blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

एका संधीची गोष्ट डॉ .विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्याख्यान

https://www.youtube.com/watch?v=62zrsrV8m0k      हा video नक्की पहा खूप प्रेरणादायी आहे .reply  आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar

   


संत ज्ञानेश्वर हे १३व्या शतकातील भारतीय मराठी संत, कवी, तत्त्वज्ञ आणि नाथ वैष्णव परंपरेतील योगी होते. 21 वर्षांच्या छोट्या आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथांची रचना केली. देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानल्या जातात.

संत ज्ञानेश्वरांच्या कल्पना द्वैतवादी अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान आणि योग आणि विष्णू आणि शिव यांच्या एकतेवर भर देतात. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या वारकरी भक्ती चळवळीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आसंत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म शके ११९७ (इ.स. १२७५) आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतांचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण नंतर ते आळंदीत स्थायिक झाले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशी आणखी तीन मुले होती.

विठ्ठलपंतांनी ऐन तारुण्यातच संन्यास घेतला होता. मात्र, गुरूंच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची चार मुले झाली; त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांनी या कुटुंबाला वाळूत टाकले. परिणामी ज्ञानेश्वर   आणि त्यांच्या भावंडांना अत्यंत खडतर आणि उपेक्षित जीवन जगावे लागले. त्याला खूप अपमान सहन करावा लागला. ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी शके १२१८ (इ.स. १२९६) आळंदी येथे समाधी घेतली.

संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला

ज्ञानेश्वरांनी शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये ‘ ज्ञानेश्वरी ‘ ही भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याखेरीज अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, अभंगांची गाथा अशी ग्रंथरचनाही केली आहे. ‘ज्ञानेश्वरी ‘ किंवा ‘ भावार्थदीपिका ‘ हा मराठी साहित्यातील अजोड ग्रंथ होय . मराठी साहित्याचे ते अजरामर लेणे ठरले आहे. ज्ञानेश्वरी हा भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ आहे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील अठरा अध्याय व त्यांतील सातशे श्लोकळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

 संत ज्ञानेश्वर हे गीतेवरील श्रेष्ठ भाष्यकार होते . त्यांच्या ठिकाणी तत्त्वज्ञान, काव्य व आत्मानुभूती यांचा एक अद्भुत त्रिवेणी संगम झाला होता . त्यांनी गीतेला मराठी भाषेचे सुंदर लेणे चढवून मराठी भाषिकांना तत्त्वज्ञानाचा एक महान ग्रंथ उपलब्ध करून दिला. आतापर्यंत संस्कृत अवगुंठित असलेले अध्यात्मज्ञान मराठीत आणून ज्ञानेश्वरांनी मोक्षाची द्वारे सर्वसामान्य जनतेलाही खुली केली. हे त्यांचे महान कार्य होय.

ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीबद्ध टीकेत गीतेतील कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग यांचे विस्तृत विवेचन केले आहे. गीतेत या सर्वांचा सुरेख मेळ घातला गेला आहे . ज्ञानेश्वरांनी समन्वयाची भूमिका स्वीकारून ज्ञानेश्वरीत या सर्वांचे गुणग्राही विवेचन केले आहे . त्यांनी ‘ सर्वांभूती समानता ‘ व ‘ ज्ञानयुक्त भक्ती ‘ यांची शिकवण दिली. सगुण भक्तीला ‘ अद्वैत ‘ तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मिळवून देताना आणि ‘ अहम् ब्रह्मास्मि ‘ किंवा ‘ तत् त्वम् असि ‘ या वेदवाक्यांचा भावार्थ सांगताना  म्हणतात,

“हे विश्वचि माझे घर। ऐसी मती जयाची स्थिर।
किंबहुना चराचर। आपण जाला।।”

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.