blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

करायला हवे नियंत्रण रागावर

 💐रागावर नियंत्रण करण्याचे

एक सुंदर उदाहरण --💐


*एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* -


"नेहमीप्रमाणे बसलो होतो.

 एक पक्षकार आले. 

हातात कागदाची पिशवी.

 रापलेला चेहरा. 

वाढलेली दाढी.

 मळलेली कपडे.

 म्हणाले.., 

" सगळ्या च जमीनीवर स्टे 

लावायचा आहे. आणखी काय 

कागदं पाहीजेत? 

किती खर्च येईल? "


मी त्यांना बसायला सांगितलं. 

ते खुर्चीवर बसले. 

त्यांची सर्व कागदपत्रे तपासली.

 त्यांच्या कडून माहीती घेतली. 

अर्धा पाउण तास गेला.

 मी त्यांना सांगितलं. ,

" मी अजून कागदपत्रे पाहतो.

 तुमच्या केसचा विचार करूया. 

तुंम्ही असं करा

 ४ दिवसांनी परत या. "


४ दिवसांनी ते पक्षकार

 पुन्हा आले.

 तसाच अवतार. 

भावा बद्दलचा राग अजूनही

 कमी झाला नव्हता.

मी त्यांना बसायची खूण केली.

 ते बसले. 


मग मीच बोलायला सुरूवात 

केली. 

" मी तुमची कागदपत्रे पाहीली.

तुम्ही दोघे भाऊ. 

एक बहीण. 

आई वडील लहानपणीच गेले.

 तुमच शिक्षण ९ वी पास.

 धाकला भाऊ M.A.B.ed.

 तुंम्ही भावाच्या शिक्षणा साठी

 शाळा सोडली.

 रानात लंगोटी वर राबला.

 नेवरा दाजी च्या विहीरीवर 

दगड फोडली.

 सदाबापू च्या उसात

 च-या पाडल्या. 

पण भावाच्या शिक्षणाला पैसा 

कमी पडू दिला नाही. 

एकदा बहीण शेतात गुरं

 चारत होती.

 तुमचा भाऊ शाळेतून आला होता.

 कसा तो म्हशीच्या आडवा गेला

 आणि त्याला  शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं.

 तुंम्ही खांद्या वरून त्याला

 बोरगावला नेलं.

 खरं म्हणजे त्यावेळी तुमचं 

पण कळतं वय नव्हतं....


फक्त कळती माया होती..


 आई बापाच्या मागं यांचा मीच

 आई बाप ही भावना होती...

तुमचा भाऊ B.A ला गेला.

 उर भरून आला.

 तुम्ही पुन्हा जोमानं कष्ट

 उपसायला लागला. 

पण अचानक त्याला किडनीचा

 त्रास सुरू झाला.

 दवाखानं केल..

बाहेरचं केलं..

पण गुण आला नाही..

शेवटी डॉक्टर नं किडनी काढायला

 सांगितली.

तुंम्ही तुमची किडनी दिली.

ऑफिसर झाल्यावर खुप

 फिरायच आहे..

नोकरी करायची आहे..

तुला आमच्या पेक्षा लय त्रास.. 


आंम्ही रानातली माणसं.

 आंम्हाला एक किडनी असली 

तरी चालतय.

तुम्ही बायकोच सुध्दा न

 ऐकता किडनी दिली.


भाऊ M.A ला गेला.

 होस्टेल वर रहायला गेला.

 गावात मटण पडलं..

डबा नेवून द्यावा.

 शेतात कणसं आली..

कणस नेवून द्यावी. 

कुठला सण आला..

पोळ्यांचा डबा द्यावा..

घरा पासून हॉस्टेल च अंतर 

२५ की.मी. 

पण तुंम्ही सायकलने गेला.

 घासातला घास घातला.

भावाला नोकरी लागली..

 तुंम्ही गावात साखर वाटली..


३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..

झालं म्हणजे त्यानंच केलं.

 तुंम्ही फक्त हजर होता. पण

 तरी अभिमान होता..


भावाला नोकरी लागली.

