blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

जालना जिल्हा

                   जालना जिल्हा


टोपण नाव :- संतांची भूमी.


क्षेत्रफळ :- ७,७१५ चौ. कि. मी. लोकसंख्या :- १६, १२,३५७

तालुके :- ८ १) जालना, २) अंबड, ३) जाफ्राबाद,

४) परतूर, ५) भोकरदन, ६) बदनापूर, ७) घनसावंगी, ८) मंठा.


हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ७० सें.मी.

प्रमुख पिके :- ज्वारी, तीळ, कडधान्ये, मका, कापूस, ऊस, मिरची, तंबाखू, बाजरी इ. नद्या :- खेळणा, धामणा, पूर्णा, कुंडलिका, दुधना, गोदावरी,

जुई, गिरजा, गुलाटी इ. डोंगररांगा :- अजिंठ्यांची डोंगररांग, जांबूवंत टेकडी इ. तीर्थस्थाने :- जांबसमर्थे (संत रामदास स्वामींचे जन्मगाव),

जालना (महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे वास्तव स्थान),  

अंबड (मत्स्योदरी मंदिर, खंडोबाचे मंदिर), जांबुवंत गड. डोणगाव (बोहरी समाजाचे मौलाना नुरूद्दीन यांचा दर्जा), राजूर ( गणेश मंदिर), जयदेववाडी (महानुभव पंथाचे पवित्र स्थान).

ऐतिहासिक स्थाने :- जालना.


किल्ले :- जालना.


प्रमुख उद्योग :- घोंगड्या विणणे, हातमाग, तेल गाळणे, सिमेंट पाईप, यंत्रसामग्री, साखर.


लोहमार्ग :- मनमाड- काचिगुडा-ब्रॉडगेज. प्रशिक्षण केंद्र :- पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना. राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ (सोलापूर- औरंगाबाद-धुळे ).

संत :- रामदास स्वामी, आनंदस्वामी. 


लातूर जिल्हा

            लातूर जिल्हा


क्षेत्रफळ :- ७,१६६ चौ. कि.मी. लोकसंख्या :- २०,७८, २३७.

तालुके :- १० - १) लातूर, २) अहमदपूर, ३) उद्गीर, ४) निलंगा, ५) औसा, ६) चाकूर, ७) रेणापूर, ८) देवणी,

९) शिरुर अनंतपाळ, १०) जळकोट. हवामान :- उष्ण व कोरडे.

सरासरी पर्जन्य :- ८० सें.मी.

प्रमुख पिके :- ज्वारी, बाजरी, कापूस, कडधान्ये, गळिताची

पिके, ऊस, तंबाखू.

नद्या :- मांजरा, तेरणा, मन्याड, तावरजा, लेंडी, धरणी. पर्वत / डोंगररांगा :- बालाघाटचे डोंगर. अभयारण्ये :- रामलिंग. लेणी :- खरोसा (इ. स. ६ व्या शतकातील कोरीव लेणी).

तीर्थस्थाने :- औसा (मल्लिनाथ महाराजांचा मठ, संतकवी जीवनदासांचे जन्मस्थान ) लातूर (सिद्धेश्वर मंदिर, जैन धर्मपीठ, हजरतसुरशाहवली दर्गा),

हलीबेट (गंगाराम महाराजांची समाधी), शिरूर अनंतपाळ.

किल्ले :- उदगीर, औसा. इतिहासप्रसिद्ध शहर:- लातूर (प्राचीन सातवाहन व राष्ट्रकूटकालीन शहर).

प्रेक्षणीय ठिकाणे :- हत्ती बेट, खरोसा,

प्रमुख उद्योग :- तेल घाणी, कापूस उद्योग, सूत गिरण्या, डाळीचे कारखाने, वनस्पती तुपाचे उत्पादन.

धरण प्रकल्प : माकणी प्रकल्प.

लोहमार्ग :- विकाराबाद-परळी-ब्रॉडगेज. 

