८ जानेवारी दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
* १८३५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाल्याची घोषणा केली.
* १८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राह्मणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करू शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
* १८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
* १९४०: दुसरे महायुद्ध - ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
* १९४७: जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
* १९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
* १९६३: लिओनार्डो दा विंची यांच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
* १९७२: आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांनी बांगलादेशी नेते शेख मुजिबुर रहमान यांची तुरुंगातून सुटका केली.
* २००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
* २००६: मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
जन्म:
* १९०९: आशापूर्णा देवी - प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि कादंबरीकार.
* १९२९: सईद जाफरी - भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटांमधील अभिनेते.
* १९३८: नंदा - भारतीय चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री.
* १९४२: स्टिफन हॉकिंग - इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक.
* १९४५: प्रभा गणोरकर - मराठी लेखिका.
मृत्यू:
* १६४२: गॅलिलिओ गॅलिली - इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ. त्यांना 'आधुनिक खगोल विज्ञानाचे जनक' आणि 'आधुनिक भौतिकशास्त्राचे जनक' असेही म्हटले जाते.
* १८८४: केशवचंद्र सेन - ब्राह्मो समाजातील एक थोर पुरुष, समाजसुधारक आणि लोकसेवक.
* १९९५: मधु लिमये - स्वातंत्र्यसैनिक आणि जयप्रकाश नारायण व राम मनोहर लोहिया यांचे सहकारी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