 भावाच लग्न झालं..

आता तुम्हाला आणि बायका पोरांना 

सुख लागणार होतं;

 पण झाल उलटंच....

लग्न झाल्या पासुन भाऊ घरी

 येत नाही..

बोलावलं तर म्हणतो; 

मी बायकोला शब्द दिलाय..

 घरी पैसा देत नाही..

विचारलं तर म्हणतो अंगावर 

कर्ज आहे..

 गेल्या वर्षी कोल्हापुरा त फ्लॅट

 घेतला. 

विचारल तर म्हणतो कर्ज

 काढून घेतलाय..!! "


सगळं सांगून झाल्यावर मी

 थोडा वेळ थांबलो.


नंतर म्हणालो ...

" आता तुमचं म्हणणं आहे की 

त्याने घेतलेल्या मिळकती वर 

स्टे लावायचा ? 


तो पटकन म्हणाला; 

हो बरोबर... 


मी म्हणलं; 

स्टे लावता येईल. 

भावाने खरेदी केलेल्या मिळकती

मधला हिस्सा पण मिळेल.

 पण......


पण तुंम्ही दिलेली कीडनी परत 

मिळणार नाही. 

तुम्ही भावासाठी आटवलेलं

 रक्त परत मिळणार नाही.

 तुंम्ही त्याच्या साठी खर्च केलेलं

 आयुष्य पण परत मिळणार नाही..

आणि मला वाटतयं या

 गोष्टी पुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची

 किंमत शुन्य आहे.

त्याची नियत बदलली.

 तो त्याच्या वाटंनं गेला.

 तुंम्ही त्याच वाटेनं नको जाऊसा.

 तो भिकारी निघाला..

तुंम्ही दिलदार होता..

 दिलदारच रहा.. 

तुम्हाला काहीएक कमी

 पडणार नाही.. !!

उलट मी म्हणेन वडीलो पार्जित

 मिळकती मधला तुमचा हिस्सा 

तेवढा पेरा.. त्याचा हिस्सा पडीक

 राहु द्या.. 

कोर्ट कचेरी करण्या पेक्षा मुलांना 

शिकवा.. शिकुन तुमचा भाऊ

 बिघडला ; 

म्हणुन पोरं बिघडणार नाहीत.. !! "


त्यान १० मिनीटं विचार केला.. 

सगळी कागद पिशवीत कोंबली.. 

डोळं पुसत म्हणाला;

"  चलतो सायेब... !! "


या गोष्टीला ५ वर्ष झाली.

 परवा तो पक्षकार अचानक 

ऑफीस ला आला.

 बरोबर गोरागोमटा पोरगा.

 हातात कसली तरी पिशवी.

मी म्हटले बसा..

तो म्हणाला ,

 "" बसायला न्हाय आलो सायेब, 

पेढं द्यायला आलोय "".


हा माझा पोरगा.

 न्युझिलॅंन्डला असतो.

 काल आलाय.

 आता गावात ३ मजली घर हाय.

 ८-९ एकर शेत घेतलय.

 तुंम्ही म्हणाला होता कोर्ट

 कचेरी च्या वाटला लागु नका. 


मी पोरांच्या शिक्षणा ची

 वाट धरली.. !! "


मला भरुन आलं... 


हातातला पेढा हातातच राहीला..


 .    ..  ."


रागाला योग्य दिशा दिली तर

 पुन्हा रागवायची वेळ

 येणार नाही...


*कितीही कमवा*

            *पण कधी गर्व करू नका*

    *कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर* 

                  *ऱाजा आणि शिपाई*

     *शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात,*

            *आयुष्य खूप सुंदर आहे*

    *एकमेकांना समजून घ्या व जीव लावा*

..

तुम्हाला जर कथा आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा व शेअर करा...


   *कथा माझी नाही पण खरच प्रेरणा दायक आहे़, म्हणून पाठवली कशी वाटली ?................*

सुंदर लेख, हार्दिक आभार!!