संत :- संत जीवनदास, मल्लीनाथ महाराज. 

नांदेड जिल्हा


           नांदेड जिल्हा 


टोपण नाव : संस्कृत कवींचा जिल्हा.


क्षेत्रफळ : १०,५४५ चौ. कि. मी. लोकसंख्या :- २८, ६८, १५८.

तालुके :- १६ - १) नांदेड, २) हदगाव, ३) किनवट, ४) भोकर, ५) बिलोली, ६) देगलूर, ७) मुखेड, ८) कंधार, लोहा, १०) अर्धापूर, १९) हिमायतनगर, १२) माहूर,

१३) उमरी, १४) धर्माबाद, १५) नायगाव, १६ ) मुदखेड. हवामान : उष्ण व कोरडे.

 सरासरी पर्जन्य :- १०३ सें.मी.


प्रमुख पिके : ज्वारी, मका, बाजरी, भात, केळी, कापूस, मिरची, गळिताची पिके, द्राक्षे इ.

नद्या :- गोदावरी, वैनगंगा, लेंडी, मांजरा मन्याड, पर्वत / डोंगररांगा :- सातमाळा, निर्मल, मुदखेड. , सीता,कयाधू, आसना.


अभयारण्ये :- किनवट,


गरम पाण्याचे झरे :- उनकेश्वर.


धबधबे :- सहस्रकुंड.

****

थंड हवेचे ठिकाण :- सहस्त्रकुंड, माहूर. तलाव :- निजामसागर तलाव (नांदेड).


धार्मिक स्थाने :- नांदेड (शिखांचे धर्मगुरु गोविंदसिंग यांची समाधी), माहूर (साडेतीन शक्तीपीठांपैकी एक, रेणुका मातेचे जागृत पीठ, सती अनसूयेचे मंदिर), हदगाव (दत्तमंदिर), मुखेड (दशरथेश्वर महादेव मंदिर), बिलोली (प्राचीन मशीद, कोरीव कामासाठी प्रसिद्ध), गोरठा (दासगणू महाराजांचे समाधि स्थान), त्रिकुट (गणेश मंदिर)

किल्ले :- कंधार (भुईकोट किल्ला), मालेगाव (खंडोबाचे स्थान).


ऐतिहासिक स्थान :- कंधार, नांदेड, माहूर..

 प्रेक्षणिय स्थाने :- किनवट, सहस्त्रकुंड, नांदेड, माहूर, विष्णुपुरी (आशिया खंडातील सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प).


शैक्षणिक संस्था (विद्यापीठ) :- स्वामी रामानंद तीर्थ

विद्यापीठ.


प्रमुख उद्योग :- तेलघाणे, हातमाग, रेशीम, कापड, साखर,

कातडी सामान.

प्रमुख धरणे :- मानार (कंधार, मन्याड नदीवर). प्राचीन कवी :- वामन पंडित (मराठीतील प्रसिद्ध कवी).विष्णुपंत शेष (संस्कृत पंडित आणि कवी.

संत :- दासगणू महाराज (गोरठा).


लोहमार्ग:- मनमाड-परभणी-नांदेड-काचिगुडा (ब्रॉडगेज). मुदखेड-किनवट-आदिलाबाद (मीटरगेज). 



बीड जिल्हा

            बीड जिल्हा 


टोपण नाव :- जुन्या कवींचा जिल्हा, देवदेवळांचा जिल्हा. क्षेत्रफळ :- १०,६९२ चौ. कि. मी. 

लोकसंख्या : २१,५९,८४१.

तालुके :- ११ - १) बीड, २) गेवराई, ३) माजलगाव, ४) अंबेजोगाई, ५) केज, ६) पाटोदा, ७) आष्टी, ८) धारूर, ९) परळी, १०) वडवणी, ११) शिरुर कासार.



हवामान : उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ६५ सें.मी.


