मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

संस्कार एक शिदोरी

 *मुलांवर योग्य संस्कार करा.....*


*1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावा...!


*2. घरात मुलांसमोर  आदळ-आपट, भांडणे करू नका...!


*3. रोज एक चांगले काम करण्याची सवय लावा, त्याबद्दल दररोज घरात मुलांसमक्ष चर्चा करा...!


*4. मुलांना नेहमी अपमानास्पद बोलू नका, मूल तुम्हाला टाळणे चालू करेल...!


*5. मुलाने  चूक केल्यास त्याला चांगल्या पद्धतीने चूक समजाऊन सांगा व माफ करा, त्याने चांगले काम केले असेल तर  त्याचे तोंड भरून कौतुक करा...!

 

*6.मुलांसाठी आई-बाबांकडे काही वेळ असावा...!


*7. आईसाठी व आजी-आजोबांसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे..!


 *8. मूले ही कुटुंबाची समाजात आदर्श व्हावीत असे त्यांच्यावर संस्कार करा, आपल्या भविष्याची सोय नाहीत, म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका...!


*9. मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका...!!

 

*10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या, मूल कितीही लहान असेल तरी...!


*11. आपण मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा...!

  

*12. आपल्या मुलांच्या प्राथमिक गरजा समजून घ्या...!


*13. मुलांच्या प्रश्नांना समर्पक व वैज्ञानिक दृष्टीने उत्तरे द्या. त्यांची प्रश्ने टाळू नका...!


*14. श्रध्दा व अंध-श्रध्दा यांतील फरक मुलांना समजावून सांगा...!


*15. शाळेत जाण्यापुर्वी मुलांना लहानपणीच मोबाईल खेळणे म्हणून देऊ नये. त्याचे दुष्परिणाम होतात, शिक्षणासाठी आवश्यकते वेळी संगणक, लॅपटाॅप ई. ची व्यवस्था करावी...!


*16. मुलांना घराबाहेर मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी. अपयश व पराभव सहन करता आला पाहीजे...!


*17. मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करावी...!


*18. मुलाची प्रत्येक अवास्तव मागणी सर्रासपणे पूर्ण करू नये. त्यांना नकाराची सवय लावावी...!


*19.मुलांच्यावर चांगले संस्कार करावे, ईतरांचा मान-सन्मान करणे, अदबीने बोलणे शिकवावे, भाषा चांगली असावी...!


*20. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना पालक म्हणून घरी या...!


*21. मुलांशी कधीही नकारात्मक-दृष्ट्या बोलू नये...!


*22.सज्ञानी मुलास नालायक, गाढव, मूर्ख ई. अपमानकारक शब्द वापरू नये...!


*23. मुलांना लहान बाळ वयातआपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो, पण विशेषत: जन्मदात्या आईचे सुयोग्य संस्कार हवेत,परंतु मुलांना काही प्रमाणात रिस्क घेऊ द्यावी...!


*24. मुलांना प्रेमाने धाक हा असावा परंतु त्यास अमाणुषपणे मारणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे मूले खोटे बोलायला लागतात... असे प्रेमापोटी देखील मारू नये...!


*25. तू जर हे केलस तर मी सोडून जाईन, तुला एकटे सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये...!


*26. मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या वर्तनाचे कौतुक करावे...!


*27. यशस्वी लोकांबाबत घरात नेहमी चर्चा करावी...!


*28. मुलांच्या प्रगती-पुस्तकाकडे  पाहण्याचा दृष्टिकोन निकोप असावा...! 


*29. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबाबत मुलांशी चर्चा करा, हत्या, आत्महत्या, हिंसा, ई. कशा वाईट आहेत हे समजावून सांगा...!


*30. मुलांचे मित्र, मैत्रीणी कोण आहेत?, त्यांचेशी पण संवाद असू द्या...!


*31.मुलांना इतरांच्या खोट्या संशयखोर प्रेम कहाण्या घरात नेहमी सांगू नका.घरात नेहमीच अशाप्रकारचे विषय होत असतील तर  त्यामुळे मुलं तसे लवकर अनुकरण करुन तशी वागतात...!


*32.संस्कार मुलांना पाटीवर किंवा वहीवर लिहून देऊन पाट करायला सांगून घडवता येत नाही हे आपणां सर्वांना माहितच आहे .आपण जसे आचरण करतो तसे संस्कार मुलांच्यावर घडत असतात. आई-वडील जसे वागतात तसे आई-वडिलांचे अनुकरण करुन मुलं तशी वागतात.म्हणुन मुलांसमोर चांगले आचरण ठेवा...!


*33.संस्कार दररोज आपल्या घरात व परिसरात होत असलेल्या घटनांनुसार घडत असतात. त्यासाठी वेळोवेळी मुलांना चांगले काय - वाईट काय सांगून आई वडिलांनी  मार्गदर्शकची भुमिका निभावने आवश्यक आहे...!


*34.मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवा, आवशकते नुसार तज्ञांचा सल्ला घ्यावा...!


*35.आपल्या मुलांसाठी आपणच चांगले गुरु व्हा हे कायमच लक्षात ठेवा व त्याप्रमाणे त्यांच्यावर चांगले योग्य संस्कार करीत राहा, त्यांना चांगल्या कामात प्रोत्साहन द्या, त्यांची हिम्मत व उमेद वाढवा, त्यांना आत्मनिर्भय बनवा, कुटुंबाचे, समाजाचे व गावाचे नाव लौकिक वाढविण्यासाठी त्यांना प्रेरणा द्या...!


*आपला जिव्हाळा कायम राहो*

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.