निवडणूक काळात आचारसंहिता,शिस्त आणि कडकपण राबण्यास *"शेषन"* यांनी घालून दिलेली शिस्त ही कारणीभूत ठरली,त्यांच्या कार्याचा सर्वत्र गौरव झाला,सन्मान म्हणून त्यांना *"मॅगसेसे" पुरस्कार देखील देण्यात आला.*.   तर इथे *"श्रीधरन" यांनी कलकत्ता मेट्रो,कोकण रेल्वे,दिल्ली मेट्रो,कोची मेट्रो,लखनौ मेट्रो असे मोठमोठे अशक्यप्राय वाटणारे प्रोजेक्ट स्वतःच्या कर्तबगारीने व नेतृत्वाने पूर्ण केले.विक्रमी वेळेत सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंगचे स्कील दाखवत "श्रीधरन" यांनी भारतीय रेल्वेचा संपूर्ण कायापालट करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांना त्या बद्दल भारताचा सर्वोच्च "पद्मविभूषण" हा किताब सन्मान देण्यात आला.*

मैत्रीत अनेकदा लोक स्पर्धा करतात,पण स्पर्धा असावी तर *"शेषन-श्रीधरन"* यांच्या प्रमाणे चांगल काम करण्याची.देशाला *"नंबर वन" करण्यासाठी या दोन वल्लीनी  "महान दोस्तांनी"* जे औदार्य दाखवलं,आणि बुद्धी कौशल्यानी यशस्वी होवून दाखवलय.त्यांच्या या अलौकिक दैदिप्यमान कामगिरीचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.त्यांचा हा आदर्श प्रत्येक तरूण तरूणींनी घ्यावा हे मात्र नक्कीच खरं आहे.                        अशा ह्या भारत मातेच्या सुपुत्रांना सॅल्युट🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹


ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.