माणूस देव संत गाडगेबाबा

  *गाडगे महाराज*


*वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले थोर समाजसुधारक*


*स्मृतिदिन - २० डिंसेंबर १९५६*

  

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे संत होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे


.

सामाजिक सुधारणा

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे. संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻🙏🏻🙏🏻

रामबाण उपाय नको औषधे

  हल्लीच्या जगात अगदी लहानापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना दिवसातून एक तरी औषध ,गोळी घ्यावी लागते सर्व जग गोळ्या औषधांवर अवलंबून आहे अशी अवस्था झाली आहे. म्हणून औषध म्हणून बाटल्या आणि गोळ्या मध्ये न राहता खालील उपाय औषध म्हणून नक्की वापर करा.🙏🙏🙏




औषध केवळ बाटल्या आणि गोळ्यांमध्येच असतं असं नाही...




*व्यायाम हे औषध आहे.*




*उपवास हे औषध आहे.*




*निसर्गोपचार हे औषध आहे.*




*खळखळून हसणं हे औषध आहे.*




*भाजीपाला हे औषध आहे.*




*गाढ झोप हे औषध आहे.




*स्वच्छ सूर्यप्रकाश हे औषध आहे.




*कृतज्ञता आणि प्रेम ही औषधे आहेत.




*चांगले मित्र हे औषध आहे.




*ध्यानधारणा हे औषध आहे.




*कांही प्रसंगी मौन आणि एकांतवास हे औषध आहे.


आनंदी रहा जीवनाचा आनंद घ्या 

रयतेचा कर्मवीर भाऊराव पाटील

 




 कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.



इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.कार्मावीरांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले.विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रगीचे शिक्षण झाले.तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले.कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थान चे राजे राजर्षी शाहू महाराज होते.भविष्यकाळाचा विचार करणारा राजा होता.त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला.सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरु केले.समाज प्रबोधनाच्या चळवळीमध्ये एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. या ऐक्याच्या स्मरणार्थ 'युनियन बोर्डींग' ची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली. हे ऐक्य व्हावे या विषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती. पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते. १९३५ मध्ये 'महात्मा फुले अध्यापक विद्यालय' त्यांनी सुरू केले. या मागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते.


एकदा कर्मवीर् सुट्टीत इस्लामपूरला आले.त्यावेळी कार्मावीरांचे आई वडील तिथे राहत होते.रिकाम्या वेळेतकर्मवीर शाळेकडे गेले.पावसाळ्याचे दिवस होते. हवेत गारवा होता.सर्व मुले वर्गात बसलेली होती.आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता.गुरुजीना विचारल्यानंतर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले.ते त्या मुलाला घरी घेऊन आले.घरात स्वताजाव्ल बसूनच जेऊ घातले.नंतर कोल्हापूर ला नेऊन 'मिस क्लार्क होस्टेल'लादाखल केले.तो पुढे तो विधीमंडळाचा सभासद झाला.भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या 'मूकनायक'वर्तमान पत्राचा तोकाही काल तो संपादक होता.इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आई ने त्यांना फुंकनीने मारले.फुंकनीचा मार वाया गेला नाही.पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली.अण्णा हायस्कूला असताना होते. पण त्यांन रस नव्हता.


शिक्षण संस्था -

पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते.सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारेघेऊन जाण्यासाठी त्यांनी रयतशिक्षण संस्थेची स्थापना केली.मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी 'कमवा व शिका' हि योजना सुरु केली.महाराष्ट्रात ४ जिल्यात व कर्नाटक राज्यात मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक,२७ प्राथमिक,४३८माध्यमिक,८ आश्रमशाळा,८ अध्यापक विद्यालय,२ आय.ट.आय,व ४१ महाविध्यालायांचा समावेश आहे.अशा या शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टो १९१९ रोजी केली.


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. या संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -


शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.

निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.

अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.

संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.

बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.


साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.


त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[४] रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक, ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.


ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली.


रयतगीत-


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||


कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||


गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||.  



दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||


जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... गीतकार - विठ्ठल वाघ 

विनम्र अभिवादन 🙏🙏 

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.