प्रमुख पिके :- बाजरी, कापूस, वाटाणा, तूरडाळ, ऊस,


तीळ, एरंडी, तंबाखू, भुईमूग, द्राक्षे, हरभरा, करडई. नद्या :- बिंदूसरा, सिंदफणा, गोदावरी, कुंडलिका, सरस्वती,


सीना मांजरा, माण नदी. डोंगररांगा :- बालाघाटचे डोंगर,

धबधबे :- सौताडा.


अभयारण्ये : नायगाव.


लेणी :- परळी वैजनाथ,


तीर्थस्थाने :- अंबेजोगाई (जोगाईचे प्रसिद्ध मंदिर), आद्यकवी मुकुंदराज व दासोपंत यांची जन्मभूमी, बीड (प्राचीन चंपावती नगरी, कंकाळेश्वराचे मंदिर), मांजरसुंबा(मन्वथ स्वामींची समाधी), गहिनीनाथ गड (गहिनीनाथांचे मंदिर), परळी वैजनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, • कोरीव लेणी, अमलेश्वर महादेव मंदिर), पांचाळेश्वर, नारायण गड इ. राक्षसभुवन (२१ गणेशपीठोंपैकी एक).

ऐतिहासिक स्थाने :- राक्षस भुवन, किल्ले धारूर, शैक्षणिक संस्था :- वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई.


औष्णिक विद्युत केंद्र :- परळी वैजनाथ.


औद्योगिक उत्पादने :- धातूची भांडी, साखर, हातमाग कापड, , तेल गाळणे, चर्मोद्योग, साबण उत्पादन इ.

धरण प्रकल्प : माजलगाव (सिंदफणा नदीवर), पाली, शिरापूर, मांजरा धरण इ.


लोहमार्ग :- परळीवैजनाथ- परभणी (ब्रॉडगेज) विकाराबाद- परळी वैजनाथ.


राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ सोलापूर- बीड- औरंगाबाद-धुळे 

संत व कवी :- दासोपंत आद्यकवी मुकुंदराज, मन्वथ स्वामी, महदंबा (मराठीतील पहिली कवयित्री).



UDIES / शाळा शोधा

 एका क्लिक वर शोधा शाळेचा  udies नंबर आणि  शाळेची माहिती   खालील लिंक वरती क्लिक करा आणि पहा शाळेची सर्व माहिती 

https://src.udiseplus.gov.in/home 

 धन्यवाद 🙏🙏🙏

हिंगोली जिल्हा

                                हिंगोली जिल्हा


क्षेत्रफळ :- ४,५२६ चौ. कि. मी. लोकसंख्या :- ९८, ६७, १७.


तालुके :- ५ - १) हिंगोली, २) कळमनुरी, ३) बसमतनगर,

४) औंढा नागनाथ, ५) सेनगाव.. हवामान : उष्ण व कोरडे.

सरासरी पर्जन्य :- ८२ सें.मी.


प्रमुख पिके :- ज्वारी, कापूस, मिरची, गहू, मका, भुईमूग, द्राक्षे, केळी.

नद्या :- कयाधू, पूर्णा, पैनगंगा.


डोंगररांगा :- हिंगोलीचे डोंगर, अजिंठ्याच्या रांगा. तीर्थस्थाने :- औंढा नागनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक),

विसोबा खेचर यांचे वास्तव्यस्थान.

नरसी (संत नामदेवांचे जन्मस्थान, नृसिंह मंदिर), बामणी (अन्नपूर्णा व सरस्वती यांचे मंदिर), खैरी घुमट (नवनाथ स्थानांपैकी एक).

औद्योगिक उत्पादने :- पी. व्ही.सी. पाईप, साखर, कातडी कमावणे, हातमाग वस्तू, कापड,

जलविद्युत केंद्रे : येलदरी, जलविद्युत प्रकल्प. लोहमार्ग :- पूर्णा - हिंगोली - अकोला - मीटरगेज संत :- विसोबा खेचर, संत नामदेव.

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.